राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सोबतच काही जिल्ह्यांतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत होणार वाढ आणि लॉकडाउन शिथील होताच बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी यामुळे राज्यसरकारकडून पुन्हा कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी ट्विट करून सांगितले की, “कोव्होवॅक्स ची (Covovax )पहिली बॅच तयार झाली असून ती पाहण्यास उत्सुक आहे.18 वर्षापेक्षा कमी वयाच्या भविष्यातील पिढ्यांचे संरक्षण करण्यासाठी या लसीमध्ये बरीच क्षमता आहे. चाचण्या चालू आहेत. टीम ने चांगली कामगिरी केली.”
Excited to witness the first batch of Covovax (developed by @Novavax) being manufactured this week at our facility in Pune. The vaccine has great potential to protect our future generations below the age of 18. Trials are ongoing. Well done team @seruminstindia! pic.twitter.com/K4YzY6o73A
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) June 25, 2021
ही लस अमेरिकन औषध कंपनी नोव्हाव्हॅक्स आणि भारतीय कंपनी सीरम इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त प्रयत्नाने तयार करण्यात आली आहे.
नोव्हाव्हॅक्सनं गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात सीरम इन्स्टिट्यूटबरोबर कोरोनाच्या लशीचे दोन अब्ज डोस तयार करण्यासाठी करार केला होता.
अमेरिकेत झालेल्या चाचण्यांमध्ये गंभीर संसर्गाचा धोका असलेल्यांमध्ये ही लस 91 टक्के परिणामकारक असल्याचं समोर आलं होतं.
तर मध्यम आणि अत्यंत कमी धोका असलेल्यांना कोरोनापासून वाचवण्यात यश 100 टक्के परिणामकारक असल्याचं चाचण्यांमध्ये समोर आलं.
राज्यात आजपासून या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUN 25, 2021 16: 46 PM
WebTitle – Covovax: First batch of vaccines for children 18 and under 2021-06-25