तामिळनाडू :चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS General Bipin Rawat) जनरल बिपिन रावत यांच्यासह भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर बुधवारी तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये कोसळले. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.आतापर्यंत तीन जणांना वाचवण्यात यश आले असून इतरांचा शोध सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात चौदा जण होते.
बचावलेल्या तिघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना निलगिरी जिल्ह्यातील वेलिंग्टन कॅन्टोन्मेंट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
CDS जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि एक IAF पायलट हे तामिळनाडूमधील कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान अपघातग्रस्त एमआय-सिरीज हेलिकॉप्टरवर होते, एएनआय वृत्तसंस्थेने वृत्त दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, CDS बिपिन रावत कोईम्बतूरजवळील सुलूर येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरून कुन्नूरमधील वेलिंग्टनला जात होते. बुधवारी ते दिल्लीहून सुलूरकडे रवाना झाले.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टर अपघाताच्या ठिकाणावरील व्हिज्युअल्समध्ये मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ दिसत आहेत,स्थानिक लोक तात्काळ बचाव कार्यात मदत करत असल्याचे दिसून दिसून येत आहे.अनेक पथके शोध आणि बचाव कार्य करत आहेत. स्थानिक लष्करी अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि त्यांना सांगण्यात आले आहे की स्थानिकांनी 80 टक्के भाजलेले दोन मृतदेह स्थानिक रुग्णालयात नेण्याची माहिती मिळत आहे.
हवाई दलाने दिले चौकशीचे आदेश
भारतीय हवाई दलाने ट्विटरवर या घटनेची पुष्टी केली असून अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे..
जागल्याभारत च्या व्यंगचित्रावर दैनिक सकाळ मधिल बातमीवर खुलासा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्कृत राष्ट्रभाषा करण्याचा दावा खरा आहे?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
( @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 08, 2021 14:40 PM
WebTitle – CDS General Bipin Rawat’s helicopter crashes in Tamil Nadu