देशात सध्या भगव्या रंगावरून सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.हिंदू धर्मातील अनेक महंत या मुद्यावरून बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याला मारण्याची धमकी देत आहेत. तसेच काही लोक पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. अशातच लखनौ विद्यापीठाचे कला आणि हस्तकला महाविद्यालय शुक्रवारपासून 111 वा स्थापना दिवस साजरा करणार आहे.या पार्श्वभूमीवर तयारीचा भाग म्हणून, मुख्य गेटवरील भगवान बुद्धांच्या काँक्रीटच्या मूर्तीला भगव्या रंगाने रंगवण्यात आले.
भगवान बुद्धांच्या मूर्तीला भगव्या रंगाने रंगवण्यावरून वाद
याबाबत कलाकार व महाविद्यालयीन शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बातमीनुसार, लखनौ विद्यापीठात स्थापित भगवान बुद्धांची ही मूर्ती 60 वर्षे जुनी आहे. मात्र ती सुरुवातीपासून शुभ्र रंगात असताना भगव्या रंगाने रंगवले गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी विद्यार्थी व शिक्षक तेथे पोहोचले असता त्यांना ही बाब लक्षात आली.त्यांनी मूर्ती भगव्या रंगात रंगविण्यास आक्षेप घेतला. वास्तविक, यावेळी विद्यापीठाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमापूर्वी कॅम्पसमध्ये दुरुस्तीचे काम सुरू आहे. ज्या अंतर्गत कॅम्पसमध्ये पेंटिंगचे काम सुरू होते. दरम्यान, एका मजुराने चुकून ही 60 वर्षे जुनी मूर्ती भगव्या रंगात रंगवली असल्याचे प्राचार्य म्हणत आहेत.
हे प्रकरण सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते.घाईघाईत मग शिल्प पूर्वीप्रमाणेच पांढऱ्या रंगात पुन्हा रंगवण्यात आलं.
याबाबत अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य रतन कुमार म्हणाले, एका मजुराने चुकून भगवान बुद्धांचे शिल्प भगव्या रंगात रंगविले होते. मात्र ही बाब त्यांच्या निदर्शनास येताच ही चूक सुधारून मूर्तीला पुन्हा पांढरा रंग देण्यात आला. मूर्ती सुंदर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. ही मूर्ती 1950 च्या उत्तरार्धात प्रसिद्ध शिल्पकार अवतार सिंग पनवार यांनी बनवली होती.
शाहरुख खान ला जीवंत जाळणार – महंत परमहंस ची धमकी
संत तुकाराम महाराज माझ्याकडे 22 वेळा आले – सुबोध भावे
प्रेम किंवा जातीबाहेर लग्न केल्यामुळे दरवर्षी अनेक हत्या – न्या.चंद्रचूड
मनोज गरबडे,शाई फेक ते जामीन,कोर्टात काय झालं? प्रत्येक घडामोड
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फासणारे मनोज गरबडे आहेत तरी कोण?
शाई फेक अन मारहाण नेत्यांना कधी कधी झाली ? जाणून घ्या.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 22,2022, 19:20 PM
WebTitle – Controversy over painting the idol of Lord Buddha with saffron colour