नुकतीच भारताला संविधान देणाऱ्या समानता न्याय व्यक्तीस्वातंत्र्य यासाठी झडगणाऱ्या आणि नवा इतिहास घडविणाऱ्या आधुनिक भारताला घडविणाऱ्या राज्यघटनाकारांची जयंती देशभरात उत्साहात साजरी झाली,अनेक ठिकाणी अनेक जाती धर्माच्या लोकांनी जयंती उत्साहात साजरी केली.मात्र काही ठिकाणी अजूनही मानवता वृद्धिंगत झाल्याचे दिसून येत नाही.अमानवी अमानुषता तिथं आजही वरचढ दिसते.मध्य प्रदेशात (मध्य प्रदेश) दलित समाजातील भारताच्या सीमेवर तैनात असणाऱ्या एका सैनिकाची मिरवणूक काही लोकांनी रोखल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर भारताच्या दलित सैनिक च्या वरातीवर जातीयवादी गुंडांकडून दगडफेक करण्यात आल्याची बातमी समोर आलीय,या दगडफेकी सहा जण जखमी झाले आहेत. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचताच पोलिसांच्या संरक्षणात दुसऱ्या दिवशी पुन्हा गावात दलित सैनिकाची मिरवणूक काढण्यात आली.
भारताच्या दलित सैनिक च्या वरातीवर जातीयवाद्यांकडून दगडफेक
मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात काही लोकांनी दलित वराची मिरवणूक रोखली.भारताच्या दलित सैनिक च्या वरातीवर जातीयवाद्यांकडून दगडफेक करण्यात आली.ही घटना गरोठ पोलीस ठाण्याच्या पिपलिया राजा गावातील आहे.येथील दलित कुटुंबातील अर्जुन मेघवाल, जो भारतीय लष्करात आहे, त्याची बुधवारी रात्री मिरवणूक काढण्यात येत होती. दरम्यान, ओबीसी प्रवर्गातील मीणा समाजाच्या तरुणाची मिरवणूकही काढण्यात आली होती, अर्जुन मेघवाल यांची मिरवणूक येताना पाहून जातीयवाद्यांनी मार्गात दगड-काटे टाकले. या मार्गावरून अर्जुनची मिरवणूक निघाली असता ती थांबवण्यात आली, त्यावरून वाद झाला.
इतकच नाही तर,त्यानंतर काही जातीयवादी गुंड अर्जुनच्या घरी पोहोचले आणि त्यांनी घरातील सदस्यांना मारहाण आणि तोडफोड केली, तसेच दगडफेक केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही लोकांनी दगडफेक केली, त्यामुळे पोलिसांच्या वाहनाचे देखील नुकसान झाले. या दगडफेकीत सहा जण जखमी झाले असून, पोलिसांनी पीडित पक्षाच्या तक्रारीवरून २९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
रात्री वरात निघू शकली नाही
जातीयवाद्यांनी हल्ला करत दगडफेक केल्याने बुधवारी रात्री अर्जुन मेघवाल यांची वरात निघू शकली नाही, मात्र दुसऱ्या दिवशी गुरुवारी पोलिस संरक्षणात ही वरात काढण्यात आली.यावेळी नातेवाईक मित्र इत्यादी सर्वांनी उत्साहात सहभाग घेतला. गरोठ पोलीस ठाण्याच्या लाखा खेडी गावात अर्जुनचे लग्न आहे.
भारताच्या सीमेवर देशाचं रक्षण करणारा एक लष्करी जवान जो केवळ जन्माच्या अपघाताने दलित आहे.
त्याला अशाप्रकारची वागणूक आजही 21 व्या शतकात जात व्यवस्था असणाऱ्या समाजातून दिली जात आहे ही अत्यंत वेदनदायी गोष्ट आहे.
हे चित्र कधी बदलणार?
‘आज बिलकीस उद्या कोणीही असू शकते’, दोषींच्या सुटकेवर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
डॉ.आंबेडकर यांचा भारतातील सर्वात उंच पुतळा
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 19,2023 19:30 PM
WebTitle – Casteists throw stones at the wedding ceremony of a Dalit soldier in India