मतदानाला आता काही दिवस उरलेले असताना महाविकास आघाडीच्या चर्चा मात्र संपायचे नाव घेत नसल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळत होते,मात्र आजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपली पहिली अधिकृत 17 जागांची यादी जाहीर करून खळबळ उडवून दिली आहे.दुसरीकडे आज वंचित बहुजन आघाडीनेही आपले उमेदवार जाहीर केले आहेत.यासोबतच वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीच्यावतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपुरमधील उमेदवारास पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडी चा मोठा निर्णय जाहीर
आज अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन 9 जागांच्या विषयी भूमिका जाहीर करण्यात आली,तसेच काही ठिकाणी उमेदवार सुद्धा जाहीर करण्यात आले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका स्पष्ट करताना म्हटले की , “
आपली परंतु जे आमच्या बरोबर समझोता करायला उत्सुक होतो त्याना आम्ही जरांगे पाटील फॅक्टर महत्वाचा आहे तो लक्षात घेतला पाहिजे
पण त्यांनी तो घेतला नाही म्हणून आम्ही काल पक्षातील मोठ्या नेत्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये दुसऱ्या फेसच्या निवडणूक पासूनची चर्चा
चर्चेच्या दरम्यान शेतकरी आणि बेरोजगार यांचा प्रश्न आणि विशेष एग्रो इंडस्ट्री याला प्रधान्य कसे द्यायचे आणि इतर प्रश्नावर चर्चा झाली या सर्व चर्चात आजवर ओबीसी समाजाचे एक किंवा दोन सोडले तर प्रतिनिधी दिलेले नाहीत. त्यामुळे यावेळेस ओबीसी भटके विमुक्त हा फॅक्टर लक्षात घेऊन आम्ही या समूहांना उमेदवारी देऊन जिंकवून आणणार आहोत,
दुसरे भाजपाने मुस्लिमांचे जे आयसोलेशन केले आहे.त्याला थांबविण्यासाठी आम्ही मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी देणार आहोत,
तिसरा जैन समाजाचा उमेदवार आणायचा आणि त्याना जिंकून आणायचे
महाराष्ट्रामध्ये उपेक्षितांची वंचितांची आणि गरीब मराठा मुस्लिम अशी नविन वाटचाल आम्ही मानतो आहोत.
या वाटचालीला संबंधित समूह पाठिंबा देतील अशी आम्ही अपेक्षा करतो
उमेदवारांची यादी जाहीर
भंडारा – संजय गजाजन केवट
गडचिरोली – हिटेश पांडुरंग मडावी
चंद्रपूर – राजेश वारलूजी बेले
बुलढाणा – वसंत राजराम मगर
अकोला – प्रकाश आंबेडकर
अमरावती – प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवार
वर्धा – प्रो. राजेंद्र साळुंखे
यवतमाळ वाशिम – खीमसिंग प्रतापराव पवार
नागपूर (10 ) – इंडियन नॅशनल कॉँग्रेस समर्थन
रामटेक मध्ये उमेदवार कोण असेल हे आम्ही संध्याकाळी जाहीर करू असं कळविण्यात आले आहे.
ओबीसी बहुजन पार्टी गठित झाली असून त्यांच्याकडून जर प्रकाश शेंडगे जर लढणार असतील तर आम्ही त्याना पाठिंबा जाहीर करणार आहोत.असे जाहीर करण्यात आले. तसेच राजकारण आणि इलेक्शन यामध्ये प्रचंड पैसा खर्च केला जातो वापरला जातो. त्यामुळे निवडणुकीत पैशांचा कमीत कमी वापर होईल याची काळजी घेतली पाहिजे असे मतही ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडी सोबतच्या युतीच्या संदर्भात मात्र आज सस्पेन्स राखण्यात आला आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
PFirst Published by Team Jaaglya Bharat on MAR 27,2024 | 12:01 PM
WebTitle – Big decision of Vanchit Bahujan Aghadi; Candidates announced