व्यंगचित्र: बजेट 2021
आक्रसलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठीचे सरकारचे प्रयत्न अपुरे
२०२०-२१ या आर्थिक वर्षांत देशाचा जीडीपी ७.७ टक्क्याने घसरेल असा अंदाज राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेने व्यक्त केला आहे. या अगोदर रिझर्व्ह बँकेने जीडीपी ७.५ टक्क्याने घसरेल असा अंदाज वर्तवलाच होता. तर जागतिक बँकेने ९.६ टक्क्याने जीडीपी घसरेल असे सांगितले होते. पण सरकारने गुरुवारी अधिकृतपणे जीडीपी घसरेल असे आता सांगितले आहे.आक्रसलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठीचे सरकारचे प्रयत्न अपुरे पडत आहेत.
गेल्या ४० वर्षांतली सर्वांत मोठी ही घसरण आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षांत कृषी क्षेत्र वगळून अन्य सर्व क्षेत्रांमध्ये ही घसरण असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेचे म्हणणे आहे.२०२०-२१ या आर्थिक वर्षांत जीडीपी १२३.३९ लाख कोटी रु. राहील असा अंदाज होता. तर २०१९-२०मध्ये जीडीपी १३३.०१ लाख कोटी रु. इतका होता. ही आकडेवारी महत्त्वाची आहे कारण आता जीडीपी वाढण्याच्या अनुषंगाने सरकारला आपला आगामी अर्थसंकल्प मांडावा लागणार आहे.
कोरोना महासाथीचा जबर फटका
कोरोना महासाथीचा जबर फटका गेल्या वर्षी अर्थव्यवस्थेला बसला होता.
असंघटित क्षेत्रातील उलाढाल पूर्ण थांबली होती. कारखानदारी व अन्य व्यवसायही कोरोना महासाथीमुळे अडचणीत आले होते.
आता गेल्या तीन महिन्यापासून अर्थव्यवस्थेची चक्रे फिरण्यास सुरूवात झाली आहे.
काही क्षेत्रांमध्ये तसे परिणामही दिसू लागले आहेत.
डिसेंबर २०२० मध्ये जीएसटी संकलन ११.६ टक्क्याने वाढून १.१५ लाख कोटी रु. इतके झाले होते.
वाढलेली महागाई, बेरोजगारी आणि पगार कपात झाल्याने लोकांच्या खर्च करायच्या क्षमतेवर परिणाम होतोय.
सध्यातरी सणासुदीचा काळ असल्याने अर्थव्यस्थेतली वस्तूंची मागणी वाढलेली आहे.
पण ही तेजी जानेवारी – फेब्रुवारीपर्यंत संपेल आणि त्यानंतर खरी परिस्थिती समोर येईल.
महाराष्ट्र व कामगार दिनाचा इतिहास
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो.. @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)