California News: अमेरिकेतील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक असलेल्या कॅलिफोर्निया राज्यात जातीय भेदभावावर बंदी घालणारे विधेयक Anti-caste Bill SB-403 मंजूर करण्यात आले आहे. जातीय भेदभावविरोधी कायद्यांमध्ये संरक्षित श्रेणी म्हणून असा कायदा करणारे अमेरिकेचे पहिले राज्य बनले आहे. कॅलिफोर्निया राज्याच्या सिनेटमध्ये (हाऊस) जातद्वेषविरोधी कायदा ३४-१ मतांनी मंजूर करण्यात आला.
कॅलिफोर्निया हे अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावर स्थित आहे. हे तेथील सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य आहे, क्षेत्रफळात ते अलास्का आणि टेक्सास नंतरचे तिसरे मोठे यूएस प्रांत आहे. कॅलिफोर्नियाच्या उत्तरेला ओरेगॉन आणि दक्षिणेला मेक्सिकोची सीमा आहे.या राज्याची राजधानी सॅक्रामेंटो आहे. अमेरिकन मीडियाने वृत्त दिले आहे की कॅलिफोर्निया राज्याच्या सिनेटने सिनेटर आयेशा वहाब यांनी सादर केलेल्या जातीविरोधी विधेयक SB-403 ला मंजुरी दिली आहे. तेथे झालेल्या मतदानात या विधेयकाच्या बाजूने 34 तर विधेयकाच्या विरोधात केवळ 1 मत पडले.
सिनेटर आयशा वहाब यांनी Anti-caste Bill SB-403 विधेयक सादर केले
जातविरोधी विधेयक SB-403 मंजूर झाल्यानंतर कॅलिफोर्निया राज्यातील सर्व लोकांना समान घर,
फायदे आणि सुविधा मिळू शकतील, असे सांगण्यात येत आहे. त्यांना सर्व व्यावसायिक आस्थापनांमध्ये विशेषाधिकार मिळतील.
अहवालानुसार, SB-403 त्यांना स्पष्ट संरक्षण प्रदान करते.ज्यांचे जातीय पक्षपात आणि पूर्वग्रह यामुळे पद्धतशीरपणे नुकसान झाले आहे.
हे विधेयक सिनेटमध्ये मंजूर झाल्यानंतर कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले आहे.
जिथे वंश अन जातीच्या आधारावर भेदभाव बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे.
मनुवाद्यांनी आता तिकडे जातीवाद केला तर भारी पडेल
जातविरोधी विधेयक Anti-caste Bill SB-403 मंजूर झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांमध्ये त्याची चर्चा होत आहे.
एका व्यक्तीने सांगितले की, आता कॅलिफोर्नियामध्ये कोणी जातीयवाद केला तर त्याला मोठी किंमत मोजावी लागेल.
द न्यूज बिक चे संपादक सुमित चौहान म्हणाले,“जातीयवाद्यांनो कॅलिफोर्नियाची कारागृहे तुमची वाट पाहत आहेत. तुम्हाला काय वाटले की भारताप्रमाणे अमेरिकेतही जातीवाद कराल आणि वाचाल. आता जातीविरोधी कायदा #SB403 अंतर्गत तुम्हाला कॅलिफोर्नियामध्ये तुरुंगात जावे लागेल. नोकरीही जाईल, त्यामुळे काळजी घ्या. तिथे ना पोलीस स्टेशन तुमच्या जातीचे असेल, ना वकील, ना न्यायाधीश तुमच्या जातीचे असतील. स्वतःला सुधारा, माणूस व्हा नाहीतर तुम्हाला त्रास होईल. मग मला सांगितले नाही असे म्हणू नका.”
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 29,2023 | 12:15 PM
WebTitle – California Enacts Landmark Anti-Caste Bill SB-403, Prohibiting Racial Discrimination