गौतमबुद्ध एकदा एका गावात प्रवचनासाठी गेले होते.
त्यावेळी काही विरोधक गावकरी जमा झाले.
त्यांनी बुद्धांभोवती कडं केलं आणि अपशब्दांचा भडीमार सुरु केला.
अपशब्द वापरण्यावरून गोष्टी शिविगाळीवर आल्या.
सुमारे दहा ते पंधरा मिनिटं गावकरी शिव्या देत होते.
बुद्ध मात्र शांतपणे त्या ऐकून घेत होते.
‘शिव्या देऊन देऊन गावकरी गप्प बसले’.
बुद्ध म्हणाले “तुमच्या गप्पागोष्टी संपली असतील तर तसं सांगा.
अजून काही गप्पा राहिल्या असतील
तर परतीच्या वाटेवर मी ह्याच गावातून जाईन.तेव्हा बोलू.”
तेव्हा एकजण पुढे आला आणि आश्चर्याने म्हणाला,
“या गावकऱ्यांनी तुमच्यावर शिव्यांचा इतका भडीमार केला
आणि तुम्ही याला गप्पागोष्टी म्हणता?”
यावर गौतम बुद्ध म्हणाले,”या अगोदर मी ज्या गावात गेलो होतो
त्या गावातल्या लोकांनी माझ्यासाठी फुलांच्या माळा,फळफळावळ,
सोनं-नाणं,दाग-दागिने यांचा नजराणा केला.
मी त्यांना सांगितलं, मी सर्वसंगपरित्याग केला आहे.
मी या गोष्टी स्वीकारू शकत नाही.
गावकरी खिन्न झाले.म्हणाले,’आता आम्ही या गोष्टींचं काय करायचं?’.
भगवान बुद्धांनी म्हटलं,’या वस्तू आपापसात वाटून घ्या.
ज्याप्रमाणे मी त्यांच्या वस्तूंचा स्वीकार केला नाही ,
त्याप्रमाणे मी या शिव्याही घेतल्या नाहीत,
तुम्ही त्या आपापसात वाटून घ्या.”
क्रोध मत्सर माणसाला उध्वस्त करतो.
बुद्ध म्हणतात “राग कवटाळून धरणे हे स्वत:विष पिऊन समोरच्या व्यक्तीच्या मरणाची वाट पाहण्यासमान आहे”
by Milind Dhumale
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)