बुलढाणा/29-07-2023 : बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर शहरातून मोठा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आलीय.buldhana Bus Accident दोन खाजगी ट्रॅव्हल्स ची धडक होऊन हा भीषण अपघात झाला,अपघात इतका भीषण होता की यात 7 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर इतर 30 ते 35 जन जखमी झाल्याची माहिती समोर आलीय,अपघाताचे स्वरूप पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.हा भीषण अपघात आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास मलकापूर शहरामधिल महामार्ग क्रमांक सहा लक्ष्मीनगर उड्डाण पुलावर झाल्याचे कळतेय.
बसमध्ये अमरनाथ यात्रेकरू
या दोन ट्रॅव्हल्स पैकी buldhana Bus Accident 35 ते 40 भाविक असणारी एक ट्रॅव्हल्स MH 08 9458 अमरनाथ यात्रा करून हिंगोलीच्या दिशेने येत होती,तर दुसरी ट्रॅव्हल्स MH 27 B 4466 नागपूरवरून नाशिकच्या दिशेने चालली होती ज्यात 25 ते 30 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.या दोन्ही ट्रॅव्हल्स आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास मलकापूर शहरामधिल महामार्ग क्रमांक सहा लक्ष्मीनगर उड्डाण पुलावर एकमेकांच्या समोर येऊन धडकल्या,ही धडक एवढी जोरदार अन भीषण होती की यात सात प्रवासी जागीच गतप्राण झाले.इतर जखमी प्रवाशांना स्थानिक उपचारांसाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलंय.अशी माहिती समोर आलीय.
दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की यात दोन्ही बस चं मोठं नुकसान झालं असून
हा अपघात नेमका कोणत्या कारणाने झाला ते अजून स्पष्ट झालेलं नाही.
पोलीस अधीक्षक सुनील कडासने, उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी यांनी अपघातस्थळी भेट दिली.
बुलढाणा समृद्धी मार्गावर झालेला असाच अपघात
महाराष्ट्रातील बुलढाणा येथील समृद्धी महामार्ग द्रुतगती मार्गावर एक हृदयद्रावक घटना घडली होती.यात 32 प्रवाशांना घेऊन नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या एसी बसला आग लागली होती. हा बसचा अपघातही इतका भीषण होता की यात 26 जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त होते.Buldhana Samriddhi Highway bus accident, 26 people died डेप्युटी एसपी बाबुराव महामुनी यांनी सांगितले की, जखमी प्रवाशांना बुलढाणा येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 29,2023 | 11:35 AM
WebTitle – Buldhana bus accident 7 dead, 30 injured while coming from Devadarshan