अहमदनगर : माजी शिवसेना नेता आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे माजी PA स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी दीपाली सय्यद यांच्यावर राज ठाकरे यांची हत्या करण्याचा कट केल्याचा आरोप करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. अहमदनगर येथे पत्रकार परिषदे मध्ये भाऊसाहेब शिंदे यांनी हे आरोप केले आहेत.
दीपाली सय्यद चालवत असलेल्या एनजीओ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून होणारे व्यवहार सर्व बेकायदेशीर असून
त्यांच्याकडे येणारा पैसा हा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा असल्याचा गंभीर आरोप देखील
दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केलाय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी दीपाली सय्यद यांनी केलाय.
मात्र दीपाली सय्यद यांनी यासंदर्भातील आरोप फेटाळले आहेत.
मध्यंतरी अभिनेत्री दीपाली सय्यद भोसले यांनी ट्रस्टच्या माध्यमातून राज्यपालांच्या हस्ते पुरस्काराही दिले होते. भाऊसाहेब शिंदे म्हणाले,दीपाली सय्यद भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सातशे ते आठशे कोटी रुपयांचा व्यवहार झालाय हा सगळा पैसा आला कुठून याची चौकशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी करावी .राज्य सरकारने आपल्याला संरक्षण दिल्यास दीपाली सय्यद यांचे दाऊदसोबत असलेल्या संबंधांचे मी तुम्हाला ऑडिओ ,व्हिडिओ आणि फोटो सुद्धा देतो,मी त्यासाठी तयार आहे. असेही भाऊसाहेब शिंदे म्हणाले आहेत.
राज ठाकरे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप
दीपाली सय्यद यांनी दिल्लीत दहा ते बारा वेळा भेट दिली असून त्यांनी भाजपचे खासदार बृज भूषण शरण सिंग यांची भेट घेऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केलाय.अयोध्या दौऱ्यात भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांना सय्यद उचकावत होत्या, यासाठी त्यांना एका मोठ्या नेत्याचा आधार होता, असा आरोपही शिंदे यांनी केला.
आरोपांवर दीपाली सय्यद काय म्हणाल्या?
मी कोणी मोठी नाही की घोटाळे करु शकेन. मला त्या व्यक्तीवर काही बोलायचं नाही. कधी मी गेले? कधी भेटले? काय असेल ते शोधा मला दाखवा. मी हे सर्व आरोप फेटाळते आहे. दीपाली सय्यद नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.
मुख्यमंत्र्यांचा रस्ता अडवू; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा इशारा
वंचित आघाडी व शिवसेना युती संदर्भात लवकरच घोषणा
फ्रॅक्चर्ड फ्रीडम कोबाड गांधी ; पुस्तकात नेमकं काय?
भगवान बुद्धांच्या मूर्तीला भगव्या रंगाने रंगवण्यावरून वाद, प्राचार्यांचे स्पष्टीकरण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 28,2022, 15:52 PM
WebTitle – Deepali Syed hatched a conspiracy to kill Raj Thackeray