एका अमेरिकन महिला प्रोफेसरचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने अनिवासी भारतीयांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात कायदा शिकवणाऱ्या एमी वॅक्स (Amy Wax) असे या प्राध्यापकाचे नाव आहे. ‘टकर कार्लसन टुडे’ (Tucker Carlson Today) या कार्यक्रमादरम्यान त्यांनी टीव्हीवर हे वक्तव्य केले. प्रोफेसर एमी वॅक्स यांनी टॉक शोमध्ये अमेरिकेवर टीका करणाऱ्यांविरोधात अनेक प्रक्षोभक वक्तव्य केले.
वॅक्स Amy Wax यांनी टकर कार्लसन या राजकीय समालोचकासोबत मुलाखती दरम्यानच्या चर्चेत म्हटलं की, “पाश्चिमात्य लोकांच्या योगदानाबद्दल पाश्चिमात्य लोकांविरुद्ध गैर-पाश्चिमात्यांचा संताप लाजिरवाणा आहे आणि तो खरोखरच असह्य आहे.” वॅक्स यांनी आशियाई आणि दक्षिण आशियाई भारतीय डॉक्टरांवरही टीका केली. “हे लोक वर्णद्वेषविरोधी पुढाकार घेण्यासाठी इथं येतात,” असं त्या म्हणाल्या. त्यांनी विशेषतः भारतातील ब्राह्मण स्त्रियांना लक्ष्य केले.
मग तुम्ही तुमचा देश का सोडला, तुम्ही अमेरिकेत का आलात?
वॅक्स पुढे म्हणाल्या “समस्या ही आहे की त्यांना हे शिकवले जाते की ते इतरांपेक्षा चांगले आहेत कारण ते ब्राह्मण आहेत आणि तरीही त्यांचा देश गलिच्छ आहे… त्यांना माहित आहे की आम्ही त्यांना प्रत्येक गोष्टीत मागे टाकलं आहे.. यामुळे त्यांना राग येतो, ईर्षा वाटते आणि लाजही वाटते … आणि हे सगळं कृतघ्नतेची अत्यंत खराब पातळी निर्माण करते.”
“अनेक घटनांमध्ये त्यांना ज्या संधी मिळत नाहीत. ते अमेरिकेत येतात. त्यांना दिसतं की या संधी अमेरिकेत आहेत. अमेरिकेत विकसित वैद्यकीय संस्था आहेत. मला काही लोकांना विचारावं वाटतं की मग तुम्ही तुमचा देश का सोडला, तुम्ही अमेरिकेत का आलात?” असा सवाल एमी वॅक्स यांनी विचारला.
वॅक्स यांच्याकडून अशी प्रक्षोभक विधाने करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याअगोदर त्यांनी कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि सांगितले की आशियातील कमी लोक येथे येतील तेव्हा अमेरिकेचे चांगले होईल. फिलाडेल्फिया इन्क्वायररने अहवाल दिला की विद्यापीठाने यापूर्वी त्याच्या विधानांचा निषेध केला होता आणि त्याला 2018 मध्ये शिकवण्यापासून काढून टाकले होते, परंतु शैक्षणिक स्वातंत्र्याचा हवाला देऊन त्यांना पुन्हा स्थापित करण्यात आले होते.
भारतीयांनी याबद्दल नेमकं काय समजून घ्यायचं?
आपण भारतीयांनी याबद्दल नेमकं समजून घ्यायचं ते असं की वॅक्स असं म्हणत आहेत त्याबद्दल एक भारतीय म्हणून आपण त्यांचा निषेध करायला हवा. त्या स्वत: वर्णद्वेषी आहेत हे वरील उदाहरणावरून स्पष्ट झालंच आहे.परंतु दुसरं असंही आहे की त्यांच्या आताच्या म्हणण्यात काही प्रमाणात तथ्य सुद्धा आहे त्या म्हणतात की, “तुम्ही आम्हाला (अमेरिकेला) वर्णभेदी म्हणता आणि स्वत:च्या देशात मात्र जातीयव्यवस्था पाळून आहात.याचा उल्लेख ही मुलाखत घेणाऱ्या टकर कार्लसन ने देखील केला आहे.भारतीय ब्राह्मण अमेरिकेत जाऊन समानता मिळावी म्हणून वर्णभेदाविरुद्ध बोलतात असमानते विरुद्ध बोलतात अमेरिकेला नावं ठेवतात पण दुसरीकडे स्वत:च्या देशात विषमता पाळतात.असं या दोघांचे म्हणने आहे.या मुद्याना आंतरराष्ट्रीय पातळीवर आता चर्चिलं जात आहे. भारतीय प्रसारमाध्यमे नेहमीप्रमाणे अशा गोष्टी ट्विस्ट करून वेगळच चित्र समोर आणत आहेत.
भारतीयांनी आपला हा दोष पुसून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.आपण सर्वांनी केवळ भारतीय म्हणूनच जर जगासमोर गेलो
तर जगातील कोणत्याही देशाला आपल्याकडे बोट दाखविण्याची हिंमत होणार नाही.
तुम्हाला काय वाटतं? यासाठी तुमच्या पातळीवर तुम्ही काय करत आहात ? आम्हाला नक्की कळवा.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
राज ठाकरे यांना आता नीलेश कराळे मास्तर यांचे प्रत्युत्तर..म्हणाले
मशीद भोंगा प्रकरण : सुजात आंबेडकर याना मनसे चं प्रत्युत्तर
अमित ठाकरे याना हनुमान चालीसा म्हणायला सांगा – सुजात आंबेडकर
द काश्मिर फाईल्स:भाजप देशाचे वातावरण बिघडवत आहे:शरद पवार
Bank frauds in india मागील सात वर्षात सर्वात मोठा घोटाळा
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on APR 13, 2022 11:30 AM
WebTitle – Controversial statement by Amy Wax, a US professor, about a Brahmin woman