लखनऊ: उत्तर प्रदेशातील 2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतलेले राजकीय पक्ष एकमेकांवर हल्ला करत आहेत आणि सल्ले सुद्धा देत आहेत. दरम्यान, बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी शनिवारी समाजवादी पक्षात दाखल झालेल्या निलंबित आमदारांना पावसाळी बेडूक म्हटले आहे.तसेच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर इशाऱ्यात निशाणा साधला आहे.
बसपा प्रमुख मायावती यांनी रविवारी दोन ट्विट करत समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना सल्ला देत इशाराही दिला. मायावती म्हणाल्या की, उत्तर प्रदेशातील सार्वत्रिक निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, आता पुन्हा या पक्षातून त्या पक्षात पक्षांतराचे दिवस येवू लागले आहेत. यामुळे कोणत्याही पक्षाचा जनाधार वाढणार नसून, त्यांचेच नुकसान होणार आहे, असे त्या म्हणाल्या.अशा पावसाळी बेडकांना बसपचे लोक पक्षापासून दूर ठेवतील, असे त्या म्हणाल्या.
बसपा अध्यक्ष मायावती यांनी माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष
अखिलेश यादव यांच्यावर इशाऱ्यात निशाणा साधला आहे.
पक्षांतरितांचा समावेश करून पक्षाचा जनाधार वाढणार नाही, असे मायावती म्हणाल्या.
बसपाच्या लोकांनी अशा पावसाळी बेडकांना पक्षापासून दूर ठेवावे. शनिवारी बसपाच्या सहा आमदारांनी सपामध्ये प्रवेश केला.
अखिलेश यादव यांनी बसपाच्या सहा आमदारांना समाजवादी पक्षाचे सदस्यत्व दिले आहे.या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.
दरम्यान यूपी निवडणुकीसंदर्भात गौतम बुद्ध नगरमध्ये राजकीय घडामोडीना वेग आला आहे. मायावतींनी आपले पत्ते उघडून येथील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यात मनवीर भाटी यांना बसपच्या वतीने दादरी विधानसभेचे तिकीट मिळाले आहे. दुसरीकडे जेवर विधानसभेतून नरेंद्र भाटी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बसपाचे पश्चिम उत्तर प्रदेश प्रभारी शमशुद्दीन रैने यांनी कामगार परिषदेत ही घोषणा केली.
बसपाच्या कार्यकर्ता परिषदेत शक्तीप्रदर्शन
गुरुवारी मायावतींनी त्यांच्या मूळ गावी बादलपूरमध्ये कार्यकर्ता मेळावा घेतला होता.
ज्यामध्ये त्यांनी आपली ताकद दाखवून भाजप आणि सपाला आव्हान दिले होते.
पक्षाच्या वतीने दादरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आलेले
मनवीर भाटी हे मूळचे ग्रेटर नोएडातील बिसरख गावचे आहेत.
यावेळी स्थानिक लोकांममधूनच एका कार्यकर्त्याला पक्षाकडून उमेदवारी दिली गेली आहे.
निवडणुकीत बहुतेक पक्षांवर आरोप केले जातात की, त्यांच्या मतदार संघात बाहेरून उमेदवार आयात केले जातात.
त्यामुळेच यावेळी पक्षाने स्थानिक जनतेतील कार्यकर्त्यांना पक्षाचे उमेदवार म्हणून उभे केले आहे.
फॅक्ट चेक : शाहरुख खानचे वडील स्वातंत्र्यसैनिक नव्हते का?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 31, 2021 16:05 PM
WebTitle – BSP chief Mayawati mocked Akhilesh Yadav