नवी दिल्ली: Dalai Lama’s Viral kiss Video: तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा (Dalai Lama) एका लहान मुलाला त्याच्या ओठांवर चुंबन (किस) घेताना आणि नंतर त्याला “जीभ चोखण्यास” सांगत असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा (Dalai Lama) सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ, एक मुलगा मला दलाई लामा यांना मिठी मारायची आहे अशी परवानगी मागतो,दलाई लामा त्याला परवानगी देतात आणि नंतर ओठांवर चुंबन (किस) देण्यास सांगतात त्यानंतर दलाई लामा मुलाला माझी जीभ चोखणार का असं म्हणताना दिसून येतात.
धर्मगुरु दलाई लामा आपली जीभ बाहेर काढताना दिसत आहेत, मात्र ते मुलाला स्पर्श करून देत नाहीत,हाताने बाजूला ढकलतात.
मात्र यावरून आता सोशल मिडियात चर्चा सुरू झाली असून अनेकजण याबद्दल आश्चर्यमिश्रित संताप व्यक्त करत आहेत.या घटनेमुळे आता मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
मागील महिन्यामध्ये तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून एका आठ वर्षीय मंगोलियन बौद्ध मुलाला तिबेटच्या बौद्ध धर्मातील महत्त्वाचा तिसरा आध्यात्मिक नेता उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं होतं. हिमाचल प्रदेशशातील धर्मशाळा याठिकाणी हा कार्यक्रम पार पडला होता. सदर कार्यक्रमाला मुलाच्या वडिलांसह ६०० मंगोलियन नागरिक उपस्थित होते.
दलाई लामा अजूनही भारतात का आहेत?
पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना द्वारे तिबेटच्या विलीनीकरणानंतर, 1959 च्या तिबेटच्या उठावादरम्यान,
दलाई लामा भारतात आश्रयाला आले,जिथे ते सध्या तिबेटचे सर्वात महत्वाचे आध्यात्मिक नेते असताना निर्वासित जीवन जगत आहेत.
जातीयवादी पोस्ट करणाऱ्याला ब्रिटन पोलिसांनी केली अटक
Medical stores वर आंधळा विश्वास ठेवू नका;Wellness forever Medical
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 09,2023 19:00 PM
WebTitle – Dalai Lama’s viral kiss video with a child suck my tongue goes viral