बिहार,बक्सर, दि. 11 – एकीकडे करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने अनेक ठिकाणी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी वेटिंग असून मोठमोठ्या रांगा लागल्या असताना यादरम्यान गंगेच्या किनारी कोरोना रुग्णांचे मृतदेह वाहून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे प्रशासन चिंतेत आहे. बिहारमधील बक्सर मध्ये गंगेच्या किनारी लागलेला मृतदेहांचा ढीग पाहून गावकरीदेखील घाबरले आहेत. गंगेच्या पाण्यात कोरोना मृतदेह टाकून देण्यात आल्याच्या बातमीने खळबळ उडाली असून वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, चौसा शहरात हा प्रकार घडला आहे.
हे मृतदेह उत्तर प्रदेश येथून वाहून आले असल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. संबंधित करोना रुग्णांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी किंवा दफन करण्यासाठी जागा मिळाली नसावी असा अंदाज आहे.
या प्रकरणाचे जे फोटो समोर आले आहेत ते हृदयद्रावक आहेत. या मृतदेहांना जनावरं फाडून खाताना दिसत आहेत.
30 ते 40 इतके मृतदेह गंगेत सापडले
चौसाचे गटविकास अधिकारी अशोक कुमार यांनी बीबीसीला सांगितलं, “30 ते 40 इतके मृतदेह गंगेत सापडले आहेत.
हे मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहत इथपर्यंत आल्याची शक्यता आहे.
मी घाटाशेजारी राहणाऱ्या नागरिकांशी चर्चा केली आहे, त्यांचं म्हणणं आहे की, हे मृतदेह इथले नाहीत.”
“४० ते ४५ मृतदेह पाण्यात तरंगत होते,” अशी माहिती चौसा जिल्ह्याचे अधिकारी अशोक कुमार यांनी दिली आहे.
हे मृतदेह गंगेच्या पाण्यात फेकून दिले असावेत अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.
मृतदेहांची संख्या १०० पर्यंत जाऊ शकते असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
स्थानिक रहिवासी चंद्रमोहन म्हणतात, “खासगी रूग्णालयात लूटमार चालली आहे. लोकांकडे आता स्मशानभूमीत जाण्यासाठी आणि पंडितावर पैसे लुटवण्यासाठी पुरेसे पैसे उरलेले नाहीत. दोन हजार रुपये फक्त रुग्ण वाहिकेतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी घेतले जात आहेत.आता फक्त गंगा नदी हाच एक पर्याय लोकांसाठी उरला आहे,त्यामुळे लोक गंगेमध्ये मृतदेह टाकत आहेत.”
बिहारमध्ये दररोज सुमारे १०,००० संसर्ग होण्याच्या घटना घडत आहेत आणि 60 हून अधिक मृत्यू होत आहेत. बिहारमधील कोरोनामुळे आतापर्यंत 3282 लोक मरण पावले आहेत.
काल म्हणजेच, राज्यात 11,259 नवीन रुग्ण आढळले आणि 67 लोकांचा बळी गेला.
कुंभमेळा उत्तराखंड मध्ये रुग्णसंख्येचा विस्फोट! धडकी भरवणारे आकडे
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)
First Published on MAY 11 , 2021 13: 35 PM
WebTitle – Bodies of suspected COVID-19 victims found floating in Ganges in Bihar 2021-05-11