भारतीय चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे हे चित्रपट सृष्टीतील एक महत्वाचं नाव आहे.नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला “झुंड” हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला, चित्रपट लोकांना प्रचंड आवडला.त्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे.दरम्यान,आता नागराज मंजुळेंच्या नावापुढे डॉक्टर ही पदवी लागणार आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून नागराज मंजुळे यांचा मोठा सन्मान करण्यात आला आहे. नागराज मंजुळे यांना त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. प्रा.हनुमंत लोखंडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
पिस्तुल्या या शॉर्ट फिल्म मधून त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. या फिल्म साठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.त्यानंतर फॅंड्री हाही त्यांचा चित्रपट प्रचंड गाजला.आणि त्यानंतर आलेल्या “सैराट” ने मराठी चित्रपट सृष्टीत इतिहास रचला.शंभर कोटीच्या क्लब मध्ये दाखल होणारी सैराट ही पहिली मराठी फिल्म ठरली.हा चित्रपट देशात आणि विदेशात देखील प्रचंड लोकप्रिय झाल्याने त्याचा हिंदी रिमेक दिग्दर्शक करन जोहर यांनी केला.त्यांनी दिग्दर्शित केलेला आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला “झुंड” हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला,हा चित्रपट लोकांना प्रचंड आवडला.त्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे.
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना डॉक्टरेट
एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून नागराज मंजुळे यांनी प्रेक्षक आणि रसिकांच्या मनात घर केले आहे.
दरम्यान,डी वाय पाटील विद्यापीठाकडून नागराज मंजुळे यांचा मोठा सन्मान करण्यात आला आहे.
डी. वाय.पाटील विद्यापीठाने नागराज मंजुळे यांना सन्मानाची डॉक्टरेट ही पदवी दिली आहे.
नागराज मंजुळे यांनी चित्रपट क्षेत्रात लेखन,दिग्दर्शन आणि अभिनय त्यांच्या या विविध योगदानाबद्दल त्यांचा सन्मान केल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.
प्रा. हनुमंत लोखंडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करून नागराज मंजुळे यांना
डी. वाय. पाटील विद्यापीठाने डी.लीट पदवी प्रदान केल्याची माहिती दिली.
नागराज मंजुळे यांचे डॉक्टरेट पदवी स्वीकारतानाचे फोटो शेअर करत प्रा. लोखंडे यांनी म्हटले की, संघर्षाच्या काळात आपण एम.फिल किंवा SET/NET व्हावे अशी आपली इच्छा होती. त्यासाठी आपण पुणे विद्यापीठात चकरा मारतानाचे दिवस आजही मला आठवतात. आपण इयत्ता 10 सोडल्यापासूनचा ते ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ पर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. याचा साक्षीदार होणे हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे.
61व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये, फॅन्ड्रीला दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार मिळाला.
2018 मध्ये, मंजुळे यांनी मराठीत “उन्हाच्या कटाविरुद्ध” हे कवितेचे पुस्तक प्रकाशित केले
ज्याला भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला.
नागराज मंजुळे झी महाराष्ट्र कुस्ती दंगल मधील ‘वीर मराठवाडा’ या कुस्ती टीमचे मालक आहेत.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
जगातील सर्वात वृद्ध लोकांची यादी; भारतातील एकही व्यक्ती नाही
झुंड सिनेमा:झोपडपट्टी मध्ये जन्मलेले जागतिक दर्जाचे दिग्गज खेळाडू
काश्मीर फाईल्स:तेव्हा कुणीही अश्रू देखील ढाळले नाहीत-उद्धव ठाकरे
व्यवस्थेचे बळी : उद्या कदाचित तुम्ही सुद्धा…..
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 25, 2022 20 : 20 PM
WebTitle – director nagraj manjule has been honored doctorate by d y patil university