मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी अनिल देशमुख यांच्याबाबत केलेले दावे खोडून काढले. देवेंद्र फडणविस यांनी काही कागदपत्रे सादर करत अनिल देशमुख खासगी विमानाने नागपूरहून मुंबईला आले होते, असा दावा केला आहे. शरद पवार यांना काल चुकीची माहिती दिली होती. त्यांच्या तोंडून चुकीची माहिती वदवून घेतली गेली. अनिल देशमुखांना पाठिशी घालण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न फसला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
अनिल देशमुख आयसोलेशनमध्ये नव्हते
शरद पवार यांनी अनिल देशमुख यांची पाठराखण केली मात्र त्यांना चुकीचं ब्रिफिंग झालं असावं असं म्हणत 15 ते 27 फेब्रुवारी या तारखेदरम्यान अनिल देशमुख आयसोलेशनमध्ये नव्हते. त्यांना या काळात अनेक मंत्री, अधिकारी भेटले आहेत. अनिल देशमुख यांना या काळात कोण कोण भेटलं ही माहिती शोधून काढणे सहज शक्य आहे, व्हासटेपच्या संभाषणावरून ही भेट फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी असल्याचे म्हणले आहे.असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितलं.
पुरावे दिल्लीत जाऊन देणार सीबीआय चौकशीची मागणी करणार
देवेंद्र फडणवीस यांनी बदल्यांचे रॅकेट असल्याचा आरोप करत ऑडिओ सीडी पेन ड्राईव्ह आणि माजी एसआयडी प्रमुख रश्मी शुक्ला यांचा अहवाल पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र हे सगळे पुरावे संवेदनशील असल्याने ते पत्रकारांना न देता दिल्लीत जाऊन देणार असल्याचे स्पष्ट केले.यामध्ये मोठमोठ्या आयपीएस अधिकाऱ्यांची पोलिस अधिकाऱ्यांची नावे असल्याने राज्यात खळबळ माजू शकते.त्यामुळे आपण केंद्रीय गृहसचिवांना भेटून हे पुरावे सादर करणार आहोत ते कस्टोडियन असल्याने त्यांच्याकडे हे जमा करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे , अशी मागणी करणार आहोत , तसेच बदल्यांचं रॅकेट बाहेर आणणाऱ्या रश्मी शुक्लांना साईडपोस्टिंगला टाकलं. सुबोध जयस्वाल यांनीही कारवाईची मागणी केली तीही झाली नाही. त्यामुळे ते प्रतिनियुक्तीवर गेले.. उद्धव ठाकरे यांनी कारवाई का केली नाही? असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी विचारला.
फडणविसांकडून जनतेची दिशाभूल
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस हे जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे.
सरकारची बदनामी करण्याच्या हेतूने सगळे आरोप.रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केले हे उघड झाले,
आणि हे बेकायदेशीर कृत्य असल्याचा गंभीर आरोपही नवाब मलिक यांनी केलेला आहे.
या उद्योगामुळेच त्यांना साइड पोस्टिंग देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.हिंदीत प्रेस कॉन्फरन्स घेऊन देश भरात मुद्दाम वातावरण निर्मिती केली जात आहे.सरकार मंत्री फोडून सरकार पाडता येत नाही म्हणून अशा पद्धतीने बदनामी करून सरकार पाडण्यासाठी उद्योग सुरू आहे.
हे ही वाचा..वाझे प्रकरण:केंद्राने चौकशी करावी फटाक्यांची माळ लागेल – राज ठाकरे
मातंग समाज अन तरुणांच्या अधोगतीला जबाबदार कोण?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 23, 2021 13:10 PM
WebTitle – bjp leader devendra fadnavis on sharad pawar support to anil deshmukh produced pen drive 6.3 gb