बिहार मधिल बक्सर मधली घटना. वीस वर्षीय युवती बँकेत जात असताना गावातील नराधम दांडग्या गुंड लोकानी तीला तीच्या पाच वर्षाच्या लहानग्या मुलासहीत उचलून नेले. तिच्यावर बलात्कार केला. नंतर आईचे आणि मुलाचे हातपाय बांधून नदीत फेकून दिले. यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आईची मृत्यूशी झुंज सुरू आहे.पीडित महिलेवर बक्सर येथील सदर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.
सहा गुन्हेगार फरार
बक्सर येथील पीडित युवतीवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केला असून
त्यापैकी एक आरोपी मिना राम ला अटक करण्यात आल्याचे समजते.
दुसऱ्या आरोपींची ओळख पटली आहे. मात्र इतर सहा गुन्हेगार फरार आहेत.
पीडित महिलेने सांगितले की बँकेत जात असताना रस्त्यात काही लोकांनी तिला घेरले
आणि नंतर तिचे अपहरण केले, प्रथम तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला,
त्यानंतर मुलासह तिला बांधून नदीत फेकण्यात आले.
तिच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार जेव्हा तिच्या किंचाळण्याचा आवाज रस्त्यावरील इतर लोकाना आला
तेव्हा पीडितेला नदीतून बाहेर काढले गेले मात्र तोपर्यंत तीचं मूल मरण पावलं होतं.
हे कृत्य गावातीलच लोकानी केलेलं आहे असे पीडितेने सांगितले आहे.
पीडित महिलेची मेडिकल केली जात असून पुढील तपास पोलिस करत आहेत.असे पोलिसानी सांगितले आहे.
नराधमांना शिक्षा व्हावी
सामूहिक बलात्कार पीडितेचा नवरा विशाखापट्टणममध्ये काम करतो.घटनेची माहिती मिळताच तो बक्सरला पोहोचला. तो म्हणाला की तो पत्नी आणि मुलावर खूप प्रेम करतो. विशाखापट्टणम येथे नोकरी करण्यासाठी जाताना त्यांनी त्यांच्या बायको आणि पाच वर्षाचा मुलाला सासरी म्हणजे पत्नीच्या माहेरी पाठवले ते लोक त्यांची चांगली काळजी घेतील असं त्यांना वाटलं परंतु या निर्णयामुळे मुलाचा जीव जाईल हे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते.
पीडित महिला सुद्धा आईच्या घरी कष्ट करून मुलाच्या भवितव्यासाठी पैसे जमवत होती.तीने काही पैसे जमा केले. ती ही रक्कम बँक खात्यात ठेवण्यासाठी जात होती.पत्नीने फोनवरून ही माहिती दिली.त्या दिवशी ती खूप आनंदात होती.बँकेत पैसे भरल्यानंतर ती आपल्या मुलासाठी कपडे घेण्यासाठी बाजारात जाणार होती, पण त्याआधीच नराधम विकृत बलात्काऱ्यांनी तिला लक्ष्य केले. ज्याप्रमाणे आपल्या मुलाला नदीत फेकून ठार मारण्यात आले त्याचप्रमाणे या नराधमांना शिक्षा व्हावी अशी अपेक्षा लहानग्या मुलाच्या वडिलांनी म्हणजे पीडितेच्या पतीने व्यक्त केली आहे.
सोशल मिडियात लोकानी नितीशकुमार यांच्या कार्यकाळतील दलित अत्याचाराच्या घटनेवर आता बोलायला सुरुवात केली असून हेच का सुशासन? असा सवाल सामान्य जनतेकडून विचारला जात आहे.
by Team Jaaglya bharat
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)