विजयस्तंभ भीमा कोरेगाव शौर्य दिन म्हणजे संघर्षमय एकतेचा प्रेरणादायी विजय.. शौर्य, धैर्य व संघर्षमय एकतेचा गौरवशाली, प्रेरणादायी इतिहास.. १ जानेवारी १८१८ साली स्वाभिमानासाठी व जाती अंतासाठी महार सैनिक अन् पेशव्यांमध्ये युध्द झाले. या युध्दामध्ये ५०० महार सैनिकांनी विषमतावादी, जुलमी २८,००० पेशवाईचा पराभव केला. या युध्दाच्या स्मृती चिरंतन जागृत राहण्यासाठी अन् शौर्याचे प्रतिक म्हणून २६ मार्च १८२१ रोजी विजयास्तंभाचे भूमीपूजन करुन, १३ डिसेंबर १८२४ रोजी त्याचा लोकार्पण करण्यात आले.
या विजयस्तंभाची देखभाल करण्यासाठी खंडोजीबिन माळवदकर यांच्याकडे जबाबदारी सुपुर्द करण्यात आली.
तसेच, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी इंग्रजांनी मौजे पिंपरी, सांडस, वाडे, बोल्हाई, केसनंद व बाकोरी गावातील २६० एकापेक्षा जास्त जमीन दिली.
विजयास्तंभाच्या ७/१२ वर ३ हेक्टर ८६ आर जमीन असून, माळवदकर कुटुंबांने
विजयास्तंभाच्या ७/१२ व इतर अधिकारात वहिवाटदार म्हणून आपली नावे लावून,
ऐतिहासिक जागेवरच कब्जा करण्याचा, हात पाय पसरण्याचा कृतघ्नपणा केला आहे.
भीमा कोरेगाव शौर्याचा गौरवशाली इतिहास आजही काही धर्मांध संघटनांना सलतो आहे.
त्याच अनुषंगाने १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाला २०० वर्षे पुर्ण झाली
त्याच दिवशी विजयास्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांवर
काही धर्मांध संघटनांनी पुर्वनियोजीत कट करुन सशस्त्र हल्ला केला होता, हिंसाचार घडवून आणला होता.
हिंदुत्ववादी समर्थकांनी केलेल्या तुफान दगडफेकीत, जाळपोळीत अनेक दुकानांचे,
लहान मोठ्या गाड्यांचे लाखोंचे नुकसान झाले होते तर अनेक मंडळी जखमी झाली होती.
यावर्षी, करणी सेनेचे अध्यक्ष अजय सेंगर याने राज्य सरकारने भीमा कोरेगाव येथील स्मारक पाडावे, शौर्य दिनावर बंदी घालावी अशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. इतर संविधान द्रोह्यांप्रमाणे, याच अजय सेंगर यांनी संविधान हिंदू विरोधी आहे, संविधान बदला असे गेल्यावर्षी वादग्रस्त वक्तव्य केले होते. म्हणजे, विजयास्तंभ परिसरातील अतिक्रमण अन् जागेचा मालकी हक्क लढा न्याय प्रविष्ट असतांनाच ऐतिहासिक विजयस्तंभ हटविण्यासाठी अन् शौर्य दिन कार्यक्रमावर बंदी घालण्याचे षडयंत्र गेली काही वर्षे चालू आहे.
भीमा कोरेगाव विजयास्तंभ परिसरातील जागेवर मावळदकर कुटुंबांने अतिक्रमण
अन् जागेचा मालकी हक्क केल्याच्या विरोधात आंबेडकरी चळवळीतील अनेक सामाजिक,
राजकीय कार्यकर्त्यांनी अन् पक्षांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली होती.
पत्रकार रामदास लोखंडेंनी सर्वप्रथम वृत्तपत्रातून अतिक्रमणा विरोधात वाचा फोडली
अन् नंतर भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष,
पत्रकार दादाभाऊ अभंग यांनी वृत्तपत्रातून अनेक लेख लिहून प्रत्यक्ष कायदेशीर आवाज उठविला आहे.
भीमाकोरेगाव शौर्य दिनी शूर वीर पुर्वजांना अभिवादन, मानवंदना देण्यासाठी प्रतीवर्षी लाखो जात असतात, मात्र त्या जागे संदर्भात गेली अनेक वर्षे न्यायालयीन निकराचा लढा दादाभाऊ अभंग आपल्या सहकाऱ्यांसमवेत देत आहेत. माळवदकर यांच्या कुटुंबाकडून सदर जागे संदर्भात एक पुस्तिका प्रकाशित केली असून, ती पुस्तिका मोफत वाटण्यात आली. त्यांनी काही राजकीय मंडळींच्याही त्यांनी भेटी घेतल्या आहेत. सदर विजयस्तंभ हा खाजगी मालकीचा असल्याबाबतचा दावा दिवाणी न्यायालयात प्रलंबित असून, आपल्या पुर्वजांचा गौरवशाली इतिहास मातीमोल, नष्ट, उध्वस्त करण्यासाठी माळवदकर कुटुंबासाठी काही प्रतिगामी शक्तीही कामाला लागल्या असल्याचे गेल्या काही वर्षातील घटनांवरुन दिसून येते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १ जानेवारी १९२७ रोजी भीमा कोरेगाव विजयस्तंभा भेट देऊन शूर वीरांना मानवंदना देऊन गौरवउद्गार काढले, स्तुती केली होती. पराक्रमी शूर वीर पुर्वजांचा गौरवशाली, दैदिप्यमान इतिहास अन् ऐतिहासिक विजयाची जगाला साक्ष देणाऱ्या विजयस्तंभाची कायदेशीर जपणूक करण्याची नितांत गरज आहे.त्यासाठी समाजातील सर्व गटा तटांनी मतभेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे.
सन २०१७ मध्ये विजयस्तंभ परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले असून, आतापर्यंत सर्वच महसूली व न्यायालयीन आदेश आपल्याच बाजूने आले आहेत. माळवदकर कुटुंबाला प्रतिगामी शक्तींकडून मिळणारी मदत अन् उभी राहत असलेली यंत्रणा पाहता, प्रलंबित न्यायालयीन लढा जिंकण्यासाठी आपणही तन, मन, धन देऊन दादाभाऊ अभंग यांच्या पाठीशी सक्षम यंत्रणा उभी केली पाहिजे अन् प्रलंबित न्यायालयीन लढा जिंकून आपल्या ऐतिहासिक गौरवशाली अनमोल स्थळांचे जतन, रक्षण केले पाहिजेत.
करणी सेना च्या अजयसिंग सेंगर वर गुन्हा दाखल
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 31,2022, 23 :30 PM
WebTitle -bhima koregaon Vijayastambha ownership rights