बुद्धविचार
” राहुल ,आरश्याचा उपयोग काय ?”
“प्रतिबिंब पाहण्यासाठी .”
“त्याच प्रमाणे राहुल,आपलं वागण-बोलण त्याची प्रतिक्रिया काय होईल हे जाणूनच करायला हवं.आपल्याकडून घडणाऱ्या कृतीचा आपल्यावर आणि इतरांवर काय परिणाम होईल याचा विचार केलाच पाहिजे.नाहीतर त्यातून फक्त दुःखच निर्माण होतं म्हणून हि जाणीव झालीच पाहिजे.असे म्हणणारा बुद्ध सर्वांना माहित व्हायलाच हवा.
“बुद्धं सरणं गच्छामी” हे नुसतं म्हणता येण वेगळं आणि ते आत्मसात करणं वेगळ .
नमो बुद्धाय!! अत्त दीप भव !!!
by कविता गवारे
#बुद्ध #भगवानबुद्ध #buddha #buddhaquote #बुद्धविचार #jaaglyabharat #jaaglya #jaglya #जागल्या
विज्ञान आणि भगवान बुद्ध: बुद्ध कालबाह्य आहे?
भगवान बुद्ध आणि विज्ञान यांचा संबंध आहे का? भगवान बुद्ध कालबाह्य आहे असं एके ठिकाणी वाचलं.बुद्ध कालबाह्य आहे का? मध्यंतरी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीच कुणीतरी बौद्ध धम्मातील वैज्ञानिक दृष्टिकोण काय? बुद्ध धम्मात विज्ञान आहे का? अशा पद्धतीची चर्चा घडवून आणली तिथं अनेकांनी टिंगल उडवली.याची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न.
बिग बँग थिअरी फार अलिकडची आहे.19 व्या शतकात म्हणजे १९३१ ला जॉर्ज लेमाइटर यांनी प्रथम एका महास्फोटाची संकल्पना मांडल्याचे दिसते.बिग बँग थिअरी आणि जॉर्ज लेमाइटर यांचं मत यात साम्य आहे.त्याला दुसरे शास्त्रज्ञ हबल यांनी दुजोरा दिला.हबल दुर्बिण आपण ऐकलं असेल या दुर्बिणचे नाव याच एडविन हबल यांच्या नावावरून देण्यात आलं आहे.
बिग बँग थिअरीनुसार, महास्फोट झाला. त्यानंतर प्रचंड प्रमाणावर ऊर्जा निर्माण झाली.त्यावेळी वातावरणात तापमान जवळपास पाच अब्ज अंश सेल्सिअस एवढे होतं. या ऊर्जेतून अनेक घटक बाहेर पडत होते. प्रसरणामुळे थंड होऊन त्यातून न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन यांसारखे अतिसूक्ष्म कण तयार झाले. विश्व पुरेसे थंड झाल्यानंतर या अतिसूक्ष्म कणांपासून प्रभाररहीत अणू तयार झाले. प्रसरण पावणाऱ्या घटकांवर गुरुत्वीय बलाचा परिणाम होऊन ते एकत्र येऊ लागले आणि त्यांचे पुंजके तयार झाले. त्यातूनच तारे, ग्रह, आकाशगंगा यांचा जन्म झाला. महास्फोटानंतर तयार झालेल्या हायड्रोजनचा वापर करून आजही नवीन तारे जन्म घेतात.
पुर्ण लेख वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा विज्ञान आणि भगवान बुद्ध: बुद्ध कालबाह्य आहे?
भगवान बुद्धांचा मृत्यू कोणता पदार्थ सेवन केल्याने झाला? जाणून घ्या..
हे ही वाचा.. बुद्ध पौर्णिमा हिंदू तिथी पंचांगाप्रमाणे येते का?
काय पिंपळ दिवस रात्र हवेत प्राणवायू सोडतो ?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)