Prophet Muhammad Cartoon: इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र छापल्यानंतर दोन दहशतवाद्यांनी चार्ली हेब्दो (Charlie Hebdo) या साप्ताहिकाच्या कार्यालयावर हल्ला केला होता.
इस्लामचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैंगबर यांचे व्यंगचित्र प्रकाशित केल्यानंतर सात जानेवारी २०१५ रोजी चार्ली हेब्दो च्या पॅरिसच्या येथील कार्यालयावर दोन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये १२ जण ठार झाले होते. या हल्ल्यात फ्रान्समधील काही दिग्गज व्यंगचित्रकारही ठार झाले.त्यानंतर चार्ली हेब्दो जगभरात प्रसिद्ध झाले होते.
भारतातील संघ परिवार उजव्या हिंदुत्ववादी संघटनांनी तेव्हा अभिव्यक्तीचा मुद्दा उपस्थित करत चार्ली हेब्दोचे समर्थन करत गोळीबार करणाऱ्या दहशतवादी लोकांच्या विरोधात जोरदार टीका केली होती.
कारण हा मुद्दा मुस्लिम धर्माशी संबंधित होता.आपल्याला माहीत असले पाहिजे की
जगप्रसिद्ध चित्रकार दिवंगत एम एफ हुसैन यांच्या बाबत मात्र हेच हिंदुत्ववादी आणि त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचे अर्थ बदलले होते.
एम एफ हुसैन यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याने त्यांना देश सोडवा लागला आणि शेवटी देशाबाहेरच त्यांचे निधन झाले.
कोरोनामुळे जात धर्म श्रद्धा अंध श्रद्धा कर्मकांडे हे सगळे भ्रामक असल्याचे गेल्या वर्षभरात दिसून आले.
त्याचप्रमाणे देव ईश्वर नावाची संकल्पना सुद्धा मानवी निर्मिती असून ती अस्तित्वहीन असल्याचे स्पष्ट झाले.
हाच विचार अधोरेखित करत यावेळी या एकूणच परिस्थितीचे वर्णन करणारे व्यंगचित्र चार्ली हेब्दो ने प्रकाशित करून त्यात स्पष्ट केले आहे.
की भारतात 33 कोटी देव असतानाही लोकाना ऑक्सीजन बेड अभावी प्राण सोडावे लागत आहेत.
https://twitter.com/devduttmyth/status/1392686544754941957
लेखक आणि हिंदू धर्म अभ्यासक देवदत्त पटनायक यांनी हे व्यंगचित्र ट्विटरवर शेअर करत म्हणले आहे की “आठवा जेव्हा प्रेषित मुहम्मद यांची चेष्टा करण्याऱ्या चार्ली हेब्डोला हिंदुत्ववाद्यांनी कसा पाठिंबा दर्शविला होता..असो,पण चार्ली हेब्दो हे अशा प्रकारे भारताच्या ऑक्सिजन कमतरतेबद्दल अशाप्रकारे प्रतिक्रिया देत आहे…. क्षमस्व, हिंदुत्ववाद्यांनो … तुम्ही कुणालाही प्रिय नाही आहात”
पॅलेस्टाईन – आधुनिक शस्त्रात्रे टेस्ट करण्याची जागतीक प्रयोगशाळा
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)
First Published on MAY 13 , 2021 15: 13 PM
WebTitle – Charlie Hebdo’s cartoon on India’s overall situation goes viral 2021-05-13