देशात आणि राज्यात कोरोनाची ( Coronavirus in Maharashtra) दुसरी लाट ओसरल्याने अनलॉक (Unlock) जाहीर करण्यात आला.लोक पुन्हा मोठ्याप्रमाणावर बाहेर पडले.पाच टप्यामध्ये हा अनलॉक जाहीर करण्यात आला होता.मात्र, आता पुन्हा केसेस वाढू लागल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे.
गावामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आता बारामतीमधील ( Baramati ) काटेवाडी गावात सात दिवसांसाठी लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आलाय. गावामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं गावकऱ्यांनी एकत्र येत सात दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील 7 दिवस गाव शंभर टक्के बंद राहणार आहे. दोन दिवसापूर्वी गावांमध्ये अँटीजेन कॅम्प घेतला होता त्यावेळी 27 रुग्ण आढळल्याने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. (Lockdown announced for seven days in Katewadi village in Baramati)
देशातही वाढतेय रुग्ण संख्या
दरम्यान, दुसऱ्या लाटेनंतर आता राज्यावर डेल्टा प्लसचं संकट घोंगावू लागलंय.डेल्टा प्लस कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे चिंतेचे वातावरण आहे. डेल्टा प्लस मुळे तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी ५० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळले. गेल्या २४ तासात ५१ हजार ६६७ नवीन बाधितांची नोंद झाली आहे. तर १३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुjवारी देशात ५४ हजार ६९ कोरोना बाधित आढळले होते.
आरोग्य मंत्रालयाची आकडेवारी
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ५१.६६७ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले. तसेच १,३२९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ६४,५२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ६,१२,८६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
कोरोनाचा कहर
देशात कोरोनाचा कहर झाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण १.३० टक्के आहे, तर रिकवरी रेट ९६ टक्क्यांहून अधिक आहे.
सक्रिय प्रकरणे सुमारे २ टक्के आहेत. करोना अॅक्टिव्ह केसेसच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
संसर्ग झालेल्या एकूण संख्येच्या बाबतीतही भारत दुसर्या क्रमांकावर आहे.
जगात कोरोनाचा कहर झाल्यामुळे अमेरीका, ब्राझीलनंतर करोनामुळे सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.
आतापर्यंत ३ लाख ९३ हजार ३१० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नागरिकांना विनंती आहे. मास्क चा वापर नेहमी करा.सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका.
गर्दीची ठिकाणे टाळा.हात वारंवार धूत राहा.आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या.
राज्यातील ऑक्सीजन निर्मिती आणि साठवणूक क्षमता वाढवावी
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUN 25, 2021 11: 40 AM
WebTitle – Corona’s havoc resumes; 7 days strict lockdown at Baramati 2021-06-25