राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आरएसएस पहिल्यांदाच ख्रिश्चन धर्माच्या सर्वात मोठ्या सणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. आरएसएसचा राष्ट्रीय ख्रिश्चन मंच ख्रिसमस च्या निमित्ताने जम्मू-काश्मीर ते केरळपर्यंत डिनर मेजवानीचे आयोजन करत आहे. (Rss Christmas Dinner party 2022) ख्रिसमस डिनरसाठी भारतातील विविध महत्त्वाच्या चर्चच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, RSS चे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार देखील या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.अशा प्रकारच्या बातम्या मेनस्ट्रीम मिडियातून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.संघाने मात्र याचा इन्कार केल्याचे समजते आहे.
वोटबँक चं राजकारण आपल्याकडे सतत केलं जात आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) देखील आता ख्रिश्चन समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न करताना दिसत असल्याचे बोलले जात आहे.
आरएसएस ख्रिसमस डिनर पार्टी
नॅशनल ख्रिश्चन फोरम (RIM) ही संघाची एक शाखा असून त्यांच्या पुढाकाराने
जम्मू-काश्मीर ते केरळपर्यंत ख्रिसमस सेलिब्रेशनचे आयोजन करत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे.
या ख्रिसमस मेजवानीला देशातील महत्त्वाच्या चर्चचे प्रमुखही उपस्थित राहणार आहेत.
त्याचवेळी संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांचाही या कार्यक्रमांमध्ये सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे.
इफ्तार पार्टीच्या धर्तीवर ख्रिसमस पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचा टोला काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी लगावला. देशातील मुख्य प्रवाहातील गोदी माध्यमे सतत सांगत आहेत की संघाने आपला दृष्टीकोन बदलण्यासाठी आणि समाजातील प्रत्येक वर्गात आपली स्वीकृती वाढवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. त्यासाठीच आरएसएस ने ख्रिसमस डिनर पार्टीचे आयोजन करत ख्रिश्चन समुदायाला भाजपशी जोडण्यासाठी संघाने हा पुढाकार घेतला असल्याचेही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
संघप्रमुख ख्रिश्चनांना देशासाठी धोका मानत होते
जनसत्ता ने बातमीत म्हटलंय की,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) rss (Madhav Sadashivrao Golwalkar) माधवराव सदाशिवराव गोळवलकर यांनी ख्रिश्चनांना भारतासाठी धोकादायक मानले होते. आरएसएसचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक (प्रमुख) केशव बळीराम हेडगेवार यांच्या निधनानंतर गोळवलकर यांनी संघाची सूत्रे हाती घेतली. १९४० ते मृत्यूपर्यंत सुमारे ३३ वर्षे ते संघाचे सरसंघचालक राहिले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी संघाला संस्थात्मक बळ दिल्याचे मानले जाते.
1966 साली गोळवलकरांनी त्यांचे विचार एका पुस्तकात मांडले. ते पुस्तक ‘बंच ऑफ थॉट’ या नावाने प्रकाशित झाले. या पुस्तकाला संघाचे बायबल असेही म्हणतात. हे पुस्तक चार भागात विभागलेले आहे. दुसऱ्या भागात ‘राष्ट्र आणि त्याच्या समस्या’मध्ये ‘अंतर्गत धोका’ हा विषय आहे. या विषयात गोळवलकरांनी मुस्लिम, ख्रिश्चन आणि मुस्लिम हे देशाला असलेला अंतर्गत धोका असल्याचे वर्णन केले आहे.
त्यांचा असा विश्वास होता की ख्रिश्चन त्यांचे कार्य अजेंडा अंतर्गत करतात, साधे आणि निष्पाप लोक त्यांच्या जाळ्यात येतात.
ख्रिश्चनांच्या शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि अनाथाश्रम यांच्या संचालनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून ते लिहितात,
“या सर्व कामांमध्ये कोट्यवधी रुपये ओतण्यात ख्रिश्चनांचा खरा आणि छुपा हेतू काय आहे?”
चर्चेवर हल्ले , संघावर आरोप होता
2008 मध्ये कर्नाटकातील अनेक चर्चवर मालिकेने हल्ले झाले होते. या हल्ल्याचा ठपका संघ परिवारावर ठेवण्यात आला होता.
मात्र, नंतर एका सदस्यीय न्यायिक आयोगाने आरएसएसला क्लीन चिट दिली.
आरएसएसशी संलग्न असलेल्या पाचजन्य मासिकाने चर्च आणि धर्मगुरूंवरही निशाणा साधला होता.
आता आरएसएस ख्रिश्चन समुदायाला जोडण्याचा प्रयत्न करत आहे.
मिडिया रिपोर्टस नुसार,संघ परिवार (आरएसएस) ख्रिस्ती समाजाला जोडण्याचा प्रयत्न करत आहे.या पार्श्वभूमीवर प्रथमच केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉन बार्ला यांनी शुक्रवारी मेघालय हाऊसमध्ये ख्रिसमस डिनर पार्टी चे आयोजन केले असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न राष्ट्रीय ख्रिश्चन फोरमच्या कार्यक्रमात जम्मू-काश्मीरपासून केरळपर्यंत चर्चचे प्रमुख सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांचाही सहभाग अपेक्षित आहे.
नॅशनल ख्रिश्चन फोरमने प्रथमच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या चर्च प्रमुखांनाही आमंत्रित केले आहे.
फ्रॅक्चर्ड फ्रीडम कोबाड गांधी ; पुस्तकात नेमकं काय?
भगवान बुद्धांच्या मूर्तीला भगव्या रंगाने रंगवण्यावरून वाद, प्राचार्यांचे स्पष्टीकरण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 23,2022, 20:04 PM
WebTitle – Christmas dinner party organized by RSS Rashtriya Swayamsevak Sangh