कमल हासन हे बॉलीवूड तसेच साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध नावांपैकी एक आहे. जेव्हापासून त्यांनी ‘विक्रम’ (Vikram movie) या चित्रपटाची घोषणा केली तेव्हापासून चाहत्यांनी आनंदाने उड्या मारल्या आहेत. बरं, हा चित्रपट 3 जून रोजी मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे आणि उत्कंठा वाढवण्यासाठी निर्मात्यांनी नुकतेच पहिले गाणे ‘पत्थला पत्थाला’ (pathala patthala song ) रिलीज केले आहे.हे गाणं सध्या तूफान लोकप्रिय होत असून याच गाण्यामुळे कमल हासन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.सदर गाणं स्वत: कमल हासन यांनीच लिहिलं असून अनिरुद्ध रविचंदर यांनी ते संगीतबद्ध केले आहे. मात्र याच गाण्यामुळे कमल हासन सध्या अडचणीत सापडले आहेत.
काय आहे वाद ?
मिडिया रिपोर्टनुसार, एका सामाजिक कार्यकर्त्याने असा दावा केला आहे की
‘पत्थला पत्थाला’ या गीताचे बोल वादग्रस्त आहेत.या गीतामधून केंद्र सरकारची खिल्ली उडवली जात आहे
आणि यामुळे लोकांमध्ये फूट पडत आहे. असा आरोप तक्रार दाखल करण्याऱ्या सेल्वम यांनी केला आहे.
चित्रपटाच्या टीमला गाण्यातील काही बोल काढून टाकण्याची विनंती करण्यात आलीय.
तसेच कमल हासन यांच्या विरोधात चेन्नई येथील पोलीस आयुक्त कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपण केलेल्या तक्रारीवर कारवाई न झाल्यास विक्रम चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी
मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णयही या कार्यकर्त्याने घेतला आहे.
दरम्यान, एवढा वाद निर्माण करणाऱ्या गाण्यातील बोल असे आहेत “गज्जनाले कसिल्ले कल्लालय्युम कसिल्ले कैचल जोराम नेरैया वरुधू थिल्ललंगडी थिल्लाले ओंड्रियाथिन थापाले ओन्नियुम इल्ला इप्पाले सावी इपो थिरुदन कैला थिल्लांगडी थिल्लाले.” हे गाणे सर्व संगीत प्लॅटफॉर्मवर चांगली कामगिरी करत आहे कारण चाहत्यांना कमल हासनच्या स्थानिक मद्रास स्लँगचा आनंद मिळतोय.‘पत्थला पत्थाला’ या गाण्याला 770K+ लाईक्ससह 14 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि ते टॉपवर ट्रेंड करत आहे.
विक्रम हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून यामध्ये कमल हासन आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत.शिवानी नारायणन, कालिदास जयराम, नारायण, अँटनी वर्गीस आणि अर्जुन दास यांच्या सहायक भूमिका आहेत. लोकेश कंगराज दिग्दर्शित आणि कमल हसनची निर्मिती, राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल, या चित्रपटासाठी संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य,शिक्षण मंडळाचा निर्णय
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 14, 2022 12:35 PM
WebTitle – Case filed against Kamal Haasan; indirect mockery of Central Government in virkam movie song