मुंबई, 10 नोव्हेंबर : काल सुतोवाच केल्याप्रमाणे आज सकाळी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषद घेत हायड्रोजन बॉम्ब फोडला आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर नवाब मलिक यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. बनावट नोटांच्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचं नवाब मलिकांनी म्हटलं आहे. इतकेच नाही तर मुख्यमंत्री पदावर असताना देवेंद्र फडणवीसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना मोठ-मोठ्या पदावर बसवल्याचा आरोपही केला आहे.
नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेत अत्यंत गंभीर आरोप करत म्हटलं आहे की मी देवेंद्र फडणवीस तुमच्यावर आरोप लावत आहे, जेव्हा 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी झाली तेव्हा मोदीजींनी सांगितलं की दहशतवाद, काळापैसा आणि मोठ्याप्रमाणावर असणाऱ्या बनावट नोटा संपविण्यासाठी आम्ही नोटबंदी लागू करत आहोत. जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा पूर्ण देशातून बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. पंजाब,मध्य प्रदेश, तमिळनाडूत बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.परंतु 8 ऑक्टोबर 2017 म्हणजेच जवळपास 1 वर्षापर्यंत राज्यात एकही बनावट नोटांचं एकही प्रकरण समोर आलं नाही. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणात बनावट नोटांचा खेळ महाराष्ट्रात सुरू होता.8 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबईतील बीकेसीत डायरेक्टर इंटेलिजेन्स रेव्हेन्यू ने एक छापेमारी केली ज्यामध्ये 14 कोटी 56 लाख पकडले गेले. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केली.
बनावट नोटा रॅकेट; तात्कालीन सरकारचं संरक्षण
साथियो , बनावट नोटांचं कनेक्शन हे आयएसआय, पाकिस्तान, दाऊद वाया बांगलादेशमार्फत देशभरात पसरवले जात आहे. 8 ऑक्टोबरच्या छापेमारीत 14 कोटी 56 लाख पकडले गेले. 14 कोटींच्या बनावट नोटा जप्त, प्रत्यक्षात 8 लाख 80 हजार दाखवले गेले. मुंबईतून एक अटक झाली पुण्यातून एकाला अटक झाली.यामध्ये इमरान आलम शेख, रियाज शेख आणि नवी मुंबईतून एकाला अटक केली. मात्र, 14 कोटी 56 लाख पकडले गेले आणि 8 लाख 80 हजार सांगत प्रकरण दाबलं गेलं.
पाकिस्तानच्या बनावट नोटा भारतात चालवल्या जातात… या प्रकरणात गुन्हा दाखल होतो आणि त्यातील आरोपींना काही दिवसांतच जामीन मिळतो. हे प्रकरण एनआयएला दिलं जात नाही.बनावट नोटा कुठून येत होत्या याचा शोध घेतला जात नाही. तपास होत नाही. याचं कारण म्हणजे जे लोक हे रॅकेट चालवत होते त्यांना तात्कालीन सरकारचं संरक्षण होतं. असं सांगितलं गेलं की, पकडलेला काँग्रेसचा नेता आहे. पण तो या शहरात कधीच कॉँग्रेसचा नेता नव्हता.खेळ असा होता की पकडला गेला तर काँग्रेस नेत्यांवर बिल फाडा.
आणि जो बनावट नोटांच्या प्रकरणातील आरोपी होता इम्रान आलम शेख त्याचा भाऊ हाजी अराफत शेख हा मोठा भाऊ आहे.
हाजी अराफत शेख याला देवेंद्र फडणवीसांनी पक्ष बदलून आपल्या पक्षात घेत महाराष्ट्राच्या अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष बनवलं असंही नवाब मलिक म्हणाले.
या आरोपांवर फडणविसांनी ट्विट करत अतिशय वादग्रस्त भाषेत उत्तर दिले आहे.
डुकराशी कधीच कुस्ती खेळू नये हे मी आधीच शिकलो आहे. त्यामुळे तुम्हीही घाणीने माखून जाता आणइ डुकरालाही तेच आवडत असतं, अशी वादग्रस्त टीका फडणवीस यांनी केली आहे.यामुळे आता नवाब मलिक यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
“जय भीम” फिल्म पाहिल्यानंतर अभिनेत्याने “पार्वती” साठी घर देण्याचे ठरवले
मलिक तुम्ही मुंबईच्या मारेकऱ्यांसोबत व्यवसाय का केला? – फडणवीस
देवेंद्र फडणवीस, उद्या सकाळी हायड्रोजन बॉम्ब फुटणार – नवाब मलिक
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 10, 2021 13:11 PM
WebTitle – Devendra Fadnavis suppresses 14 crore counterfeit notes case: Nawab Malik