2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप प्रत्येक आघाडीवर जोरदार तयारी करत आहे. विरोधक मात्र सुस्त दिसतात,तर भाजपने कंबर कसलेली दिसते.अल्पसंख्याक समाजातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजप मोदी मित्र modi mitra हा एक नवीन कार्यक्रम सुरू करत आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चा अशा लोकांना प्रमाणपत्र देणार आहे की जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे आणि उपक्रमांचे कौतुक करतील.पसमांदा मुस्लिम घटकांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे.गुरुवार, 22 जून रोजी, भाजप देवबंद, यूपीमधील सुमारे 150 मुस्लिमांना ‘मोदी मित्र प्रमाणपत्र’ देईल. देवबंद हे यासाठी देखील खास आहे कारण या शहरात इस्लामिक शिक्षणाचे सर्वात मोठे केंद्र आहे. देवबंदमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात केंद्र सरकारच्या कार्यक्रमांचे निमंत्रित लाभार्थीही सहभागी होणार आहेत.
‘मोदी मित्र’ हा कार्यक्रम अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपने या वर्षी जानेवारीमध्ये सुरू केलेल्या नवीन मिशनचा एक भाग आहे. या अभियानांतर्गत भाजपला प्रधानमंत्री मोदींचा संदेश आणि कल्याणकारी योजना अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचवून आधार निर्माण करायचा आहे.पसमांदा मुस्लिम Pasmanda Muslim घटकांवर विशेष लक्ष्य देण्यात आले असून त्यातून चांगला रिझल्ट देखील मिळत असल्याचे दिसून येतेय.
65 लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष
भाजप अल्पसंख्याक आघाडीने आपल्या कार्यक्रमासाठी देशभरातील 65 लोकसभा मतदारसंघ निवडले आहेत. हे 65 लोकसभा मतदारसंघ 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात आहेत. या सर्वांमध्ये अल्पसंख्याक लोकसंख्या ३० टक्क्यांहून अधिक आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चाने या लोकसभा मतदारसंघांमध्ये संपर्क वाढवण्यासाठी चार महिन्यांचा संपर्क अभियान कार्यक्रम सुरू केला आहे.
भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी म्हणाले की, भाजप केडरच्या पलीकडे जाऊन अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे. यामध्ये वकील, अकाऊंटंट , मीडियात काम करणारे, प्राध्यापक, डॉक्टर्स, इतर उद्योजक व्यावसायिकांचा समावेश आहे – ज्यांना भाजपचा भाग होण्याची इच्छित नाही, मात्र ते प्रधानमंत्री मोदींच्या कार्याची प्रशंसा करतात.
30 व्यावसायिक किंवा उद्योगपतींची निवड
भाजपने या कार्यक्रमासाठी प्रत्येकी 65 लोकसभा मतदारसंघात एका व्यक्तीची निवड केली आहे.सात-आठ विधानसभा मतदारसंघांसाठीही एका व्यक्तीची निवड करण्यात आली आहे. या लोकांनी (प्रभारी) अशा 30 व्यावसायिक किंवा उद्योगपतींची निवड केली आहे – ज्यांना मोदींचे काम आवडते.या 30 लोकांना त्यांच्या क्षेत्रातील या मिशनमध्ये सामील होण्यासाठी 25 लोकांना निवडण्यास सांगितले आहे. अशा प्रकारे प्रत्येक क्षेत्रात 750 लोक सामील होतील. त्यामुळे या मतदारसंघातून जवळपास 50 हजार मोदी मित्र तयार होतील, असे सूत्रांनी सांगितले. ते भाजप केडरचा भाग नसतील, परंतु ते एक आधार तयार करतील.
सिद्दीकी म्हणाले की, हा सराव एका कार्यक्रमाने संपेल ज्या अंतर्गत वर्षाच्या शेवटी सर्व ‘मोदी मित्र’ दिल्लीत मोठ्या सभेसाठी एकत्र येतील
आणि “त्यांना प्रधानमंत्री मोदी स्वतः संबोधित करतील”. सिद्दीकी यांच्या म्हणण्यानुसार,
अल्पसंख्याक मोर्चाकडे ‘मोदी मित्र’ गटांचा डेटा असेल आणि पक्ष त्यांच्या सतत संपर्कात असेल.
ते म्हणाले की आम्ही प्रधानमंत्री आणि सरकारचा प्रत्येक संदेश त्यांच्यापर्यंत सतत पोहोचवू.
पसमांदा मुस्लिमांकडून चांगला रिझल्ट मिळाला
भाजप यूपीमध्ये पसमांदा मुस्लिम Pasmanda Muslim समाजावर काम करत आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपने आपल्या उमेदवारांचे चांगलेच निकाल बघायला मिळाले. मुस्लिमांना तिकीट न दिल्याने टिकेला तोंड द्यावे लागलेल्या भाजपने नगरपंचायतीच्या निवडणुकीत ३२ मुस्लिमांना नगर पंचायत अध्यक्षपदाची तिकिटे दिली होती आणि त्यापैकी ५ जण विजयी झाले होते. भाजपचे ९० टक्के उमेदवार पसमंदा मुस्लिम होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.मोदी मित्र कार्यक्रमअंतर्गत आता किती यश मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजप अल्पसंख्याक आघाडीने निवडलेल्या जागांमध्ये यूपी आणि बंगालमधील 13, जम्मू-काश्मीरमधील 5, बिहारमधील 4, केरळ आणि आसाममधील 6 आणि मध्य प्रदेशमधील 3 जागांचा समावेश आहे. या लोकसभा मतदारसंघांमध्ये वायनाडचाही समावेश आहे.भाजपच्या यादीत पश्चिम बंगालमधील बेरहामपूर (64 टक्के अल्पसंख्याक लोकसंख्या), जंगीपूर (60 टक्के), मुर्शिदाबाद (59 टक्के) आणि जयनगर (30 टक्के) यांचा समावेश आहे. या यादीत बिहारमधील किशनगंज (६७ टक्के), कटिहार (३८ टक्के), अररिया (३२ टक्के), पूर्णिया (३० टक्के) यांचा समावेश आहे. केरळ संसदेच्या ज्या जागांवर भाजपचे लक्ष आहे त्यात वायनाड (५७ टक्के), मलप्पुरम (६९ टक्के), पोन्नानी (६४ टक्के), कोझिकोड (३७ टक्के), वडाकारा (३५ टक्के) आणि कासरगोड (३३ टक्के) यांचा समावेश आहे.
पसमांदा चा अर्थ काय?
Pasmanda Muslim मुस्लिम समाजाच्या संदर्भात पसमांदा हा अलिकडे जास्त प्रचलित झालेला शब्द मूळचा फारसी असून
याचा अर्थ मागे राहिलेले,मागासवर्गीय थोडक्यात दलित असा आहे.
पसमांदा मुस्लिम म्हणजे काय?
Pasmanda meaning मुस्लिम धर्मात पसमांदा जातीचा वर्ग आहे.हिंदूं धर्माप्रमाणेच भारतीय मुस्लिमांमध्येही जातिव्यवस्था आहे.
मुस्लिमांच्या उच्च वर्गाला किंवा तथाकथित उच्च जातीयांना अश्रफ (अशरफ)म्हणतात,
त्याशिवाय अन्य आहेत त्यात ओबीसी आणि दलित मुस्लिम येतात ज्यांना पसमंदा म्हणतात.
पसमांदा कम्युनिटी
Pasmanda Muslim community वस्तुस्थिती पाहिली तर लक्षात येते की मुस्लिम समाज कधीच एकसंघ राहिला नाही. परदेशी आणि बाहेरून आलेले आणि इथले मूळ लोक यांच्यात स्पष्टपणे फरक आहे. अश्रफ, अजलाफ आणि अरझल यांचे वर्गीकरण इस्लामिक फिक्ह (कायदा) आणि इस्लामिक इतिहासाच्या पुस्तकांमध्ये देखील आढळून येतं.अश्रफ जो शरीफ (उच्च) या शब्दाचे अनेकवचनी आहे ज्यात शोरफा देखील अनेकवचनी आहे ज्यात अरबी, इराणी, तुर्की, सय्यद, शेख, मुघल, मिर्झा, पठाण इत्यादी जाती बाहेरून आलेल्या आहेत जे राज्यकर्ते (शासक) होते.
जिल्फ (असभ्य) चे अनेकवचन अजलाफ आहे, ज्यामध्ये बहुतेक कारागीर जाती येतात, ज्यांचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश होतो.अर्थात ओबीसी.
अरज़ाल रजील(नीच) जातींचे अनेकवचन आहे जे बहुतांशी सफाई कामगार आहेत आणि हिंदू दलित जातींच्या समतुल्य आहेत.
अजलाफ आणि अरझल यांना एकत्रितपणे पसमंदा (जे मागे राहिले आहेत) म्हणतात ज्यात आदिवासी (बन-गुजर, तडवी, भील, सेपिया, बकरवाल), दलित (मेहतर, भक्को, नाट, धोबी, हलालखोर, गोरकन) आणि मागास जातींचा समावेश होतो. (धुनिया, डफाली, तेली, विणकर, कोरी) येतात.
तुर्कस्तान, सौदी अरेबिया आणि इराण या मुस्लिमांच्या तीन मोठ्या देशांमध्ये अनुक्रमे तुर्कि जातीजमाती,
अरबी बद्दू आणि सय्यद जातीचे वर्चस्व आहे. अफगाणिस्तानचा सध्याचा सत्ताधारी तालिबान हा पश्तून पठाणांचे वर्चस्व असलेला गट आहे.
इस्लामच्या हदीस आणि इस्लामिक फिक्ह (कायदा) च्या अधिकृत स्त्रोतांमध्ये, कुरैश जमातीची (सय्यद, शेख) उपस्थिती ही खलिफासाठी एक दोन अपवाद वगळता एक प्रमुख अट आहे. वंश, जात, व्यवसाय आणि प्रदेश (अरबी/अजमी) यावर आधारित भेद विवाह विवाहामध्ये स्पष्टपणे वर्णन केला आहे.ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने प्रकाशित केलेला ‘मजमूये कवानीने इस्लामी’, ज्याला बोर्डाने मुस्लिम समाजाच्या वैयक्तिक कायद्याच्या बाबतीत वैधानिक दस्तऐवज म्हणून मान्यता दिली आहे, वरील गोष्टीचे समर्थन करते.
पसमांदा आरक्षण
प्रथम मागासवर्ग आयोग (काका कालेलकर आयोग), मंडल आयोग, रंगनाथ मिश्रा आयोग आणि सच्चर समिती
यांनीही मुस्लिम धर्मातील जातीय भेदभाव स्पष्टपणे मान्य केलेला आहे.
सामाजिक न्यायाच्या संकल्पनेत इतर मागासवर्गीय आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणात पसमांदा मुस्लिम जातींचा समावेश करण्यात आला आहे.
परिस्थिती एवढी स्पष्ट झाल्यानंतरही अश्रफ वर्गाकडून यागोष्टींचे नेहमी खंडन करण्यात आलेलंआहे. तसेच मुस्लिम समाजात जातिवाद/वर्णद्वेष नसल्याचं सांगण्यात येतं,समजा कुणी हे मान्य केले तरी ही योग्य वेळ नसल्याचे सांगण्यात येतं,आणि आज संपूर्ण मुस्लिम समाज धोक्यात आहे, इस्लाम धोक्यात आहे.असं बोललं जातं.कौम खतरे में है, इस्लाम खतरे में हैं.
एकीकडे हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी अजेंडे रेटत राहायचं,देशातील वातावरण ढवळून काढायचं,
दुसरीकडे टोकाचा धार्मिक उन्माद,लव जिहाद,मॉब लिंचिंग,धर्माच्या नावाने विविध स्तरावर द्वेष हिंसा
अशा अस्थितीत मुस्लिम समाजाला मोदी मित्र बनविण्याची गरज ही केवळ मतपेटीची गरज असल्याचे दिसते,पसमांदा मुस्लिम,
भाजप संघात असणारे मुस्लिम अशा गोष्टीकडे कसे बघतात हाही एक संशोधनाचा विषय आहे.
माहिती कशी वाटली कळवा,आवडली तरी शेअर करा.
“खासदार निधी घरबांधण्यासाठी, मुलाच्या लग्नासाठी” वापरला – भाजप खासदाराचा, VIDEO व्हायरल
“सरकारने दबाव आणला” -मोदी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर एलन मस्क ने काय म्हटलं?
Sanatani Bulldozer सनातनी बुलडोजर आता धार्मिक प्रतिक?
आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 22 JUN 2023, 11:26 AM
WebTitle – BJP will make Muslims Modi Mitra, special eye on Pasmanda Muslim