पत्नीचे तुकडे करून पाण्याच्या टाकीत लपवले : बिलासपूर च्या उसलापूर मध्ये पत्नी सती साहू ( sati sahu )ची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती पवन ठाकूर (pawan thakur) ला अटक केली आहे. हत्येनंतर आरोपीने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते घरातील पाण्याच्या टाकीत लपवून ठेवले होते. पोलिसांनी आरोपीच्या पत्नीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. आरोपी बनावट नोटा बनवत असे, असेही तपासात समोर आले आहे. या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीच्या घरी जाऊन शोध घेतला होता.
पत्नीचे तुकडे करून पाण्याच्या टाकीत लपवले
गीतांजली नगरमध्ये राहणाऱ्या तखतपूर येथील पवन ठाकूर या इसमाचा सती साहू नावाच्या तरुणीसोबत प्रेमविवाह झाल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले. आरोपी तरुण सीसीटीव्ही बसवण्याचे काम करत होता. त्याला दोन मुले होती. मात्र आरोपी पवन ठाकूर ला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता.या संशयामुळे दोन महिन्यांपूर्वी त्याने प्रथम आपल्या दोन मुलांना गावाला नातेवाईकांकडे सोडून पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेह पॉलिथिन पिशवीमध्ये तुकडे करून पाण्याच्या टाकीत लपवून ठेवला होता. दरम्यान, आरोपीने मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला, मात्र त्याला संधी मिळू शकली नाही.
चोरीच्या दुसऱ्या घटनेत शोध घेत असताना सापडला मृतदेह
गुन्हे शाखेचे पथक रविवारी चोरी आणि अन्य काही प्रकरणात आरोपी तरुणाच्या घरी शोध घेण्यासाठी पोहोचले होते.
सुरुवातीला झडतीदरम्यान पोलिसांनी पवनच्या घरातून काही बनावट नोटा, संगणक आणि प्रिंटर असे साहित्य जप्त केले.
दरम्यान, इतर वस्तूंची झडती घेतली असता पोलिसांना प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकीतून दुर्गंधी येत होती.
पोलिसांनी टाकीचा तपास केला असता आरोपीने केलेला हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.
कसा झाला खुनाचा खुलासा?
पोलिसांनी पाण्याची टाकी उघडताच टाकीच्या आत मानवी शरीराचे तुकडे पडलेले दिसले.
त्यावर पोलिसांनी पवनची कडक चौकशी केली. चौकशीदरम्यान पवनने पोलिसांना सांगितले की,
“तुकडे तुकडे पडलेला मृतदेह त्याची पत्नी सती साहू हिचा आहे.”
पवनने 2 महिन्यांपूर्वी पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून पाण्याच्या टाकीत लपवल्याची कबुली दिली.
काय म्हणतात पोलीस अधिकारी ?
सकरी पोलीस ठाण्याचे अधिक्षक सागर पाठक म्हणाले, “आम्हाला विवाहित महिलेचा मृतदेह सापडला आहे.
घराच्या पाण्याच्या टाकीवर मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला आहे. आरोपीची कोठडीत चौकशी करण्यात येत आहे.”
मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. ही घटना 6 जानेवारी रोजी घडली होती.
हत्येनंतर त्याने मृतदेहाचे टाइल कटरच्या साह्याने वेगवेगळे तुकडे केले आणि घरातील पाण्याच्या टाकीत लपवून ठेवले. पवन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची संधी शोधत होता. मात्र दाट लोकवस्तीमुळे पवनला मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची संधी मिळत नव्हती. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करून कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
टक्या कुत्र्याने चावा घेत 1 महिन्याच्या बाळाला हॉस्पिटलमधून पळवून नेले
व्हॅलेंटाईन डे,बजरंग दल च्या गुंडांना लोकांनीच पळवून पळवून मारलं
Nikki Yadav Murder :निक्की यादव चा खून,फ्रीजमध्ये मृतदेह;संपूर्ण प्रकरण
डॉ.आंबेडकर जीवंत असते तर गोळ्या घातल्या असत्या – हमारा प्रसाद ला अटक
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मॉर्निंग वॉक वेळी हल्ला
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 07,2023 12:50 PM
WebTitle – bilaspur uslapur The husband cut his wife sati sahu into pieces and hid her in a water tank; Husband arrested