भारतीय जनता पक्षाशी संबंधित लेखक दया प्रकाश सिन्हा यांच्या ‘सम्राट अशोक’ बद्दल केलेल्या अत्यंत वादग्रस्त विधानानंतर बिहारच्या राजकारणात वाद निर्माण झाला आहे.दया प्रकाश सिन्हा यांना 2021 साली ‘सम्राट अशोक’ या नाटकासाठीच साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या वक्तव्यात सिन्हा यांनी सम्राट अशोक यांची तुलना मुघल सम्राट औरंगजेब शी केली असून, त्यानंतर ठिकठिकाणी पुतळे जाळून त्यांचा विरोध होत आहे.
बिहारमध्ये एनडीए आघाडीच्या नेतृत्वाखाली सरकार चालवणाऱ्या जेडीयू नेतृत्वानेही त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह यांनी तर दया प्रकाश सिन्हा ‘पद्मश्री’ सन्मानास पात्र नसल्याचे म्हटले आहे.
त्याचवेळी जेडीयू नेते आणि माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी पत्रकारांशी संवाद साधत दया प्रकाश सिन्हा यांच्याकडून ‘पद्मश्री’ सन्मान काढून घेण्याची मागणी केली आहे.
या संपूर्ण संदर्भात जेडीयूचे मुख्य प्रवक्ते नीरज कुमार म्हणाले , “नितीश कुमार हे देशातील पहिले राजकारणी आहेत ज्यांनी सम्राट अशोकाच्या नावाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. सम्राट अशोकाची जयंती साजरी करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले .”
“सम्राट अशोकाचे व्यक्तिमत्व आणि कार्य नव्या पिढीसमोर मांडण्याचा प्रयत्न सुरू असून, भाजपशी संबंधित कोणीही अशा फालतू गोष्टी बोलेल तेव्हा केंद्र सरकारने सम्राट अशोकावर केलेल्या कार्याबद्दल त्यांना मिळालेला प्रतिष्ठेचा पुरस्कार मागे घ्यावा. भाजपच्या राज्य युनिटकडूनही त्यांना अपेक्षा आहे की ते त्यांच्या मागणीला पाठिंबा देतील.
कोण आहेत दया प्रकाश सिन्हा ?
भाजपमध्ये येण्यापूर्वी दया प्रकाश सिन्हा आयएएस अधिकारी होते.सध्या ते भाजपमध्ये राष्ट्रीय सांस्कृतिक सेलचे राष्ट्रीय संचालक आहेत.
मुलाखतीत नेमकं काय म्हणाले सिन्हा ?
एका वृत्तपत्राला दिलेल्या या मुलाखतीत ते म्हणाले होते की, सम्राट अशोकावरील नाटकांचा अभ्यास आणि लेखन करताना त्यांनी अशोकाच्या चारित्र्यावर खूप संशोधन केले आणि अशोक आणि औरंगजेबाच्या पात्रात अनेक साम्य असल्याचे आढळून आले.
ते म्हणाले की या दोन्ही राज्यकर्त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात अनेक पापे केली, नंतर त्यांची पापे नजरेआड व्हावीत म्हणून ते लपवण्यासाठी अति-धार्मिकतेचा अवलंब केला. दोघांनी आपल्या भावाची हत्या करून वडिलांना तुरुंगात टाकले. अशोकाने आपल्या पत्नीला जाळून टाकले कारण तिने एका बौद्ध भिक्षूचा अपमान केला होता.
दया प्रकाश सिन्हा यांनी त्या मुलाखतीदरम्यान आपला मुद्दा रेटताना तिबेटी लेखक तारानाथ यांचाही उल्लेख केला की अशोकच्या चेहऱ्यावर अनेक जखमा होत्या आणि तो कुरूप दिसत होता.याशिवाय तो सुरुवातीच्या काळात कामुक असायचा. बौद्ध साहित्यात अशोकाला कामाशोक आणि चंडशोक असेही म्हटले गेले आहे.
इतिहासकारांचे मत
प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि भाषा वैज्ञानिक डॉ. राजेंद्र प्रसाद सिंह यांनी यासंदर्भात मूलभूत प्रश्नावरच प्रहार केला असून ज्या पुस्तकावरून दया प्रकाश सिन्हा यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला ते पुस्तकच चुकीच्या संदर्भ आणि चुकीच्या इतिहासावर आधारित असून लेखक दया प्रकाश सिन्हा सुद्धा पुरस्कारासाठी लायक नसल्याचे म्हटले आहे.त्यांनी तुलना करताना केलेले वक्तव्य हे अनुचित चुकीचं आणि आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे.चंडशोक किंवा चंड अशोक असा कोणताही शब्द आर्केलॉजिकल हिस्ट्री मध्ये मिळत नाही,अशोक कुरूप होता असा कोणताही पुरावा नसून उलट पियदस्सी सम्राट अशोक म्हणजे जो दिसण्यातच सुंदर आहे असा,आणि हे लोक त्याला कुरूप म्हणून बदनाम करत आहेत.शिवाय सम्राट अशोक यांनी आपल्या वडिलांना भावाला अटक केली तुरुंगात टाकले हेही खोटं आहे.पत्नीला जाळले हे सुद्धा अत्यंत खोटे विधान असल्याचे यावेळी डॉ. राजेंद्र प्रसाद सिंह यांनी स्पष्ट केले.
बिहारमध्ये राजकीय विरोध
मुलाखतीदरम्यान दया प्रकाश सिन्हा (Daya Prakash Sinha) यांच्या वक्तव्यानंतर बिहारमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी त्यांचा पुतळाही जाळण्यात आला.
अशा लोकांवर कठोर कारवाई व्हायला हवी,असे राज्याचे प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी सांगितले.
ते म्हणाले, “त्यांच्यावर एफआयआर दाखल झाला पाहिजे. ते भाजपचे नेते असल्याने आणि त्यांचा सन्मान केला जात असल्याने तो सन्मान परत केला पाहिजे, परंतु अशावेळी भाजपसह जदयूला सोडणे योग्य होणार नाही. (U)”) केवळ वक्तृत्व करून नेतृत्व टिकू शकत नाही.
ओबीसी महासभा ने जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईसाठी निवेदन दिले
ओबीसी महासभा जिल्हा ग्वाल्हेरच्या नेतृत्वाखाली आज आयुक्त कार्यालय, मोती महल ग्वाल्हेर येथे ओबीसी प्रवर्गाचे 51 टक्के आरक्षण 9व्या अनुसूचीमध्ये ठेवल्याच्या निषेधार्थ आणि इतिहासकार दया प्रकाश सिन्हा यांनी सम्राट अशोकाविषयी केलेल्या उद्धट वक्तव्याच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले.
ओबीसी महासभेची मागणी,पद्मश्री काढून घेऊन फौजदारी गुन्हा दाखल करा
ओबीसी महासभेच्या वतीने ओबीसींच्या विविध मागण्यांबाबत
आणि दयाप्रकाश सिन्हा सम्राट अशोक मौर्य महान यांच्यावर केलेल्या अवमानकारक वक्तव्याबाबत
सर्व जिल्ह्यांमध्ये राष्ट्रपती, राज्यपाल यांच्या नावाने पद्मश्री पुरस्कार मागे घेऊन
त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी मागणी करण्यात आली.
भाजपकडून गोंधळाची भूमिका
एकीकडे भाजपचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी म्हणतात लेखक दया प्रकाश सिन्हा यांचा भाजपशी काहीही संबंध नाही.त्यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने प्रसारित केल्याचे ट्विट करतात.
दुसरीकडे मात्र, बिहारमधील भाजपचे प्रवक्ते आणि राष्ट्रीय ओबीसी मोर्चा सेक्रेटरी निखिल आनंद यांनी ही संपूर्ण तुलना दुर्दैवी असल्याचे म्हटलंय.ते म्हणतात, “दया प्रकाश सिन्हा यांच्या विशेष विचारसरणीने प्रेरित केलेल्या निकृष्ट साहित्यकृतीने भारतीय समाज समूहाच्या श्रद्धा दुखावल्या आहेत. साहित्याच्या नावाखाली इतिहासाची कबर खोदणे हे निषेधार्ह आहे.”
भाजपशी युती असणारे एनडीए चा एक घटक पक्ष असणारे जनतादल युनायटेड,
जेडीयू संसदीय मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह म्हणाले की,
बृहन् अखंड भारताचे निर्माते चक्रवर्ती सम्राट प्रियदर्शी अशोक महान यांच्यासाठी
पक्षाच्या एका कार्यकर्त्याने अशोभनीय शब्दांचा वापर करणे निंदनीय आहे.पक्ष आणि सरकारने त्या व्यक्तीवर कारवाई करावी.
महाराष्ट्र शांत
महाराष्ट्रात मात्र या मुद्यावरून राजकीय किंवा सामाजिक परीप्रेक्षातून अजून कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटलेल्या नाहीत.
मालविका बनसोड कोण आहे,जिने सायनाला हरवून इतिहास रचला
हायपरसोनिक शस्त्र कोणती आहेत…भारताकडे अशी शस्त्र आहेत?
पुष्पा बॉक्स ऑफिस कलेक्शन: चित्रपटाची हिंदी आवृत्ती 75 कोटीजवळ
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा, )
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 14, 2022 21: 36 PM
WebTitle – Daya Prakash Sinha; Samrat Ashoka-Aurangzeb comparison, the atmosphere in Bihar politics deteriorated