चेन्नई : सैदापेट कोर्टाने चेन्नई पोलिसांना जय भीम चित्रपट अभिनेता सुर्या, आणि त्याची पत्नी ज्योतिका आणि जय भीम चित्रपटाचे दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. रुद्र वन्नियार सेना नावाच्या वन्नियार गटाने ही तक्रार दाखल केली होती, ज्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले होते की अनेक दृश्ये वान्नियार समुदायाला खराब प्रकाशात चित्रित करत आहेत.
वन्नियार समाजाने चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी जय भीम चित्रपट प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती.टीमचा निषेध करण्याबरोबरच, वन्नियार संगमने असेही म्हटले होते की त्यांना चित्रपटातून आक्षेपार्ह दृश्ये हटवायची आहेत. त्यांनी 5 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई आणि जय भीम टीमने बिनशर्त माफी मागावी अशी मागणी केली आहे.आता न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला जयभीम सिनेमा सुपरहिट ठरला,सोशल मिडियात त्याने अनेक दिवस चर्चा घडवून आणली.जय भीम या चित्रपटाचे रसिकांनी भरभरून कौतुक केले आहे.हा चित्रपट ऑस्करसाठीही पाठवला गेला होता.
अभिनेत्याला मारण्याची धमकी,एक लाख इनाम
पट्टाली मक्कल कच्ची (पीएमके) मायलादुथुराई जिल्हा सचिव पन्नीरसेल्वम यांनी जयभीम सिनेमाचा अभिनेता सूर्याला धमकी दिली होती.
त्यांनी जाहीर केलय की,जो कोणी जिल्ह्य़ात जाऊन अभिनेत्यावर हल्ला करेल त्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
पन्नीरसेल्वम यांनी याअगोदर पोलिसांकडे सुर्याविरुद्ध कारवाईची मागणी केली होती.
14 नोव्हेंबर रोजी, त्यांच्या नेतृत्वाखालील PMK कार्यकर्त्यांचा एक गट मायिलादुथुराई जिल्ह्यातील थिएटरमध्ये घुसला होता.
आणि व्यवस्थापकाला सुसूर्याच्या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यास भाग पाडले.
या गटाचे नेतृत्व सुद्धा पन्नीरसेल्वम यांनीच केल्याचा आरोप आहे.
शिक्षणातील समानतेसाठी झटत आहे
साउथ इंडियन फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने माजी केंद्रीय मंत्री आणि पीएमके नेते अंबुमणी रामदास यांना पत्र लिहून पक्षाला अभिनेता सूर्या यांच्यावर टीका करू नये, असे आवाहन करताना म्हटलं होतं की “अभिनेता सूर्याचा कोणताही राजकीय, जातीय किंवा धार्मिक गोष्टीशी संबंध नाही, तो एक सामाजिक जबाबदार पार पाडत आहे.शिक्षणातील समानतेसाठी झटत आहे.”
हा चित्रपट एका आदिवासी जोडप्याच्या कथेवर आधारित
अनेकदा असं म्हटलं जातं की चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. बहुतांश चित्रपटांमध्ये समाजातील कटू वास्तवाची जाणीव लोकांना करून दिली जाते. तमिळ भाषेत बनलेल्या जय भीम चित्रपटाची कथाही अशीच आहे. जय भीम हा एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट असून यामध्ये आदिवासींवरील अत्याचार चांगल्या प्रकारे दाखवण्यात आले आहेत. भारतातील लोकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले, पण आता जयभीम चित्रपटाचे चीन मध्येही या चित्रपटाचे खूप कौतुक होत आहे.
TJ ज्ञानवेल दिग्दर्शित या चित्रपटात सुर्या, के. मणिकंदन, लिजोमोल जोस आणि प्रकाश राज यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.
चित्रपटाची कथा एका वकिलाच्या जीवनावर आधारित आहे जो आदिवासी लोकांवरील अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतो आणि जिंकतो.
पोलीस स्वतःच्या फायद्यासाठी निष्पाप आणि गरीब लोकांच्या जिवाशी कसे खेळतात हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
जगभरात गाजलं जयभीम सिनेमाचं नाव
हा सिनेमा जसा भारतात गाजला तसाच परदेशात ही गाजला.जागतिक सिने जगतात IMDb.com ही अत्यंत महत्वाची व विश्वसनीय वेबसाईट मानली जाते. जगातील सर्व सिनेमानं येथे मानांकन मिळते. त्यांना रेटिंग दिले जाते. जगातील एक हजार मुव्ही तपासल्या तर 9.6 रेटिंग घेऊन जयभीम हा सिनेमा आज जगात पहिल्या नंबर वर आहे तर 1984 वर्षाचा हॉलिवूड मुव्ही The Shawshank Redemption हा 9.3 रेटिंग घेऊन दुसऱ्या नंबर वर आहे. IMDb top 1000 असे जरी google मध्ये टाईप केले तरी आपल्याला ते पाहता येईल. सांगण्याचे तात्पर्य हा महत्वपूर्ण मुव्ही सिनेप्रेमींनी आवश्य पहावा असा आहे.
चीनमधील लोकांना चित्रपट का आवडला?
जयभीम चित्रपट अन त्याची कथा चीन मधील लोकांनाही आवडली कारण तमिळप्रमाणेच चीनमध्येही अशीच एक घटना घडली.
चीनच्या सोशल मिडिया आणि चित्रपट समीक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावला आहे.
जय भीमच्या कथेप्रमाणेच जपानमध्ये एका चिनी महिलेची हत्या करण्यात आली होती, जिच्याविरुद्ध न्यायव्यवस्थेत दीर्घ खटला चालला होता.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
संभाजी भिडे यांचे नाव भीमा कोरेगाव खटल्यातून वगळण्यात आले
पायरेटस् ऑफ कॅरेबीयन कॅप्टन जॅक स्पॅरो पत्नीचा मार खाऊनही…
संभाजी भिडे सायकल वरून पडल्याने गंभीर जखमी; उपचार सुरू
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 05, 2022 17:22 PM
WebTitle – court orders File a case against the Jai Bhim movie actor and his wife