घोड़ी पर क्यू चढ़ने नहीं देते? घोड़ी आपकी क्या लगती है? घोडीवर का चढू दिले जात नाही? घोडी तुमची कोण लागते? हा प्रश्न 21 व्या शतकातही अनुत्तरित आहे.एखाद्या जनावरावर चढून बसलं की काही लोकांना राग का येतो? संताप येतो? ही कसली वेडसर माथेफिरू अमानवी खुळचट अशी जातीची अंधश्रद्धा आहे कळत नाही. पण हिंदू धर्मातील तथाकथित उच्चजातीय जातीयवाद्यांच्या साठी ही गोष्ट प्रतिष्ठेची केली जातेय.आपल्याच धर्मातील तथाकथित खालच्या जातीतील व्यक्तीला आजही अमानुष वागणूक देत भेदभाव करण्याची वृत्ती कमी झालेली नाही.दुसरीकडे या नीच आणि पशुवत कृत्याला कंटाळून धर्मांतर करणाऱ्याना हिणवले जाते,धर्मद्रोही लेबल लावलं जातं,धर्मांतर विरोधी कायदा करण्याचे उपद्व्याप केले जातात मात्र आपणच निर्माण केलेली अमानवी अमानुष परिस्थिती,वर्तन बदलण्यास मात्र तयार नाहीत,असं चित्रं आजही पाहायला मिळत आहे.अशीच एक मानवतेला काळिमा फासणारी घटना घडलीय.दलित नवरदेव घोडी वर चढला म्हणून जातीयवाद्यांकडून त्याला मारहाण करण्यात आलीय.
काय आहे प्रकरण जाणून घ्या.
उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातून ही बातमी समोर आलीय एका 24 वर्षीय दलित समाजातील नवरदेव घोडी वर चढून वरात काढत असताना,20-25 ‘ तथाकथित उच्च जातीय गुंडांनी वराला मारहाण केली आणि घोडी वरून खाली उतरण्यास भाग पाडले.
आग्रा येथील सोहल्ला जाटव बस्ती येथे ४ मे रोजी संध्याकाळी ही घटना घडली.
द इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, वराची सासू गीता जाटव यांनी ८ मे रोजी केलेल्या तक्रारीच्या आधारे
आग्रा सदर बाजार पोलिस ठाण्यात २५ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
गीता जाटव यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, तिच्या मुलीची लग्नाची वरात सोहल्ला बस्ती येथून जात असताना 20 ते 25 तथाकथित उच्चजातीय मनुवाद्यांनी काठ्या आणि लोखंडी रॉड सहित सशस्त्र हल्ला केला.त्यांचे जावई यांना घोडी वरून खाली उतरवण्यास भाग पाडले आणि वरातीतील इतर पाहुण्यांना देखील मारहाण केली.”आमच्या गावात दलित वर त्यांच्या लग्नाला घोडी वर चढून जात नाहीत, तुझी हिम्मत कशी झाली?” असं म्हणत जातीयवाद्यांनी मारहाण करायला सुरुवात केली.
महिलांची छेड काढत विनयभंग
गीता पुढे म्हणाल्या की,राधाकृष्ण मॅरेज हॉल येथे जेव्हा इतर नातेवाईक पुरुष वराला आणि इतरांच्या बचावासाठी आले,
तेव्हा तथाकथित उच्चजातीय पुरुषांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांना तिथून पळवून लावलं,तसेच उपस्थित इतर दलित महिलांचा विनयभंग केला.
तक्रारीच्या आधारे योगेश ठाकूर, राहुल कुमार, सोनू ठाकूर, कुणाल आणि शिशुपाल या पाच जणांवर आणि २० अनोळखी व्यक्तींवर
भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि अनुसूचित जाती-जमाती (प्रतिबंधक) च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(अॅट्रॉसिटी अॅक्ट) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Indian Penal Code (IPC) and the Scheduled Castes and the Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act.
मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
चर्मकार पोराने स्वतःच्या घरावर लावली बाबासाहेबांची सही
UK मध्ये आंबेडकर जयंती जल्लोष, हर्षोल्हासात साजरी
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on 13,MAY 2023, 08:54 AM
WebTitle – Dalit groom on mare; Beaten up by the so-called upper castes