भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांच्या निर्घृण खुनाने पुण्यात एक खळबळजनक रहस्य उलगडलं आहे. वाघ यांची हत्या पैशांसाठी नाही तर त्यांच्या पत्नीचे मुलाच्या मित्रासोबतच्या अनैतिक संबंधांमुळे झाल्याचं पोलिस तपासात उघड झालंय. या प्रकरणात सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ आणि तिचा प्रियकर अक्षय जावळकर यांना अटक करण्यात आली आहे.
नात्यांमधील वाद आणि क्रौर्याची परिसीमा
पोलिस तपासात समोर आलं की, अक्षय जावळकर (32) आणि मोहिनी वाघ (48) यांचे प्रेमसंबंध गेल्या 11 वर्षांपासून होते. या संबंधांमुळे सतीश वाघ यांच्यात सतत वाद आणि तणाव निर्माण झाला होता. 2013 मध्ये जेव्हा अक्षय 21 वर्षांचा होता, त्यावेळी त्याचे आणि मोहिनी यांचे अनैतिक संबंध सुरु झाले. मोहिनीच्या मुलाचा तो मित्र असल्यामुळे कोणाला याचा संशय आला नव्हता.
घटनाक्रम
2001 साली अक्षय जावळकरचे आईवडील वाघ यांच्या फुरसुंगीतील खोलीत भाड्याने राहायला आले. वाघ यांच्या मुलासोबत अक्षयची मैत्री जमली, आणि त्याच्या या घरी येण्या-जाण्यामुळे मोहिनीशी त्याचं जवळीक संबंध निर्माण झाले. वयाच्या 21 व्या वर्षी मोहिनीसोबत असलेल्या त्याच्या प्रेमसंबंधांचा अंकुर फुलला.
मात्र, 2016 साली अक्षयचं लग्न ठरल्यानंतरही त्याचे आणि मोहिनीचे संबंध सुरुच होते.
सतीश वाघ यांना जेव्हा या गोष्टींची कल्पना आली तेव्हा घरात मोठे वाद व्हायला लागले.सतीश वाघ यांचा सततचा वाढणारा वाद ,माराहण अन प्रेम संबंधातील वाटणारा हा अडथळा दूर करण्यासाठी मोहिनी आणि अक्षय यांनी सतीश वाघ यांचा खून करण्याचा कट रचला.
सतीश वाघ यांच्या निर्घृण हत्येचा कट
ज्या दिवशी ही घटना घडली त्यादिवशी म्हणजे 9 डिसेंबर 2024 रोजी सतीश वाघ सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. अक्षय जावळकरने त्याच्या मित्रांसोबत आधीच गाडीत दबा धरून बसण्याची योजना आखली होती. वाघ घरापासून काही अंतरावर पोहोचल्यावर अक्षयने गाडी थांबवली आणि जबरदस्तीने त्यांना गाडीत बसवलं. गाडी पुणे-सोलापूर महामार्गावर पोहोचल्यावर, अक्षय आणि त्याच्या साथीदारांनी चालत्या गाडीतच त्यांच्यावर तब्बल 70 वेळा चाकूने वार केले.
हत्या एवढ्या क्रूर पद्धतीने करण्यात आली की सतीश वाघ यांचे गुप्तांगही कापण्यात आले, ज्यामुळे या हत्येमागील वैयक्तिक राग आणि द्वेष स्पष्ट झाला.
त्यांचा मृतदेह दौंड तालुक्यातील शिंदवणे घाटात टाकण्यात आला. पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी पैशांसाठी केलेलं अपहरण असा खोटा बनाव करण्यात आला.
सतीश वाघ यांच्या हत्येत मोहिनी वाघ ची भूमिका
सतीश वाघ यांच्या हत्येच्या दिवशी मोहिनी वाघ तिच्या मुलांसोबत घरात रडतानाचं नाटक करत होती.
मात्र पोलिसांनी मोहिनी वाघच्या कॉल रेकॉर्ड्स आणि पार्श्वभूमी तपासून हत्येचा सत्य समोर आणला.
मोहिनीने अक्षयला हत्येची सुपारी दिल्याचं तपासात निष्पन्न झालं. पोलिसांनी मोहिनीला 25 डिसेंबरला अटक केली.
पोलिस तपासातील खुलासे
अनैतिक संबंधांची वाच्यता: मोहिनी आणि अक्षयच्या प्रेमसंबंधांची माहिती वाघ यांच्या ओळखीच्या व्यक्तींनी पोलिसांना दिली.
कॉल रेकॉर्ड तपासणी: मोहिनी आणि अक्षय यांच्या कॉल रेकॉर्ड्समधून दोघांमधील संवादांमुळे त्यांच्यावर संशय बळावला.
सुपारी किलर नव्हे: वाघ यांच्या शरीरावर 72 वार दिसल्याने हत्या वैयक्तिक रागातून करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज नक्की झाला.
Pune Police on Satish Wagh case: तरुण शेजाऱ्याशी जवळीक, पतीची सुपारी, मोहिनी वाघ यांचे कारनामे
— Jaaglya bharat (@JaaglyaBharat) December 26, 2024
भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा खून पत्नीने घडवून आणल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. #pune #sathishwagh #yogeshtilekar #maharashtranews pic.twitter.com/F7linyKVnM
क्रूरतेचा कळस
सतीश वाघ यांच्यावर अत्यंत क्रूरतेने वार करून त्यांचा मृतदेह पाच तुकड्यांमध्ये कापण्यात आला होता. हत्येच्या कटात अक्षयच्या मित्रांनीही त्याला साथ दिली. हे सर्व 15 मिनिटांत घडून गेलं.
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या कुटुंबाला हादरवून टाकणाऱ्या या हत्याकांडाने अनैतिक संबंधांच्या परिणामांचं भीषण उदाहरण समोर आणलंय.
सध्या मोहिनी वाघ, अक्षय जावळकर, आणि त्यांच्या साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 26,2024 | 16:02 PM
WebTitle – BJP MLA’s Uncle’s Satish wagh Murder Mystery
#BJPMLA #MurderMystery #AffairScandal #PuneCrime #SatishWagh #mohiniwagh #pune #sathishwagh #yogeshtilekar #MohiniWagh #maharashtranews #india