नागपूर,दि 27 – कोरोना रुग्णांसाठी दीक्षा भूमी ने मदत केल्याची पोस्ट वायरल होत आहे.देशात कोरोना च्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे.अनेक शहर जिल्हा रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बहुतांश रुग्णांना घरीच उपचार घ्यावे लागत आहेत.अनेक लोकांची घरे लहान आहेत.याशिवाय घरात इतर सदस्य देखील असतात.
त्यामुळे रुग्णासाठी स्वतंत्र खोली उपलब्ध होत नाही.त्यामुळे घरातील इतरांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे.
ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन नागपूर येथील सुप्रसिद्ध दीक्षा भूमीने कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
मानवी इतिहासात रक्ताचा एक थेंबही न सांडता सामाजिक धार्मिक क्रांती करत लाखों करोडो लोकाना नवजीवनाची सुरुवात करून देणाऱ्या सुप्रसिद्ध दीक्षा भूमीवर क्रांती घडवून आणली.
या क्रांतीभूमी दीक्षाभूमीला जगभरातून पर्यटक भेट देण्यास येत असतात.
कोरोना रुग्णांसाठी दीक्षा भूमी ने केली ही मदत
देश विदेशातून दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटक यात्री लोकांसाठी दीक्षाभूमी येथे यात्री निवासाची सोय करण्यात आली आहे.मात्र देश आणि जगभरातही कोरोनाच्या संकटात रुग्णालये ओसंडून वाहू लागली आहेत.रुग्णांना बेड मिळत नाही.विलगीकरणसाठी जागा मिळत नाही.ही परिस्थिती लक्षात घेऊन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती,दीक्षाभूमी नागपूर यांनी कोरोना महामारीच्या विरुद्ध च्या लढ्यात सहभाग नोंदवत सामाजिक जबाबदारीतून आपले यात्री निवास शासनाला रुग्णांच्या विलगीकरण आणि उपचारासाठी उपलब्ध करून दिले आहेत.
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती,दीक्षाभूमी चे सचिव आयु.सुधीर फुलझेले यांनी ही माहिती दिली असून,
क्वारंटाईन सेंटर संदर्भातील पत्र नागपूरचे जिल्हाधिकारी आणि नागपूर महानगरपालिका यांना देण्यात आले आहे.
यासोबतच रुग्ण सेवा आणि रुग्ण सेवेसाठी लागणाऱ्या इतर वस्तु आम्ही उपलब्ध करून देऊ असेही सुधीर फुलझेले यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच,120 कोटी दान संदर्भात एक बातमी वायरल होत असून त्यात तथ्य नसल्याचे देखील सुधीर फुलझेले यांनी स्पष्ट केले आहे.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on APRIL 27, 2021 19: 42 PM
WebTitle – Check out the viral post 120 crores donation by Diksha Bhoomi for Corona patients 2021-04-27