दिल्ली : (Delhi Murder) दिल्ली मध्ये पुन्हा फ्रीज हत्याकांड पतीचे 22 तुकडे: राजधानी दिल्लीत श्रद्धा वॉकर मर्डर (Shraddha Murder Case) केससारखे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. दिल्लीत पत्नीने पतीची हत्या करून मृतदेहाचे 22 तुकडे केले आणि अनेक दिवस घराच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले. आरोपी महिला दररोज रात्री आपल्या मुलासोबत मृतदेहाचे तुकडे लपवण्यासाठी जात असे. जूनमध्ये दोघांनी मिळून ही हत्या केली.यामुळे दिल्ली पुन्हा हादरली आहे.
दिल्ली हत्याकांड फ्रीज
मृताच्या दारूच्या व्यसनामुळे आई आणि मुलगा त्याच्यावर संतापले होते. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजन दास यांच्या मृतदेहाचे 22 तुकडे करून त्यांची हत्या करण्यात आली होती, त्यातील 12 ते 15 तुकडे तपास करून पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. मात्र धड अद्याप सापडलेले नाही. मृत व्यक्ती लिफ्ट मॅन होती अशी माहिती समोर आली आहे. तसेच पत्नी गृहिणी तर मुलगा खासगी नोकरी करत होता.शिकारीच्या चाकूने व अन्य शस्त्राने मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेलं शस्त्र पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलं आहे. मात्र शिकारीचा चाकू सापडलेला नाही. मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये लपवून ठेवल्यानंतर घराला दुर्गंधी येऊ नये म्हणून रंगरंगोटी देखील करण्यात आली होती. अनेक महिने आई आणि मुलगा पांडव नगर आणि पूर्व दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात मृतदेहाचे तुकडे फेकत राहिले होते.
शवाच्या दुर्गंधीमुळे ही घटना उघडकीस आली
पांडवनगर येथील रामलीला मैदानावर रात्री फ्रिजमध्ये ठेवलेले मृतदेहाचे तुकडे आई आणि मुलगा फेकत असत.
परिसरात तीव्र दुर्गंधी पसरू लागली त्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्याबाबत पोलिसांकडे तक्रार केली.तपास केल्यावर तिथे मृतदेहाचे तुकडे आढळून आले.
यानंतर पोलिसांनी नजीकच्या पोलिस ठाण्यात बेपत्ता लोकांच्या तक्रारीचा तपास सुरू केला आणि जसजसा तपास पुढे गेला तसतसे अंजन दास बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी रामलीला मैदानाभोवती लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेतला. त्याला आई आणि मुलाला काहीतरी फेकताना दिसले. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेत त्रिलोकपुरी येथील घर गाठले जेथे ते भाड्याने राहत होते. घरात तपास केल्यावर तिथे मृतदेहाचे उर्वरित तुकडे फ्रीजमध्ये ठेवल्याचे आढळून आलं. पोलिसांनी आई अन मुलाची कसून चौकशी केल्यावर त्यांनी हत्येची कबुली दिली. घरमालक लक्ष्मी यांनी सांगितले की, पती, पत्नी आणि मुलगा त्यांच्या घरी ५ वर्षांपासून राहत होते. त्यांच्यात अनेकदा भांडण होत असे.
श्रद्धा खून प्रकरणाच्या तपासाशीतून उघड झाले कांड
श्रद्धा खून प्रकरणाच्या तपासातून हे कांड उघड झाले.पोलिसांना ५ जून रोजीच मृतदेहाचे तुकडे सापडले.
मात्र या हत्येप्रकरणी कोणतीही तक्रार किंवा एफआयआर नाही,त्यामुळे मृतदेहाचे तुकडे कोणाचे आहेत हे पोलिसांना कळू शकले नाही.
दरम्यान, श्रद्धा खून प्रकरण उघडकीस आले. आणि दोन्ही प्रकरणांचा एकमेकांशी संबंध जोडून तपास सुरू केला.
त्यानंतर हे तुकडे त्रिलोकपुरी येथे राहणाऱ्या अंजन दास यांचे असल्याचे पोलिसांना समजले.
श्रद्धा वालकर मर्डर केस: राशिद खान निघाला विकास कुमार,पोलिसानी केली अटक
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 28,2022, 22 :30 PM
WebTitle – Delhi Murder Again 22 pieces in the fridge, the wife killed the husband