देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्री बाई फुले यांचा जन्मदिवस. सावित्री बाईंनी आपले संपूर्ण जीवन मुलींच्या शिक्षणासाठी आणि समाज पुढे नेण्यासाठी घालवले. आज सावित्री बाई फुले यांची १९०वी जयंती आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.
स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. सावित्रीबाई फुले यांची जयंती यापुढे सावित्रीबाई फुले शिक्षण दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिनाच्याही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
महात्मा जोतीबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1
कर्मवीर भाऊराव पाटील गरिबांच्या शिक्षणाचा वटवृक्ष
आम्ही जेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील आण्णांचा विचार करतो तेव्हा डोळ्या समोर येतं ते रयत शिक्षण संस्थेचं भलं मोठं वटवृक्ष. परंतू, याच्या मागची पार्श्वभुमी पाहिली असता जातीयव्यवस्थेविरोधी प्रचंड चीड असलेलं एका खमक्या क्रांतिकारी बंडखोरांचं चित्र स्पष्ट दिसतं आणि तो बंडखोर म्हणजे भाऊरावं पाटील..!!
जातीय व्यवस्थेविरुद्ध ठिणगी
कर्मवीर भाऊराव पाटील आण्णा केवळ शिक्षण महर्षीच नव्हते तर, अन्याय
आणि विषमतेची चिड असणाऱ्या महात्मा फुलें, शाहू महाराज आणि संत गाडबेबाबा यांच्या विचारांनी प्रेरीत झालेले जबरी बंडखोर होते.
दलितांना विहारीवर पाणी भरू दिलं जात नाही,
हे पाहून त्या विहीरीचा रहाटच मोडून टाकणाऱ्या आण्णांच्या मेंदूत ही जातीय व्यवस्थेविरुद्ध ठिणगी त्यांच्या बालवयातच पडली होती.
पावसाळ्याच्या दिवसात सर्वजण वर्गात आणि एकच पोरगं अस्पृश्य आहे म्हणुन वर्गाच्या बाहेर खंडीत कुडकुडत बसलेलं पाहून,
आण्णांनी त्याला घरी आणलं, जेवू घातलं आणि कोल्हापुरच्या मिस क्लार्क हाॅस्टेलमधे दाखल केलं तोच पोरगा पुढे शिकला,
विधीमंडळाचा सभासद झाला आणि डाॅ. बाबासाहेबांनी सुरू केलेल्या मुकनायकचा काहीकाळ संपादक ही झाला.
कर्मवीर आण्णा हे महात्मा फुलें यांच्या सत्यशोधक चळवळीचे कर्ते आणि सक्रिय कार्यकर्त्ये राहीले आहेत.
यातून त्यांनी समाज प्रबोधनाचं काम केलं, आणि तळागाळतला विदारक समाज त्यांना आणखी स्पष्टपणे दिसला.
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)