Chandrakant Khaire Vs Vanchit Bahujan Aghadi: लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने भाजपकडून पैसे घेतल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला होता. त्यांनतर वंचित बहुजन आघाडीकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली होती. पुरावे द्या अन्यथा कोर्टात जाणार असल्याची इशारा पक्षाचे प्रवक्ते फारुख अहमद यांनी दिला होता. तसेच खैरे यांनी माफी मागावी अन्यथा काळे फासण्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले यांनी पत्रकार परिषद घेत दिला होता. त्यांनतर आता खैरे यांनी एक पाऊल मागे घेत वंचित बहुजन आघाडी बद्दल केलेलं विधान आपण परत घेत असल्याचं म्हटल आहे.
फारुख अहमद यांनी इशारा दिला होता
खैरेंनी हवेत बोलू नये. बोलण्याचे स्वातंत्र्य असले तरी दुसर्यांवर आरोप करताना विचार पूर्वक बोलले पाहीजे, आरोप करताना पुरावे देणेही आवश्यक असते. भाजपच्या कुठल्या नेत्याने आणि कुठे पैसे दिले त्याचे पुरावे द्या. वंचित बहुजन आघाडीचे चारित्र्य स्वच्छ आहे. खोटे आणि निराधार आरोप करणाऱ्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी कोर्टात गेल्या शिवाय रहाणार नाही. पुराव्या शिवाय आरोप करणारांनी डीफेमेशनच्या केसला तयार रहावे. भ्रष्टाचाराच्या आरोपातून हे स्वतःच्याच नेत्यांना वाचवू शकत नाहीत, यांच्या नेत्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. खरे तर तुमची ही धडपड तुमच्या नेत्यांना वाचवण्या साठी आहे. त्या विषयावर कोर्टात गेलो तर तुमच्या नेत्यांना कोणी वाचवू शकणार नाही हे लक्षात ठेवा.असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारुख अहमद यांनी दिला होता.
माफी मागा अन्यथा,काळे फासण्याचा इशारा
वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं होतं की , चंद्रकांत खैरे यांना आम्ही दोन दिवसांचा वेळ दिला आहे. ज्याप्रमाणे खैरेंनी जालन्यात पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीवर आरोप केले आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद शहरात कुठेही पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर माफी मागावी असा इशारा बकले यांनी दिला होता. दोन दिवसात खैरे यांनी माफी मागितली नाही तर, खैरे दिसतील तिथे त्यांच्या तोंडाला काळे फासणार असेही बकले म्हणाले होते.
वंचित बहुजन आघाडी संदर्भात काय म्हणाले होते चंद्रकांत खैरे?
ईडीच्या चालबाजी कशा असतात मला सर्व काही माहित आहे असं चंद्रकांत खैरे म्हणाले. लोकसभा निवडणुकीत भाजपने एक हजार कोटी रुपये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला दिले असा आरोप खैरेंनी केला. उत्तर प्रदेश निवडणूकीत समाजवादी पार्टीच्या लोकांना फोडण्यासाठी पैसे दिले असं म्हणाले.असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता. मात्र आता त्यांनी घुमजाव करत आरोप मागे घेतला आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येण्यास उत्सुक आहे त्यामुळे माझा त्यांच्यावर राग नाही,मात्र एमआयएमवर राग आहे असेही खैरे यावेळी म्हणाले आहेत.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
हार्दिक पटेल भाजप मध्ये प्रवेश ; अमित शाह ना जनरल डायर म्हणाला होता
हनुमान जन्मस्थळ वाद ; पुजारी महंत भिडले ; हातातला माईक उगारला
मुस्लिम धर्मीय शेख जफर बनले चैतन्य सिंह राजपूत,राजपूतांचा विरोध
First Published by Team JaaglyaBharat on JUN 1, 2022 | 17:00 PM
WebTitle – Chandrakant Khaire withdrew the allegation as the Vanchit Bahujan Aghadi was aggressive