रायपूर – छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Kumar Baghel) यांचे वडील नंदकुमार बघेल यांच्या विरोधात रायपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलीकडेच नंदकुमार बघेल यांनी ब्राह्मणांना ब्राह्मण विदेशी असल्याचा दावा केला होता.बघेल यांच्या वक्तव्यावर ब्राह्मण समुदायानं आक्षेप घेत रायपूरच्या डीडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वडिलांवरच गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मात्र कारवाईचे समर्थन करत कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही असे वक्तव्य केले आहे.
ब्राह्मण विदेशी असल्याचा दावा, Nand Kumar Baghel यांचं कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी
धार्मिक भावना भडकवणे आणि दंगल उकसवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदकुमार बघेल हे छत्तीसगड चे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचे वडील असून भुपेश बघेल यांनी कारवाईचे समर्थन केले आहे.
नंदकुमार बघेल काय म्हणाले जाणून घ्या.
आता मत आमचं आणि राज्य तुमचं असं नाही चालणार.ब्राह्मण परकीय आहेत.ज्या प्रकारे इंग्रज इथून गेले,तसेच ते सुद्धा जातील.ब्राह्मणांनी वेळीच सुधारावं, अन्यथा त्यांनी येथून जाण्यासाठी तयार रहावे.ब्राह्मण आम्हाला अस्पृश्य समजतात.आमचे सारे हक्क हिरावून घेतात.
मातंग समाज अन तरुणांच्या अधोगतीला जबाबदार कोण?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on SEP 6, 2021 13:30 PM
Web Title – Claiming that Brahmins are foreigners, Nand Kumar Baghel’s offensive statement