राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यावतीने समाज कल्याण कार्यालयामार्फत अनु. जाती, विजाभज, इमाव, विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी, राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व विद्यावेतन विद्यार्थी वर्गासाठी शिष्यवृत्ती योजना
https://mahadbtmahait.gov.in/ या प्रणालीवरुन ऑनलाईन राबविण्यात येत आहेत.
विद्यार्थी वर्गासाठी शिष्यवृत्ती योजना यानुसार महाविद्यालयातील या योजनांचे नविन/नुतनीकरणाचे अर्ज Mahadbt या प्रणालीवर भरण्याची सुविधा ३ डिसेंबर २०२० पासुन सुरु होत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी पोर्टल कार्यान्वित
मुंबई, दि. 7 : सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी डीबीटी (MAHADBT) पोर्टल दि. ०३ डिसेंबर २०२० पासून कार्यान्वित झाले असून, https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क परीक्षा शुल्काच्या प्रलंबित अर्जाबाबत
महाडिबीटी संगणक प्रणाली सन २०१९-२० मधील विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे,
अर्ज अद्ययावत करणे तसेच विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज पुढील कार्यवाहीसाठी फॉरवर्ड करणे इत्यादी करिता
महाडिबीटी संगणक प्रणाली दि.०३.१२.२०२० पासून सुरु करण्यात आली आहे.
सबब सर्व महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की, महाविद्यालय स्तरावरील सर्व प्रलंबित अर्ज
दिलेल्या कालावधीत पडताळणी करुन त्यावर योग्य ती कार्यवाही करावी.
तसेच सन २०१९-२० या वर्षातील महाडिबीटी संगणक प्रणालीमध्ये प्रलंबित राहिल्यास आपोआप नामंजूर करण्यात येतील.
याची नोंद घ्यावी. कालमर्यादत प्रलंबित अर्जावर योग्य ती कार्यवाही करावी.
या अनुषंगाने उपराक्त सूचनांचे पालन न केल्यास व शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या बँक खात्यावर जमा न झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थ्याची असेल व याबाबत सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी राहणार नाही. याची सर्व प्राचार्य व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)