बुलढाणा दि.०१ : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Shivsena MLA Sanjay Gaikwad Buldhana) हे कायम वादग्रस्त वक्तव्यात सापडलेले दिसतात यावेळीही त्यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात ते “कुणी खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करत असेल तर तुम्ही त्यांच्यावर रॉबरीचे गुन्हे दाखल करा. तुम्हाला कुणी त्रास दिला तर मी तुम्हाला अस्त्र-शस्त्राची सगळी ताकद पुरवतो,” असं वक्तव्य करताना दिसत आहेत.या वक्तव्यामुळे राज्यात खळबळ उडाली असून सोशल मिडियात लोकांनी संजय गायकवाड यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू केला आहे.
काय आहे घटना?
दहा दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या अंबिकापूर गावात झालेल्या हिंसक घटनेची पार्श्वभूमी आहे. खामगावच्या अंबिकापूरमध्ये वाघ आणि हिवराळे कुटुंबात जुने वाद आहेत यातून काही दिवसांपूर्वी या दोन कुटुंबियात तुंबळ हाणामारी झाली. यात दोन्ही कुटुंबातील सदस्य जखमी झाले होते. यानंतर संजय गायकवाड हे वाघ कुटुंबाच्या सांत्वनासाठी गावात गेले असताना त्यांनी तिथं गावकऱ्यांशी चर्चा करताना हिंसक भाषा वापरत चिथावणीखोर विधान केले.
आरक्षणाचे जनक धाडसी छत्रपती शाहू महाराज
गावकऱ्यांशी बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, मला मातोश्रीवरून फोन आला की या गावात जा.आणि तेथील लोकांना धीर द्या. म्हणून मी इथं आलो.गृहमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai ) यांनी देखिल पोलिसांची चर्चा केली.अॅट्रॉसिटी कायदा रक्षणासाठी आहे.अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करून ब्लॅकमेल करून अनेक लोकांकडून पैसे वसूल केले जातात.अवैध धंदे या गावात प्रचंड प्रमाणात चालतात.छोट्या मोठ्या गोष्टी असतील बोकड चोरी असेल.त्यातून पोट्या आणि देव्या या दोघांनी या गावात दहशत निर्माण केली आहे.आणि दुर्दैवाने सर्व समाजाने त्यांना साथ दिली.बाबासाहेब आंबेडकरांना असा समाज कधीच अपेक्षित नव्हता.बाबासाहेबांनी लोकांचे रक्षण करायला शिकवलं.परंतु आज गावगुंडांचे समर्थन करून एका परिवारावर हल्ला केला जातो.ही दुर्दैवी बाब आहे,तसेच मी इथल्या मुस्लिम समाजाचे अभिनंदन करेन त्यांनी जात पात न बघता इथल्या महिलांना मदत केली.
समाजातल्या गावातल्या लोकांना मी सांगेन की जर कुणी अॅट्रॉसिटीचा खोटा रिपोर्ट देवून ब्लॅकमेल करत असेल तर तुम्ही देखिल डायरेक्ट रॉबरीची कंप्लेन्ट त्याच्या क्रॉस मध्ये द्यायची गळ्याला चाकू लावला,चैन हिसकली, खिशातले पैसे हिसकावले अशाप्रकारे तुम्ही तक्रार दिली तर तो झक मारून अॅट्रॉसिटी केस मागे घेतो.हे पहिलं सगळं समजून घ्या.
कुणी याच्यापुढे जर खोटी अॅट्रॉसिटी दिली तर रॉबरी टाकायची म्हणजे टाकायचीच आणि मग कोणता ठाणेदार घेत नाही ते आम्ही पाहतो.
क्रॉस कंप्लेन्ट दिल्याशिवाय त्या रॉबरी मध्ये तीन महीने जामीन होत नाही.
तुमच्या अॅट्रॉसिटीत तत्काळ जामीन होतो.आणि शेतीच्या.
जागेच्या वादावरून अॅट्रॉसिटी होत नाही.हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे.हे पण लक्षात घ्या.
आणि म्हणून आता इथं शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ते सगळे मराठा समाजाचे आहेत सगळ्यांना सांगतो आमच्या इकडेही अशी काही गांव होती.
ज्या गावांमध्ये एखादा समाज कमी असला की त्याच्यावर अन्याय करायचा तुटून पडायचं मारामाऱ्या करायच्या दंगली करायच्या आमच्याकडे अशी बरीच गांव होती.
आम्ही आजूबाजूच्या मर्द पोरांची टीम तयार केली.गावागावात शाखा केल्या.
तुम्हाला माझं आवाहन आहे की अशाप्रकारे कुणी अन्याय करत असेल आजूबाजूच्या २५ गावाची टीम तयार करा.
ज्या दिवशी असा अन्याय होईल पंचवीस च्या पंचवीस गावं तुटून पडा.
मग बघतो कुणाची माज मस्ती या ठिकाणी शिल्लक राहते.
आणि जर भविष्यात पुन्हा हा प्रकार झाला. तर मी स्वत: दहा हजारांची फौज घेऊन याठिकाणी येईल.
आणि जे काही अशा भानगडी करतील त्याला फटक्यात सरळ करीन.
व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
https://www.facebook.com/Dhirajbgaikwad/videos/4236964716356323/
या वक्तव्यामुळे राज्यात खळबळ उडाली असून सोशल मिडियात लोकांनी संजय गायकवाड यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू केला आहे.
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 01 , 2021 20 : 21 PM
WebTitle – shivsena buldhana mla sanjay gaikwad controversial video goes viral 2021-07-01