राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बनू शकल्या त्या भारतीय संविधानाच्या तरतुदीमुळे,यानंतर त्यांचे सर्वच स्तरात कौतुक केले गेले.मात्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या एका मंदिरात झाडू मारताना जाणीवपूर्वक दाखवल्या गेल्या. त्यांचे ते व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते,त्यावेळी अनेकांनी त्यावर टीकाही केली होती.खरतर असे व्हिडिओ व्हायरल करण्यामागे नेमका काय नॅरेटीव्ह असू शकतो? हे काही रॉकेट सायन्स नाही.असो आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भात आणखी एक वाद निर्माण झाला आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या जगन्नाथ पुरीच्या मंदिराच्या गर्भगृहाबाहेर पूजा करत असल्याचा फोटो सोशल मिडियात व्हायरल झाल्याने लोकांनी आता त्यावर टीका-चर्चा करायला सुरुवात केलीय.त्यामुळे आता पुन्हा वाद पेटला आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी (20 जून) दिल्लीतील श्री जगन्नाथ मंदिरात पूजा केली होती, या फोटोची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
20 जून रोजी, त्यांच्या 65 व्या वाढदिवसाच्या आणि जगन्नाथ रथयात्रा 2023 च्या निमित्ताने,
राष्ट्रपती मुर्मू हौज खास येथील जगन्नाथ मंदिरात गेले. तेथे पूजा करत असताना राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून
त्यांचे छायाचित्रही प्रसिद्ध करण्यात आले. ट्विटरवर त्यांनी रथयात्रेच्या प्रारंभी शुभेच्छाही दिल्या होत्या.
मंदिराच्या गर्भगृहाच्या दाराबाहेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हात जोडून उभ्या असून पुजारी आत पूजा करत असल्याचे या फोटोत दिसत आहे.
गर्भगृहाबाहेरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हात जोडून उभ्या असलेल्या फोटोवरूनच
अनेकांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
यासोबतच इतर भाजप नेत्यांचे त्याच मंदिरातील गर्भगृहातील फोटो शेअर करत हा भेदभाव का? दुटप्पीपणा का असा प्रश्न विचारला आहे.
काही लोक आरोप करत आहेत की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अनुसूचित जमाती समुदायातून आल्याने मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश दिला जात नाहीए.
ज्येष्ठ पत्रकार दिलीप मंडल यांनीही द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो ट्विट केला आहे.
त्यांनी लिहिले, “दिल्लीच्या जगन्नाथ मंदिरात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान मंदिराच्या आत पूजा करत आहेत आणि मूर्तींना स्पर्श करत आहेत. पण याच मंदिरात भारतीय प्रजासत्ताकाचे प्रथम नागरिक असलेले राष्ट्रपती मुर्मू यांना बाहेरून पूजा करण्याची परवानगी देण्यात आली, ही चिंतेची बाब आहे.”
यावर त्यांनी खुलासा मागितला असून, या प्रकरणाशी संबंधित पुजाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
प्राध्यापक चंद्र शेखर यांनी फोटो शेअर करत ट्विट केले आहे,आणि प्रश्न विचारले आहेत की “
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आत जाऊ शकतात, पण महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी, ज्यांना मनुवादींनी शूद्र बनवले होते, त्या मंदिरात जाऊ शकत नाहीत!
का???
काही उत्तर आहे का???”
“जेव्हा जेव्हा मी या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लावतो, तेव्हा हे भेदभाव जपणारे किंवा देवाच्या नावाने धंदा करणारे अतिशय हुशारीने माझ्या प्रश्नांना ट्विस्ट करत मी देवाला प्रश्न केले असा संभ्रम निर्माण करतात.
मी जेव्हा जेव्हा विरोध केला आहे तो या प्रकारच्या निर्लज्ज भेदभावाला केला आहे देवाला नाही…”
ट्विटर युजर प्रियांशी कुशवाह यांनी फोटो ट्विट करत खालील प्रश्न उपस्थित केले आहे
- पहिले चित्र रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आहे.
- दुसरे चित्र देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आहे.
- तुम्हाला काही विचित्र वाटत नाही का?
दुसरीकडे काही ट्विटर युजर्स राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या या फोटोवर टीका करत आहेत त्यांना चुकीचे म्हणत आहेत.
राष्ट्रपती मुर्मू यांनी यापूर्वी अनेक मंदिरांच्या गर्भगृहात पूजा केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
लेखक कार्तिकेय तन्ना यांनी देवघरमधील वैद्यनाथ मंदिर आणि वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात मुर्मू पूजा करतानाची छायाचित्रे ट्विट केली आहेत.
भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांच्यासोबत सुद्धा भेदभाव
भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनासुद्धा मंदिरात भेदभाव झाल्याची घटना घडली होती.रामनाथ कोविंद आणि त्यांची पत्नी सविता कोविंद हे दोघे उभायत पुरीच्या जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते त्यावेळी त्यांच्यासोबत भेदभाव केल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता.त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.दरम्यान राष्ट्रपती भवनकडून पुरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात एक पत्रही लिहिण्यात आले होते.दुसरीकडे मंदिर प्रशासनाचे मुख्यप्रशासक आयएएस अधिकारी प्रदिप्तकुमार मोहापात्रा यांनीदेखील राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नीसोबत गैरव्यवहार झाल्याचे मान्य करत याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला होता.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविन्द हे दलित राष्ट्रपती म्हणून भाजपने प्रोजेक्ट केले होते.मात्र दलितांची किंमत राष्ट्रपती सारख्या देशातील सर्वोच्च पदी जाऊनही काहीच नसते हेच या घटना प्रखरतेने स्पष्ट करतात.तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून जुरूर कळवा,मुडदा बनू नका,तोंड उघडा.अगोदर लिहा वाचायची बंदी होती,आता नाहीए पण तुम्ही स्वातंत्र्याच्या आदर केला नाहीत,योग्य वापर केला नाहीत तर एक दिवस ते घालवून बसाल.
जगन्नाथ मंदिर चे पुजारी म्हणाले राष्ट्रपती असले म्हणून काय झालं?
नविन अपडेट नुसार,पुरी जगन्नाथ मंदिर चे पुजारी माध्यमांशी बोलताना म्हणाले की,“आम्ही ज्याना वरण करू,(जिसको हम वरण करेंगे वहीं जाएगा बाकी कोई नहीं जाएगा,) (हे वरण करणे काय आहे समजले नाही) तेच जातील अन्य कुणी जाणार नाही.राष्ट्रपती स्वत: व्यक्तिगत आले होते आशिर्वाद घ्यायला ते आत का जातील? म्हणून त्यांना आत जाऊ दिले नाही.”
बीबीसी ला दिलेल्या मुलाखातीत पुजारी ने वरील विधान केलेलं आहे.जे की धक्कादायक असून देशातील सर्वोच्च पदावरील व्यक्ती आणि एका मंदिराचा पुजारी यातील फरक महत्व स्पष्ट करणारे आहे.
अमेरिकेतील रस्त्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव
भगवान बुद्ध अस्थि दर्शन ,सुट्टी न दिल्याने उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी दिला राजीनामा
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 27 JUN 2023, 13:50 PM
Updated by Team Jaaglya Bharat on 28 JUN 2023, 11:22 AM
WebTitle – Controversy over President Draupadi Murmu’s pooja outside Puri’s temple?