चैत्यभूमी म्हणजे ऊर्जाभूमी. दरवर्षी ईथे येणारा परतताना प्रचंड ऊर्जा घेऊन जात असतो. ईथे केवळ अभिवादनाची औपचारिकता नसते तर या दिवशी महाराष्ट्र व देशाच्या कान्या-कोपऱ्यातून येणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होत असतात.
चळवळीत कुठे काय सुरू आहे याची माहिती मिळते. अनेक विषयांवर चर्चा होतात. पुस्तक चाळली जातात, पुस्तकांची खरेदी होते.अनेक तरुणांना आणि तरुणींना चळवळीची ईथे चळवळीची दीक्षा मिळते.ईथे येणारा अफाट जनसागर मनाला प्रचंड उभारी आणि आत्मविश्वास देत असतो. दरवर्षी लोकांना चैत्यभूमीला भेट देण्याची आस लागलेली असते. कदाचित चैत्यभूमीवरची ऊर्जा त्यांना हवीहवीशी वाटत असते.
चैत्यभूमी म्हणजे ऊर्जाभूमी
मात्र यावर्षी करोनाने निर्माण केलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे चैत्यभूमीवर अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करणे अशक्य होऊन बसले आहे. यंदा मुंबई महानगर पालिकेच्या समन्वय समितीची बैठक यंदा झालीच नाही. (तसेही ही बैठक केव्हा होते हे मोजक्याच कार्यकर्त्याना समजत.) त्यामुळे शिवाजी पार्क व चैत्यभूमीवर काहीही सुविधा उभारल्या पुरवल्या नाहीत. तसेच करोना, लॉकडाऊनमूळे रोजगार गमावलेल्या ग्रामीण भागातील अनेकांना यंदा चैत्यभूमीला भेट देणे अशक्य आहे. शिवाय दिवाळीच्या खरेदीसाठी जी झुंबड उडाली त्यामुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका सुद्धा आहेच.
मागच्या वर्षी चैतभूमीवर घालवलेला वेळ अतिशय अविस्मरणिय होता. यंदा सुद्धा तीच अपेक्षा होती पण करोनाने सगळं प्लॅनिंग धुळीस मिळाले आहे. यंदा चैत्यभूमीवर अभिवादन करण्यास जायचं नाही असं ठरवलं आहे. माझ्या कुटुंबातील कोणीही यंदा चैत्यभूमीला जाणार नाही. आम्ही घरीच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करू. चैत्यभूमी सर्वांसाठी खुली आहे त्यामुळे महापरिनिर्वाणदिनाच्या आधी किंवा नंतर कधीही भेट देता येऊ शकेल पण ५ आणि ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमीला जाणार नाही.
एक वर्ष चैत्यभूमीला नाही गेलो तर आपली आंबेडकरनिष्ठा काही धुळीस मिळत नाही आणि गेलो तर आपण काही आंबेडकरनिष्ठ ठरत नाही.
स्वतःला आंबेडकरवादी म्हणून सिद्ध करण्याचे अनेक मार्ग आहेत.पण ते कोणासाठी आणि का सिद्ध करायचं हा एक प्रश्न आहे.
मुळात आपण चैत्यभूमिला काही सिद्ध करायला जात नसतो. तिथे जाऊन मनाला ऊर्जा आणि उभारी मात्र नक्की मिळत असते.
त्या उर्जेला यावर्षी या मुकण्याची निराशा मनात आहे पण सर सलामत तो पगडी पचास.
याला काही जण घाबरटपणा समजतील तर समजू द्या.
शहाणपणाला घाबरटपणा समजण्याचा गाढवपणा ज्यांना करायचा त्यांना खुशाल करू द्या.
आपण सर्वांनी सारसारविवेकबुद्धीने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती.
नमोबुद्धाय! जयभीम!
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)