त्रिपुरा – कायदा कुचकामी आहे.कायदा कडक नाही,असं काही लोक म्हणतात.(दुसरीकडे कायदा कडक आहे. बदलला पाहिजे असे म्हणणारे महाभाग सुद्धा आहेत) कायदा असो की संविधान ते राबवणारे प्रामाणिक असतील तर ते प्रभावी ठरेल असे मत घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा मांडले होते.
कायदे सोयीने राबवले जातात.आणि काही लोकांना सूट तर काही लोकांना पाठीवर बांबूचा प्रसाद मिळतो.त्यातही सामान्य नागरिकांना कायद्याचा हिसका सर्वप्रथम दाखवला जातो असं मानलं जातं.पोलिसांची कार्यशैली ही नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे.
श्रीमंत वर्गातील व्यक्तींचे आयुष्य मात्र या महामारीत प्रभावित झालेले नाही
दरम्यान,देशात कोरोनाच्या महामारीने उग्र रूप धारण केले आहे.लोकाना बेड मिळत नाहीत. लोक रस्त्यावर ऑक्सीजन सिलेंडर घेऊन झोपत आहेत,असे फोटो समाज माध्यमातून वायरल होत आहेत. तर कुठे नवऱ्याला पत्नी तोंडानेच ऑक्सीजिन देण्याचा प्रयत्न करत आहे असे विदारक चित्र समोर येतेय.दुसरीकडे मृत लोकांच्या अंत्यसंस्कारसाठी सुद्धा रांगा लागल्याचे दारुण चित्र समोर आहे.
देशात असा हाहाकार माजलेला असताना मात्र काही लोकांच्या आयुष्यात मात्र सर्व आलबेल असल्याचे दिसते आहे.त्यातही जर श्रीमंत वर्गातील व्यक्ती असतील तर त्यांचे आयुष्य मात्र या महामारीत प्रभावित झालेले नाही अशी शंका घेण्यास जागा आहे.असाच एक प्रकार त्रिपुरा येथील आगरतळा येथे घडला आहे.
देशातील सर्वच राज्यात कुठे लॉकडाउन आहे तर कुठे कडक निर्बंध आहेत. नाइट कर्फ्यू आणि कलम 144 लागू आहे.आगरतळा येथेही लॉकडाउन आणि कलम 144 लागू असूनही इथे दोन गर्भश्रीमंत लोकांची लग्ने मोठ्या थाटामाटात सुरू असल्याचे पाहून जिल्हयाधिकाऱ्यांचा पारा चढला.
समाजातील काही लोक मात्र काहीच सोयर सूतक नसल्याप्रमाणे वागत आहेत
कोरोना च्या लढाईत प्रत्येकजण आपल्यापरीने लढा देत आहे.कोविड योद्धे डॉक्टर्स नर्सेस सफाई कर्मचारी असे सगळेच आपल्या परीने या संकटाशी लढत असताना
दुसरीकडे समाजातील काही लोक मात्र काहीच सोयर सूतक नसल्याप्रमाणे आपले आयुष्य मौज मजा आनंद व्यक्त करण्यात मश्गुल असल्याचे दिसून येतेय.
आगरतळा येथे रात्री दहा नंतरही लग्नाचे जंगी सोहळे डोळे दिपवणारी सजावट
आणि हॉल मधील गर्दी काही नियम पाळण्यास तयार नसल्याचे दिसल्याने
जिल्हाधिकारी डॉ.शैलेश कुमार यादव यांनी श्रीमंतीचे ओंगळवणे प्रदर्शन मांडून
लग्न सोहळा करणाऱ्या दोन्ही कुटुंबांवर कारवाईचा बडगा उगारला.
डॉक्टर शैलेश कुमार यादव एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी दोन्ही हॉल एक वर्षासाठी सील करून टाकले.
इतकेच नाहीतर पोलिस प्रशासनाने कारवाई करण्यासाठी प्रतिसाद न दिल्याने
आगरतळा पोलिस स्टेशन मध्ये तैनात सर्व अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे.
विशेष खेदाची बाब म्हणजे ही कारवाई होत असताना एक सर्जन असणारे इसम जिल्हाधिकाऱ्यांशी वाद घालताना दिसतात.
त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा जिल्हाधिकारी डॉक्टर शैलेश कुमार यादव यांनी अटक करून कारवाई केली
देशात एवढी भीषण परिस्थिती असताना लोकाना असे श्रीमंतीचे ओंगळवणे प्रदर्शन मांडत
आनंद सोहळे साजरे करणे कसे काय सुचते हा एक चिंताजनक मुद्दा आहे.
एखादं वर्षे असे लग्न सोहळे पुढे ढकलले तर त्यातून सामाजिक जाण आणि भान जपले जाईल की नाही? वाचकांना काय वाटते?
चिपळूण पुरग्रस्तांना महिला बचत गटांनी दिला मदतीचा हात
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on APRIL 27 , 2021 21 : 58 PM
WebTitle – coronavirus night curfew violation in tripura administration sealed two marriage hall 2021-04-27