मुंबई: ज्ञानपीठ व पद्मश्री पुरस्कार प्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबईमधिल एका कार्यक्रमात मुघल बादशाह औरंगजेब तसेच पुण्यातील पेशव्याच्या संदर्भात खळबळजनक वक्तव्ये केली होती, दुसऱ्या बाजीरावाने पेशव्याच्या तावडीतून महाराष्ट्र वाचवून इंग्रजांकडे सोपवला. औरंगजेब हा देशातील सती प्रथा हटवणारा पहिला राजा असल्याचं सांगितलं आहे. औरंगजेबाच्या दोन्ही हिंदू राण्यांना भ्रष्ट करण्यात आलं म्हणून त्याने मंदिर फोडलं, अशी काही वक्तव्ये भालचंद्र नेमाडे यांनी केली होती,यावरून आता राजकारण पेटलं असून महाराष्ट्र भाजप च्या सोशल मीडिया कायदेशीर सल्लागार विभागाचे प्रमुख अॅड.आशुतोष दुबे यांनी मुंबईत तक्रार दाखल केली आहे.
भालचंद्र नेमाडे यांनी हिंदू ब्राम्हणांविरुद्ध खोटी आणि अपमानास्पद विधाने केली
अॅड.आशुतोष दुबे यांनी याबाबत माहिती देताना ट्वीटरवर ट्विट करत म्हटलं की,
“मी भालचंद्र नेमाडे या लेखकांच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. लेखक श्री.नेमाडे यांनी हिंदू ब्राह्मणांच्या विरोधात भडकाऊ, ज्ञानवापी प्रकरणावर हस्तक्षेप करणारं तसेच आणि जनतेला भडकवणारे भाषण केले. ज्यामुळे सार्वजनिक सौहार्द बिघडते.त्यामुळे मी मुंबई पोलिसांना विनंती करतो की,भारतीय दंड संहितेच्या (IPC) संबंधित कलमांद्वारे योग्य ती कारवाई करावी.”
पुढील ट्विट मध्ये त्यांनी डिटेल्स दिल्या आहेत. तपशील:आक्षेपार्ह विधान:
श्री. भालचंद्र नेमाडे यांनी हिंदू ब्राम्हणांविरुद्ध खोटी आणि अपमानास्पद विधाने केली आहेत,
ज्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचण्याची आणि सामाजिक अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे.
नेमाडे म्हणाले, “मी पुस्तकं वाचलं तेव्हा कळलं की दुसऱ्या बाजीराव बद्दल चुकीची माहिती देण्यात आलीय.दुसरे बाजीराव पेशव्यांच्या तावडीतून निसटले हे बरे झाले”,
भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या भाषणात म्हटलं , “औरंगजेबाच्या काळात निम्म्याहून अधिक हिंदू सरदार होते.
औरंगजेब सती प्रथा बंद करणारा पहिला राजा होता. सध्या महिला भ्रष्ट असल्याच्या बातम्या रोज येत आहेत (भ्रष्ट बलात्कार अर्थाने).
तीनशे, साडेतीनशे चिमुकल्यांना पळवून नेले. आता इथे कसे राहायचे? हा प्रश्न आहे”, असा युक्तिवाद भालचंद्र नेमाडे यांनी केला.
( जागल्याभारत टेक – असा युक्तवाद नेमाडे यांनी केलेला नाही,त्यांनी हा युक्तिवाद स्त्रियांना भ्रष्ट करण्यात येते,बलात्कार होतात,त्या अनुषंगाने केलेलं आहे.आणि त्याचा आधार त्यांनी सामाजिक नैतिकतेशी जोडलेला आहे.या संदर्भात त्यांनी पिंपरी चिंचवड चं उदाहरण दिलेलं आहे.तिथंल्या संदर्भात त्यांनी याच वर्षी आलेल्या एका बातमीचा तीनशे साडे तीनशे असा अंदाजे आकडा दिला. हा आकडा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यानीच दिलेला आहे. यांचा ना ब्राह्मण पेशवे ना औरंगजेब शी संबंध आहे ना ज्ञानवापी मस्जिद प्रकरणाशी,कदाचित अॅड.आशुतोष दुबे यांना मराठी समजलेलं नाही,” जर समाजातून तीन साडेतीनशे महिला मुली बेपत्ता होत असतील तर हे समाजाचे झालेले अध:पतन आहे,त्यामुळे हा देश आहे की काय आहे इथं राहायचं कशाला? अशी हतबलता ते बोलून दाखवतात.याच्याशी कुणालाही वाईट वाटणे राग येणे अपमानजनक वाटणे कसे काय होऊ शकते? हा तुमचा आक्षेप असू शकतो? नक्की कोणत्या बाजूला उभे आहात? )
भालचंद्र नेमाडे यांनी इतिहास चुकीचा मांडला
पुढील ट्विट मध्ये अॅड.आशुतोष दुबे यांनी ज्ञानवापी प्रकरणाचा हस्तक्षेप अन अशा अनेक गोष्टी जोडून :
श्री.नेमाडे यांनी चुकीची माहिती दिलीय असं माझ्या लक्षात आलंय असं म्हटलंय.आणि यामुळे जातीय तणाव आणि अशांतता निर्माण होऊ शकते.असंही म्हटलंय.सार्वजनिक आणि विचलित करणारी एकोपा: श्री. नेमाडे यांचे लेखन आणि सार्वजनिक विधाने विसंवाद भडकवण्याचा आणि विविध धार्मिक समुदायांच्या शांततापूर्ण सहअस्तित्वाला बाधा आणण्याच्या उद्देशाने वाटतात. भालचंद्र नेमाडे यांनी इतिहास चुकीचा मांडला आहे, औरंगजेबाची पत्नी काशीला भेट द्यायला गेली तेव्हा विश्वेश्वरला भ्रष्ट झाली.(भ्रष्ट बलात्कार या अर्थाने) त्याचा कुठेही संदर्भ नाही.असा अॅड.आशुतोष दुबे यांनी पुढे आक्षेप घेतला आहे.
पुढे ते म्हणतात,”नेमाडे यांनी चुकीचा इतिहास उद्धृत करून हिंदू धर्मावर गलिच्छ आरोप करू नयेत. अन्यथा त्यांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल.भालचंद्र नेमाडेंच्या वक्तव्यावरून वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.” ही घटना येथे घडली: शतकोत्तर रौप्य महोत्सवी समारोप समारंभ मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे आज दादर, मुंबई येथे आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते
या कार्यक्रमाला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.आणि ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे आणि अशोक वाजपेयी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितत होते..या कार्यक्रमादरम्यान भालचंद्र नेमाडे यांनी इतिहासातील काही घटनांचा उल्लेख करत अवमानकारक वक्तव्य केले.असं डिटेल्स ट्विट करत अॅड.आशुतोष दुबे यांनी तक्रार दाखल केली आहे.
औरंगजेब सती प्रथा बंद करणारा पहिला राजा – भालचंद्र नेमाडे
- ससून समितीची पलटी;डॉ. घैसास वर गुन्हा दाखल
- भाषा मेल्यावर केवळ शब्द नाही, एक संपूर्ण संस्कृती मरते
- “हंगेरी च्या मिस्कोल्क शहरात आंबेडकर जयंतीचे अप्रतिम आयोजन!”
- मराठा समाजाचे आर्थिक मागासलेपण तपासणाऱ्या आयोगाकडून मराठा समाजाच्या डोळ्यात धूळफेक – सुषमा अंधारे
- अफगाणी तरुण ताहीर ची हृदयस्पर्शी कथा: भारतीय सामाजिक अन्याय ऐकून स्तब्ध
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 08,2023 | 10:17 AM
WebTitle – Complaint filed by BJP against Bhalchandra Nemade in Brahmin Peshwa Aurangzeb case