तामिळनाडू: भारतात आजही 21 व्या शतकात हिंदू धर्मात अस्पृश्यता पाळली जात असल्याचे अनेकदा समोर येते,आपल्याच धर्मातील व्यक्तींना जनावरांच्या दर्जाची वागणूक देण्याचे प्रकार समोर येतात. कधी कधी यामुळे शरम वाटते तर कधी असे प्रकार धर्मांध जातीयवादी समर्थन करत योग्य ठरवत असतात,असाच एक प्रकार समोर आला आहे.तामिळनाडूतील विल्लुपुरम जिल्ह्यातील मेलपाडी येथे असलेले द्रौपदी अम्मन मंदिर (Droupadi Amman Temple Dalit issue) बुधवारी प्रशासनाने सील करत मंदिराला टाळे लावण्यात आले आहे.दलित समाजातील व्यक्तीच्या मंदिर प्रवेश करण्याच्या मुद्यावरून वाद निर्माण झाला होता, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
दलित आणि तथकथित उच्चजातीयवादी एकाच धर्मात कसेकाय असू शकतात?
कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळण्याच्या भीतीपोटी अधिका्यांनी ही कारवाई केली आहे. मंदिरात प्रवेशाबद्दल तथाकथित उच्चजातीयवादी आणि त्याच धर्मातील तथाकथित मागास जाती ज्यांची ओळख व्हावी म्हणून दलित संबोधले जाते यांच्यात मंदिर प्रवेश मुद्यावरून वाद आहे. 2023 एप्रिल मध्ये दलितांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखल्यानंतर हा वाद उद्भवला.इथं प्रश्न हाही उपस्थित होतो की एकाच धर्मातील लोक असूनही त्यांना त्याच धर्माच्या प्रार्थनास्थळावर जाण्यास बंदी असेल तर ते दोघे एकाच धर्मात कसेकाय असू शकतात?
जिल्हा प्रशासनाचे अधिकारी वाटाघाटीद्वारे समस्येचे निराकरण करू शकले नाहीत
जिल्हा प्रशासनाच्या अधिका्यांनी दलित आणि तथाकथित उच्चजातीयवाद्यांशी बोलून हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला,
परंतु विरोध संपला नाही. हे मंदिर हिंदु धार्मिक आणि सेवाभावी एसएनटीज (एचआर अँड सीई) विभागाद्वारे व्यवस्थापित केले जाते.
मंदिरात दलित व्यक्तीना प्रवेश थांबविण्यात आला तेव्हा वाद सुरू झाला
पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार,यावर्षी 2023 एप्रिलमध्ये दलित समाजातील एका व्यक्तीने मंदिरात प्रवेश केला होता. त्यावेळी तथाकथित उच्चजातीयवाद्यांच्या लोकांनी त्याचा विरोध केला. त्यानंतर त्यांनी दलितांना मंदिरात जाण्यापासून रोखले. त्यानंतर दलित समाज आणितथाकथित उच्चजातीयवाद्यांच्यात वाद झाला आहे. या प्रकरणात चार केसेस नोंदविण्यात आल्या आहेत. म्हणूनच, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चिघळू नये म्हणून अधिकाऱ्यानी मंदिरच सील करून टाळे ठोकले आहे.
अप्रिय परिस्थिती थांबविण्यासाठी पोलिस दल तैनात
कोणत्याही अप्रिय परिस्थिती रोखण्यासाठी गावात पोलिस दल तैनात करण्यात आले आहे.
दरम्यान, विलूपुरमचे खासदार डी रविकुमार यांनी सोमवारी जिल्हाधिकारी सी पलानी यांना निवेदन सादर केले,
अन विनंती केली की सर्व भक्तांना कोणत्याही जातीच्या अडसरशिवाय मंदिरात जाण्याची परवानगी द्यावी.
8 वर्षीय मुलीवर बलात्कार, 80 वर्षीय पुजारी ला अटक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 07, JUN 2023, 15:52 PM
WebTitle – Dalit people entered the temple, the so-called upper caste people objected, the temple locked