भीमा कोरेगाव ची लढाई एनकेनप्रकारे दाबून टाकण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढले आहेत.त्यावर अनेक पुस्तके आली मात्र सत्य इतिहास पुसून काढता आला नाही.सध्या असेच एक पुस्तक आले असून त्यावर आता चर्चा सुरू झाली आहे. प्रसार माध्यमांनी या पुस्तकाला मुद्दाम प्रमोट केले आहे.त्यावर जेष्ठ इतिहास अभ्यासक विचारवंत साहित्यिक प्राध्यापक हरी नरके यांनी या पुस्तक संदर्भातील राजकारणाचा खरपूस समचार घेतला आहे.
भीमा कोरेगाव : भुक्कड पुस्तक गाजवण्याचा मार्ग
प्राध्यापक हरी नरके म्हणतात..
भुक्कड पुस्तक गाजवण्याचा मार्ग: प्रा.हरी नरकेएखादे सामान्य चोपडे गाजवण्याचे १०१ मार्ग असे पुस्तक लिहायला हवे. एखादा वादग्रस्त विषय घ्यायचा, भडक आणि एकांगी विधानं करायची, मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वादाला इंधन पुरवायचे की पुस्तक रातोरात गाजते. खपते. एखादी बोलक्या, संघटित, जागृत वर्गाची जात संघटना मदतीला आली की चांगभलं.
सध्या भीमा कोरेगाव प्रकरणी हाच फ़ंडा वापरला जातोय. ज्या संघीय छावनीतल्या प्रमुख लेखक, संपादकांना भीमा नदीकाठचे भीमा कोरेगाव आणि पुण्यातील कोरेगाव पार्क यातला फरक माहीत नाही, ते किती महान संशोधक असणार त्याचा अंदाज सहज करता येईल.
असे लेखक हे भाडोत्री असतात. खरे लेखक भलतेच असतात. बहुजन नावे पुस्तकावर छापण्यापूर्ती वापरली जातात.
मूळ लेखक अतिशय धाडसी असे डरपोक असल्याने ते पुढे येत नाहीत.
दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे उद्योग
पण हे लोक ओळखता येतात.मशीद म्हणू नका, वादग्रस्त ढाचा म्हणा हे आठवा. परवा एका वाहिनीवर हा पोरसवदा तथाकथित ‘इतिहासकार’ वाहिनीच्या अँकरला दम देत होता, लढाई म्हणू नका, ती एक किरकोळ चकमक होती, विजय स्तंभ म्हणू नका, जय स्तंभ म्हणा. असले भंपक दावे करणारा हा इसम काय बौद्धिक वजनाचा असेल ते सहज कळावे. पुढे बोलताना तो असेही बोलून गेला, ती लढाई नव्हतीच, चकमक नावाची लढाई होती! बोम्बला ! त्यांची पुढची मुक्ताफळ तर भन्नाटच होती. ते वदले,” पेशव्यांच्या काळात जातपात नव्हतीच. दलितांना अन्यायाची वागणूक मिळालेली नाही.” किती महान संशोधन!
ही किडे गुरुजींच्या आंब्याची किमया असणार. ते नाही का म्हणाले होते, जयपूरला १९८९ च्या मनु पुतळ्याच्या उदघाटन कार्यक्रमाला खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते, नी त्यांनी मनुचा गौरव केला होता.” (बाबासाहेबांचे त्यापूर्वी ३३ वर्षे आधीच ६/१२/१९५६ ला महापरिनिर्वाण झालेले होते!)
एक जात संघटना हे पुस्तक मोफत वाटणार आहे.तर जातनेते म्हणाले, ही लढाई नव्हती कारण ती एकच दिवस चालली.
हाच निकष असेल तर मग पानिपतची लढाई किती दिवस चालली होती?
ते पुढे असेही म्हणाले की, “सैन्य अवघे पाच हजार विरुद्ध पाचशे होते, त्याला लढाई कशी म्हणणार?”
पावनखिंड जेव्हा बाजीप्रभूंनी लढवली नी जिंकली तेव्हा या लढाईत कमी सैन्य होते म्हणून ती लढाई ठरत नाही का?
हे पुस्तक गाजवण्याचे, बुद्धिभेदाचे, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे उद्योग आहेत.
त्यांना फार महत्व देऊ नका.त्यांना वादंगच हवंय. अनुल्लेखाने मारणे गरजेचे आहे.
तस्नीम मीर: Tasnim Mir अशी बनली जागतिक क्रमवारीत अव्वल
टेलीप्रॉम्प्टर म्हणजे काय? कसे काम करते? नरेंद्र मोदी यांचे भाषण चर्चेत
जय भीम पिक्चर आणखी एक विक्रम,ऑस्कर अकादमी कडून सन्मान
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा, )
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 21, 2022 11: 44 AM
WebTitle – Bhima Koregaon: The way to publish a book is a cheap publicity stunt – Prof Hari Narke