सिल्लोड दि.07 : बुलढाणा विधानसभेचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांच्यावर अनु.जाती जमाती प्रतिबंध कायद्याच्या विरोधी असंविधानिक,सामाजिक तेढ निर्माण करणारे चेतावणी खोर वक्तव्य केल्यामुळे अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात यावा व त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी.या मागणीचे निवेदन पॅंथर सेना सामाजिक संघटनेतर्फे सिल्लोड तालुका कार्यकारी दंडाधिकारी तसेच मा मुख्यमंत्री यांना
निवेदन देण्यात आले.
यावेळी पॅंथर सेना तालुका प्रमुख भिकन सोनवणे
पॅंथर सेना सिल्लोड तालुका कोषाध्यक्ष जितेंद्र खरात,पॅंथर सेना तालुका सचिव सुबोध बनसोडे आदि उपस्थित होते.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Shivsena MLA Sanjay Gaikwad Buldhana) हे कायम वादग्रस्त वक्तव्यात सापडलेले दिसतात यावेळीही त्यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात ते “कुणी खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करत असेल तर तुम्ही त्यांच्यावर रॉबरीचे गुन्हे दाखल करा. तुम्हाला कुणी त्रास दिला तर मी तुम्हाला अस्त्र-शस्त्राची सगळी ताकद पुरवतो,” असं सामाजिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी करून राज्यात खळबळ उडवून दिली होती.
अॅट्रोसिटी कायदा हा आमच्या जीवन सुरक्षेचा प्रश्न असून त्याच्याविरोधी भाषा कदापि खपवून घेतली जाणार नाही.आजही जातियता कायम असून समाज जीवनामध्ये आम्ही जातीवाचक शब्द सर्रास ऐकतो,अनेक सामाजिक प्रश्नांना अनु जाती च्या लोकांना सामोरे जावे लागते.जोपर्यंत सामाजिक समता प्रस्थापित होणार नाही तोपर्यंत अशा कायद्याची अत्यंत आवश्यता आहे.असं भीकन सोनवणे यांनी यावेळी म्हटलं.
हे ही वाचा..मी 10 हजारांची फौज घेऊन येतो अन सर्वांना सरळ करतो ; संजय गायकवाड पुन्हा वादात
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 07 , 2021 12 : 02 PM
WebTitle – Demand for action against Shiv Sena MLA Sanjay Gaikwad 2021-07-07
Thanks,