ब्रिटन: सोशल मीडियावर जातीयवादी आक्षेपार्ह संदेश पोस्ट केल्यामुळे एका व्यक्तीला 18 आठवड्यांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
ब्रिटन थेम्स व्हॅली पोलिसांच्या तपासानंतर ही अटक करण्यात आली आहे.त्याच्यावर आक्षेपार्ह/अशोभनीय/अश्लील/धोकादायक संदेश/प्रकरण पाठवल्याबद्दल कम्युनिकेशन ऍक्ट 2003 च्या कलम 127(1)(अ) आणि (3) च्या section 127(1)(a) and (3) of the Communications Act 2003 for sending an offensive/indecent/obscene/menacing message/matter. विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अमरिक सिंग बाजवा Amrik Singh Bajwa असं या जातीयवादी व्यक्तीचं नाव असल्याचं समोर आलं आहे.
अमरिक सिंग बाजवा Amrik Singh Bajwa ने गेल्या वर्षी 19 जुलै रोजी टिक टॉकवर अत्यंत आक्षेपार्ह संदेश पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये तथाकथित ‘चमार’ आणि ‘चौहरा’ समुदायांना ‘Chamaar’ and ‘Choohra’ communities [भारतात दलित म्हणून वर्णन केलेल्या] लैंगिक शोषण, बलात्काराच्या धमक्या देऊन अश्लीलता दाखवून जाणीवपूर्वक लक्ष्य केले. टिक टॉक संदेशात, बाजवा यांनी अभिमानाची बाब म्हणून भारतीय खेड्यांमध्ये दलित महिलांचे लैंगिक शोषण केल्याबद्दल तथाकथित ‘जाट’ समुदायाचा गौरव देखील केला होता.
भगवान वाल्मिक सभा, साउथॉल, श्री गुरु रविदास सभा (यूके आणि युरोप), श्री गुरु रविदास सभा,
ग्रेव्हसेंड, शीख फेडरेशनचे सदस्य न्यायालयीन कामकाजादरम्यान स्लोग मॅजिस्ट्रेट कोर्टाबाहेर उपस्थित होते.
हे प्रकरण प्रथम क्राउन प्रॉसिक्युशन दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे गेले परंतु नंतर अंतिम निर्णयासाठी
अॅटर्नी जनरलकडे पाठवण्यात आले. यूकेमध्ये अशा प्रकारची ही कदाचित पहिलीच घटना आहे
जिथे जातीवर आधारित अपशब्द आणि लैंगिक द्वेषयुक्त भाषणांवर कारवाई झाली आहे.
कास्ट वॉच यूके ने दिलेल्या बातमीनुसार, ‘अमरिक सिंग बाजवा याने गुन्हेगारीदृष्ट्या बेपर्वाइने ही जातीयवादी उल्लेख असणारा व्हिडिओ तयार करून तो ऑनलाइन पोस्ट करून लोकांना पाहण्यासाठी सहर शेअर केला.हे कृत्य एका जातीसमूहाने दुसर्या जातीसमूहाबद्दल तिरस्कार दर्शविते, ही प्रथा भारतासारख्या देशांमध्ये परिचित आहे मात्र आता ब्रिटनमध्ये त्याचे पडसाद उठत असल्याचे दिसून येतेय.ब्रिटनमध्ये अशाप्रकारे जातीय द्वेषयुक्त भाषण आणि शिवीगाळ खपवून घेतली जाणार नाही, असा मजबूत संदेश देत या जातीयवादी व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे.
भारतीय मिडियामध्ये ही बातमी तुम्हाला कुठेच दिसणार नाही.त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा.
Medical stores वर आंधळा विश्वास ठेवू नका;Wellness forever Medical
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 07,2023 16:40 PM
WebTitle – British police arrested Amrik Singh Bajwa who posted casteist posts