नवी दिल्ली : उत्तर-पश्चिम दिल्ली येथील शाहबाद डेअरी परिसरात एका 16 वर्षीय मुलीवर तरुणाने 20 हून अधिक वेळा वार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली. Delhi Sakshi Murder Case यादरम्यान घटनास्थळी त्याच रस्त्याने जाणाऱ्यांनी आरोपीला रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत.तो वार करत राहिला;लोक बघत राहिले.या निर्घृण हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. दरम्यान,हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपीला पकडण्यात यश आले असून.आरोपीने दिल्ली पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे.
Delhi Sakshi Murder Case आरोपीची कबुली कोणताही पश्चाताप नाही
आरोपीचे नाव मोहम्मद साहिल सरफराज असं असून तो एसी-फ्रीज मेकॅनिक असल्याचे समजते.दिल्ली पोलिसांच्या चौकशीत साहिलने आपण केलेल्या गुन्ह्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे सांगितले आहे. साहिलने सांगितलं की, घटनेच्या वेळी तो खूप संतापला होता. यामागचे कारण सांगताना तो म्हणाला की, अनेक दिवसांपासून मुलगी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. मुलीला साहिलसोबत ब्रेकअप करायचे होतं, त्यामुळेच तिने साहिलपासून दुरावा राखायला सुरुवात केली होती, साहिलला हे सहन होत नव्हतं.
मुलीची हत्या केल्यानंतर साहिलने पुरावा नष्ट करण्यासाठी रिठाला परिसरात चाकू फेकून दिल्याचे पोलिसांनी सांगितले.साहिलला ताब्यात घेऊन पोलीस पुरावे गोळा करणार आहेत. चाकू फेकल्यानंतर साहिल बस पकडून बुलंदशहरला गेला.पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने दोन वेगवेगळ्या बसने प्रवास केल्याची माहिती समोर आलीय.साहिल हातात बांधलेल्या कलावा अन रुद्राक्ष माळ संदर्भात पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत आहे. रात्रभर झालेल्या चौकशीत साहिलने पोलिसांना सांगितले की, पीडितेच्या हत्येचा आपल्याला कोणताही पश्चाताप नाही. तिला माझ्यासोबतचे नाते संपवून तिच्या जुन्या प्रियकराकडे जायचे होते.त्यामुळे मी हत्या केली.असं त्यानं गुन्ह्याची कबुली देताना म्हटलंय.
तो वार करत राहिला;लोक बघत राहिले
समोर आलेल्या सीसीटीव्हीमध्ये साहिल च्या चेहऱ्यावर राग असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
साहिल सतत एकामागून एक तरुणीवर चाकूने हल्ला करत आहे. दरम्यान, एका व्यक्तीने त्याला समजावण्याचाही प्रयत्न केला,
मात्र तो थांबला नाही. चाकूने हल्ला करून कंटाळलेल्या साहिलने शेजारी पडलेला मोठा दगड उचलून मुलीच्या चेहऱ्यावर आघात केला.
आणि तो आघात करतच राहिला.
एका फोन कॉल ने पकडला गेला
वडिलांना फोन केल्यानंतर या हत्याकांडातील आरोपीला अटक करण्यात आली.पोलिसांनी साहिलला कसे अटक केली याचा खुलासा करताना, पोलिसांनी माहिती दिली की,फोन बंद केल्यानंतर आरोपी साहिल अज्ञातवासात गेल्याचे सांगण्यात आले.त्याने फोन स्विच ऑफ केला होता.पोलीस सूत्रांनी सांगितले की, घटनेनंतर आरोपी पळून गेला आणि बुलंदशहर येथे त्याच्या नातेवाईकाच्या घरी लपण्यासाठी गेला.मात्र, आरोपीने वडिलांना फोन केल्यानंतर त्याच्यावर तांत्रिक पाळत ठेवण्यात आली होती. ज्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
या घटनेचा सुमारे 90 सेकंदांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे,
ज्यामध्ये आरोपी मुलीला एका हाताने भिंतीकडे ढकलल्यानंतर वारंवार चाकू मारताना दिसत आहे. मुलगी जमिनीवर पडूनही तो थांबत नाही,
तिला 20 हून अधिक वेळा वार करताना दिसतो आहे, तिला अनेक वेळा लाथ मारतो
आणि नंतर शेजारी पडलेला मोठा दगड उचलून मुलीच्या चेहऱ्यावर आघात करताना दिसतो आहे.
हे सगळं घडत असताना बाजूने जाणारे नागरिक कोणत्याप्रकारे मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत नाहीत,
तो वार करत राहिला अन लोक बघत राहिले.कुणीतरी हिंमत करून त्याला अडवलं असतं तर कदाचित तिचा जीव वाचला असता,
पण समाज म्हणून आपण आज कोणत्या पातळीवर आहोत हे या घटनेमुळे समोर आले आहे.
वैष्णोदेवी दर्शनाला जाणाऱ्या बस चा भीषण अपघात , 10 जणांचा मृत्यू
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on 30, MAY 2023, 12:42 PM
WebTitle – Delhi Sakshi Murder Case latest update