हेनान : चीनच्या रस्त्यांवर रणगाड्यांची रांग लागलेले व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होत आहेत.सदर व्हिडिओ चीन मधिल शेन्डॉंग क्षेत्रातील रिझाओ येथील असल्याचे समजते.रस्त्यावर रणगाडे पाहून स्थानिक नागरिक घाबरले आहेत.रस्त्यावर रणगाडे उतरवण्यामागील तथ्य सुद्धा घाबरवणारे आणि चिंताजनक असेच आहे.लोकांनी आपल्या कष्टाचा घामाचा पैसा ज्या बँक खात्यात ठेवला होता,त्यातून रक्कम गायब करण्यात आलीय.ही रक्कम थोडी थोडकी नसून तब्बल 40 बिलियन चीनी रुपये आहेत.त्यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. बुधवारी हेनान प्रांतातल्या एका बँकेसमोर रणगाड्यांची मोठी रांग लागली. बँक ऑफ चायनानं घेतलेल्या एका निर्णयामुळे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. ग्राहकांनी बँक खात्यात जमा केलेली रक्कम आता त्यांना काढता येणार नाही, असा निर्णय बँकेनं घेतला आहे. त्यामुळे बँकेविरोधात नागरिकांनी आंदोलन सुरू केलंय. बँकेच्या बाहेर ग्राहक मोठ्या संख्येनं जमले आहेत.
बँक ऑफ चायनाच्या हेनान शाखा, बँकेनं ग्राहकांची खाती गोठवली आहेत.
या खात्यातून पैसे काढू देण्याची मुभा द्या, अशी ग्राहकांची मागणी आहे.
ग्राहक हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरले असल्यानं पीपल्स लिबरेशन आर्मीचे रणगाडे तैनात करण्यात आले आहेत.
बँकेच्या सुरक्षेसाठी सरकारनं थेट लष्कराला पाचारण केलं आहे.
ग्राहकांनी त्यांची गुंतवणूक काढता येणार नाही, अशी घोषणा हेनान प्रांतात करण्यात आली.त्यानंतर एकच खळबळ उडाली.
चीन च्या बँक प्रणालीतून 40 अब्ज युआन गायब झाल्याचा दावा:लोक संतापले,रणगाडे उतरले
चीनचा अधिकृत मिडिया ग्लोबल टाइम्सच्या बातमीनुसार,बँक ऑफ चायनाच्या हेनान शाखेत ही घटना समोर आली आहे,लोकांना त्यांच्या बँक खात्यातील बचत ही ‘गुंतवणूक उत्पादने’ आहेत.आणि ती आता काढता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे.18 एप्रिलपासून, हेनानमधील चार ग्रामीण बँकांचे आणि शेजारच्या अनहुई प्रांतातील ग्राहकांना आढळून आले की ते त्यांची रक्कम बँक खात्यातून काढू शकत नाहीत. नंतर, त्यांच्यापैकी काहींनी ऑनलाइन तक्रार केली की ते या समस्येची तक्रार करण्यासाठी झेंगझोऊला येथे (हेडक्वार्टर) जाऊ शकत नाहीत.कोविड मुळे चायना मध्ये कडक नियम आहेत.
लोक प्रवास करू शकत नाहीत कारण लोकांच्या प्रवासाचा आणि COVID-19 न्यूक्लिक अॅसिड चाचणी माहितीचा मागोवा घेणारे त्यांचे डिजिटल आरोग्य कोड रेड झाले आहे. COVID-19 चा प्रसार रोखण्यासाठी, चिनी शहरांमधील बहुतेक सार्वजनिक ठिकाणे आणि सार्वजनिक वाहतूक सेवांना COVID-19 संसर्गापासून सुरक्षित असल्याचे दर्शविण्यासाठी लोकांनी 48-72 तासांच्या आत घेतलेला ग्रीन हेल्थ कोड सादर करणे आवश्यक आहे.ते नसल्यास प्रवास करता येत नाही.
ग्राहकांनी जमा केलेली रक्कम त्यांना १५ जुलैपर्यंत परत केली जाईल, असं आश्वासन हेनान प्रांतात असलेल्या बँकांनी दिलं होतं.
मात्र मोजक्याच ग्राहकांना पैसे मिळाले. बाकीच्यांचे पैसे अडकून पडले.
१० जुलैला हजारपेक्षा अधिक ग्राहक झेंगझोजुहो शाखेच्या समोर आंदोलन करत होते.
बँक ऑफ चायना चीनची केंद्रीय बँक आहे. (आपल्या रिझर्व बँकेप्रमाणे) बँकेच्या निर्णयानंतर होत असलेलं चीनमधलं सर्वात मोठं आंदोलन आहे.
सहा अब्ज युआनचा घोटाळा : एप्रिलमध्ये साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये एक लेख प्रसिद्ध झाला होता. यामध्ये चिनी बँकांमधील घोटाळ्यांबाबत सांगण्यात आले. चीनच्या बँकिंग प्रणालीतून 40 अब्ज युआन किंवा सुमारे US $6 अब्ज गायब झाल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर, हेनान आणि अनहुई प्रांतातील बँकांनी लोकांना बँक खात्यांमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले.
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
चारित्र्यहननच्या आरोपावर कायदेशीर कारवाई करणार – नाना पटोले
मोहम्मद जुबेर ला जामीन,ट्विट करण्यापासून रोखू नये – कोर्ट आदेश
मुलगा होण्याचा नवस पूर्ण वडिलांनी मंदिरात नेऊन तरुणाचा नरबळी दिला
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 21, 2022, 21:44 PM
WebTitle – chinese tanks roll on streets to scare henan bank protestors