काँग्रेस ने अकोला मधून डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याची सोशल मिडियात चर्चा सुरू झाली आहे. यात कितपत तथ्य आहे? हे आता काँग्रेसकडूनच स्पष्ट करण्यात यायला हवं. कारण की अकोला मधून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष एड.प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी जाहीर केली होती.यापार्श्वभूमीवर काँग्रेस ने उमेदवारी जाहीर केल्याची चर्चा सुरू झाल्याने आंबेडकरी समाजात मात्र यामुळे काँग्रेस विरोधात रोष वाढायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दोघांनी समजा उमेदवारी जाहीर केली असेल तर या दोघात फरक हा की महाविकास आघाडीने आजवर किती जागा देणार याबाबत काहीही माहिती कुठेही दिलेली नाही,ना महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी चा अधिकृत समावेश आहे असं म्हटलं आहे.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी किमान इथे मी उभा राहणार आहे.हे जाहीर केलेलं असावं.
यामुळे तरी तीन पक्ष बोलतील अशी अटकळ असावी
आणि दुसरे असे की वेळ पडली तर मी दोन पावले मागे यायला तयार आहे असेही म्हणलेलें होते.
याबाबत कालच वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी त्यांच्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट केले होते,असे असताना
या पार्श्वभूमीवर काँग्रेस जर परस्पर अकोला मध्ये उमेदवार जाहीर करत असेल तर हा विश्वासघात ठरतो.अशी चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे.
शिवाय वंचित सोबत काँग्रेस नक्की काय करू पाहत आहे यावर संभ्रम निर्माण होत आहे.या घडामोडी घडलेल्या असताना
दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणतात प्रकाश आंबेडकर हे बीजेपी ला मदत होईल असे काहीही करणार नाहीत.
“गंमत अशी आहे की त्यावेळी मुख्यमंत्रीपद सेनेकडे दिले असते तर आज या निवडणुका भाजपा+सेना विरुद्ध वंचित/काँग्रेस /राष्ट्रवादी काँग्रेस अशा झाल्या असत्या अन तेव्हा लोकशाही संविधान याबद्दल कुणीही गळे काढले नसते.संजय राऊत आणि महाविकास आघाडी हे वास्तव विसरत आहेत का? तुम्ही तर लोकशाही मानायला तयार नव्हतात.निवडणुका लढवायला तयार नव्हतात अशी अनेक भाषणे आम्हीही ऐकली आहेत ऐकत मोठे झालोय. निव्वळ राजकीय सत्तेसाठी तुम्ही निवडणुका लढवायला तयार झालात हा इतिहास आंबेडकरी जनतेला तरी विसरता येत नाही.आज अचानक सगळं चित्रं बदललं?” असा सवाल यावेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते नितीन दिवेकर यांनी विचारला आहे.
गेल्या पाच वर्षात डॉ.अभय पाटील पक्षात सक्रिय नसल्याची बातमी
“महाविकास आघाडीचे नेते सातत्याने प्रकाश आंबेडकर यांना ब्लॅकमेल करत आहेत,याशिवाय सोशल मिडियातील समर्थक देखील हीच भूमिका घेऊन आहेत.
यागोष्टी आता आंबेडकरी समाजाला आंबेडकरी तरुणांना लक्षात यायला लागल्या आहेत.” असंही दिवेकर यांनी जागल्याभारत शी बोलताना म्हटलं आहे.
काँग्रेस कडून डॉ. अभय पाटील यांचे नाव पुढे आले आहे.मात्र डॉ. पाटील यांच्या नावाला स्थानिक पातळीवरच विरोध असल्याचे समजते.
गेल्या पाच वर्षात डॉ. अभय पाटील पक्षात सक्रिय नसल्याची बातमी समजली
त्यांच्या उमेदवारीला नाव न घेता मदन भरगड यांनी विरोध केल्याची बातमी आहे. आणि याच कारणावरून त्यांच्यात वाद होते म्हणे.
ऑक्टोबर मध्ये नागपूरात काँग्रेस ची बैठक सुरू असताना दोन नेत्यांमधील वादाचं रुपांतर हाणामारीत झाल्याची घटना समोर आली होती.याशिवाय अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये असलेली गटबाजी, पक्षांतर्गत खदखद, डावलले जाणे, नाराजीच्या घटना इत्यादी प्रकार काही नवे नाहीत. त्यामुळे अकोला जिल्ह्यात काँग्रेस दोन दशकांपासून रसातळाला गेली असल्याची माहिती हिंदुस्तान समाचार ने त्यांच्या बातमीत दिलेली आहे.ही बातमी फार जुनी नाही,चारच महिन्यांच्यापूर्वीची आहे.
यावरून काँग्रेस नेमके कोणते राजकारण करू पाहते आहे,भाजपला हरवायला ये खरच गंभीर आहेत का? असा सवाल आता लोकही विचारू लागले आहेत.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 07,2024 | 21:27 PM
WebTitle – Congress has announced the candidacy of Dr. Abhay Patil from Akola