भाजप च्या आमदाराने आश्रमाचा मार्ग अडवल्याचा आरोप करत राजस्थानमधील जालोरमध्ये एका हिंदू साधू ने आश्रमातच झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.राजस्थानमध्ये 20 दिवसांच्या आत या दुसऱ्या हिंदू साधू ने आत्महत्या केल्याचं वृत्तसमोर आलं आहे.घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांना झाडावरून मृतदेह काढायचा होता, मात्र स्थानिकांच्या आंदोलनामुळे त्यांना ते शक्य झाले नाही. संताची आत्महत्येची चिठ्ठी अगोदर सार्वजनिक करावी, अशी मागणी आश्रमातील ग्रामस्थ आणि साधू करत होते. प्रशासनाने त्यांची मागणी मान्य केल्यानंतर 28 तासांनी मृतदेह बाहेर काढण्यात आला.
फ्रीप्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार,याठिकाणी पुन्हा दगडफेकीची घटना देखील घडली,मृत हिंदू साधू चा अंत्यसंस्कार करायचा असल्याने आणखी एक वाद निर्माण झाला. प्रशासनाने परवानगी न दिल्याने दगडफेकीची घटनाही घडली. दगडफेकीत 20 हून अधिक लोक आणि एक हवालदार जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.जिथे अंत्यसंस्कार करायचा होता ती जागा भाजप आमदाराची असल्याचे समजते.त्यामुळे तिथं अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्यात आली नाही.त्यामुळे वाद झाला.
जालोर जिल्ह्यातील राजपुरा गावात गुरुवारी रात्री उशिरा हनुमान आश्रमातील हिंदू साधू रविनाथ महाराज (६०)
यांनी आश्रमात आत्महत्या केल्याची घटना घडली.
याआधी शुक्रवारी रात्री भीनमाळचे भाजप आमदार पुराराम चौधरी यांच्यासह
तीन जणांवर साधूला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अद्याप कोणालाही अटक नाही
मिळालेल्या माहितीनुसार, भीनमाळचे भाजप आमदार पुराराम चौधरी यांची आश्रम आणि सुधा माता रस्त्यालगत २० बिघा जमीन आहे. या जागेवर आमदार चौधरी यांचे रिसॉर्ट प्रस्तावित असून, त्यांनी आश्रमाला जाण्याचा मार्ग अडवत सीमाभिंत बांधल्याचा आरोप आहे.आश्रमात जाणारा रस्ता बंद केल्याने आणि आमदाराच्या धमक्यांमुळे हिंदू साधू संत रविनाथ त्रस्त झाल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे शेवटी त्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.
जसवंतपुरा पोलिस स्टेशनचे अधिकारी मनीष सोनी यांनी सांगितले की, संताचा पुतण्या बाबूराम याने
भाजप आमदार पुराराम चौधरी, ड्रायव्हर धनसिंग आणि बिजनाथ उर्फ चोगाराम यांच्याविरुद्ध
हिंदू साधू ला जातीवाचक शेरेबाजी आणि मारहाण केल्याप्रकरणी तसेच धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
येथे हे नमूद करणे आवश्यक आहे की सुमारे 20 दिवसांपूर्वी हिंदू साधू संत विजयदास यांनी
जिल्ह्यातील अवैध खाणकामाच्या निषेधार्थ भरतपूर येथे स्वतःला पेटवून घेतले होते.यात त्यांच्या मृत्यू झाला.
पा रंजित यांच्या धम्मम चित्रपटात दाखवलेला बुद्ध वादाचा विषय का ठरू लागलाय?
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 06 2022, 19:30 PM
WebTitle – Dead body of Hindu monk hanged for 28 hours; A case has been registered against three people including the BJP MLA