कोरोना लस फ्री नाही ? देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची तयारी सुरू असून, शनिवारी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ड्राय रनचा आढावा घेतला. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी फक्त दिल्लीतच नाही, तर देशभरात करोनाची लस मोफत दिली जाणार असल्याचं सांगत सुखद धक्का दिला. केंद्राकडून झालेल्या घोषणंच लोकानी देखिल स्वागत केलं मात्र केंद्रीय मंत्र्यांनी पुढच्याच क्षणी कोलांटी उडी मारून घुमजाव केलं. पहिल्या टप्प्यातच कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याचं आता स्पष्ट करण्यात आलं आहे.
कोरोना लस फ्री नाही ?
देशभरात लस मोफत लस दिली जाणार असल्याचं वृत्त सगळीकडे पसरल्यानंतर आरोग्य मंत्र्यांनी मोफत लसीच्या घोषणेवर खुलासा करत सारवासारव केली. “लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लस मोफत दिली जाणार आहे. देशभरात लस पुरवली जाणार आहे. १ कोटी आरोग्य सेवा कर्मचारी व २ कोटी कोविड काळात पहिल्या फळीत काम करणाऱ्यांनाच पहिल्या टप्प्यात लस देण्यात प्राधान्य दिलं जाणार आहे. प्राधान्यक्रमातील २७ कोटी लाभार्थ्यांना लस कशी दिली जाईल, याचा तपशील जुलैपर्यंत निश्चित केला जाणार आहे,” असं सांगत आरोग्यमंत्र्यांनी मोफत लसीच्या घोषणेवर सारवासारव केली.
18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना 1 मेपासून कोरोना लस दिली जाणार आहे.
सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये ही लस मिळेल.
खासगी रुग्णालयात लस घेणाऱ्यांना त्याचे पैसे द्यावे लागतील
आणि आता मुंबई महापालिकेने (Greater Mumbai Municipal Corporation) 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना खासगी रुग्णालयातच लस घेता येईल अशी घोषणा केली आहे. 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना फक्त खासगी रुग्णालयात लस मिळेल, असं मुंबई महापालिकेने सांगितलं आहे. मुंबईत 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना मोफत लस मिळणार नाही, हे BMC ने स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा.. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या शब्दांवर विश्वास का ठेवता येत नाही?
हेही वाचा.. एमएसपी वा किमान आधारभूत मूल्य
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)